Ladki Bahin Yojana eKYC Date Extended – सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवायसी करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती, आनंदाची बातमी अशी की शेवटच्या तारखेत आता मुदतवाढ झालेली आहे. कारण राज्यातील अनेक ठिकाणी आलेले नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमळे अनेक लाडक्या बहिणींना e-KYC पूर्ण करणे शक्य झाले नव्हते, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. ज्या महिलांची अजूनही केवायसी झालेली नाही त्यांच्यासाठी मुदत वाढ वाढवून देण्यात येत आहे. कारण खूप सारे अशा लाडक्या बहिणी होते की ज्यांची केवायसी अजूनही बाकी आहे. तांत्रिक अडचणी नैसर्गिक आपत्ती तसेच कागदपत्रे अभावी व पात्रता या कारणांमुळे केवायसी करताना अडचणी येत होत्या या सर्व गोष्टी गृहीत धरून ठेवायचे करण्याच्या तारखेत अधिकृतपणे मुदत वाढ करण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojana eKYC Date Extended | मुदतवाढ झाली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC मुदतवाढ झाली आहे, याबद्दल अधिकृतपणे माहिती महिला व बाल वकास मंत्र अदिती ताई तटकरे यांच्या त्याच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे 17 नोव्हेंबर 2025 रोजी दिली आहे. ते कळवतात की, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वी रित्या राबवली जात आहे. या पूर्वी याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी eKYC प्रक्रिया करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण गेल्या काही दिवसात आपल्या महाराष्ट्र राज्यात नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अनेक पात्र भगिनी ही केवायसी करू शकले नाही. त्यामुळे या सर्व अडचणीची नोंद घेऊन राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या महिलांनी स्वतःची eKYC करायची आहे. व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा ज्याचा घटस्फोट झाला असेल त्यांनी घटस्फोट पमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे.
वडील/ पती नाही घटस्फोट झाला आहे किंवा एकल महिला eKYC कशी करावी?
ज्या लाडक्या बहिणीचे पती हयात नाही किंवा वडील हयात नाही किंवा एकल महिला आहेत किंवा घटस्फोट झाला आहे. अशा महिलांना eKYC करण्यासाठी वेबसाईट मध्ये नवीन पर्याय देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे पती हयात नसेल त्यांना त्यांच्या पतीचा मृत्यू दाखला तसेच ज्याच्या वडील हयात नसतील त्यांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू दाखला किंवा जास्त घटस्फोट झाला असेल त्यांना घटस्फोट झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. पण या नवीन पद्धतीचा वापर करून पात्र लाडक्या बहिणी केवायसी करू शकता. हा पर्याय लवकरच योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती अपडेट करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना eKYC कशी करावी KYC स्टेटस कसे चेक करावे
| आता शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2025 |
| लाडकी बहीण KYC स्टेटस | कसे चेक करावे |
| लाडकी बहीण eKYC | कशी करावी |

