BLO ने तुमचा SIR फॉर्म भरला का? Status चेक करा | SIR Form Status Check Online in Marathi

BLO ने तुमचा SIR फॉर्म भरला का? Status चेक करा | SIR Form Status Check Online in Marathi

📄 SIR Form Status Check Online in Marathi – सध्या महाराष्ट्र SIR फॉर्म भरणे सुरू आहे, आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख निवडणूक आयोगानुसार मुदतवाढ होऊन 17 ऑगस्ट 2026 आहे. SIR Form भरून घेण्याचे काम निवडणूक आयोगाने हे काम BLO ला सोपवले आहे. किंवा तुम्ही SIR Form Online नागरी सेवा पोर्टल https://voters.eci.gov.in वरून सुद्धा भरू शकता. पण जर तुम्ही SIR फॉर्म भरून तुमच्या गावातील किंवा शहरातील BLO कडे जमा केला असेल. तर त्यांनी तो फॉर्म ऑनलाईन भरून Submit केला की नाही याचे स्टेटस ऑनलाईन मोबाईल मधून लवकर चेक करा. नाहीतर तुमचे नाव मतदान यादीतून वगळण्यात येऊ शकते. म्हणून लवकर SIR फॉर्म Status लवकर check करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

✅ SIR Form Status Check Online in Marathi

Maharashtra SIR Form 2026: The SIR (Special Intensive Revision) Form submission process is currently underway in Maharashtra, and the deadline has been extended to 17 August 2026 as per the Election Commission schedule. If you have submitted your SIR Form to your local BLO (Booth Level Officer), make sure to check your SIR Form Status online to confirm whether the BLO has entered and submitted your form successfully. You can also complete the SIR Form online through the Election Commission’s official voter services portal. Checking your SIR Form Status, BLO Form Submission Status, and voter list details on time can help ensure that your voter information is properly updated and avoid issues with your name appearing in the electoral roll.

✅ SIR फॉर्म म्हणजे काय ? | What is SIR Form in Marathi

SIR Form म्हणजे “Special Intensive Revision” फॉर्म, म्हणजे मतदान यादीतील तुमची माहिती तपासण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठीचा फॉर्म. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, तुमच्या नाव मतदान यादी मध्ये आहे का?, तुमची माहिती बरोबर आहे का, तुमचं नाव एका गावापेक्षा जास्त मतदान यादीत तर नाही ना?, तुम्ही मतदान साठी पात्र आहात का?, हे चेक करण्यासाठी SIR Form भरला जातो. हा फॉर्म BLO (Booth Level Officer) कडे भरून जमा करता येतो तसेच ऑनलाइन सुविधा सुद्धा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले आहे.

BLO ने तुमचा SIR फॉर्म भरला का? Status चेक करा | SIR Form Status Check Online in Marathi

तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे, की BLO ने तुमचा SIR फॉर्म Online भरला आहे का? लवकर Status चेक करा प्रोसेस खालील प्रमाणे

  • Voters.eci.gov.in या पोर्टल वरती या,
  • Fill Enumeration form वर क्लिक करा,
  • Sign Up करा, तुमचा मोबाईल नंबर captcha टाकून continue करा,
  • तुमच नाव टाका OTP Send करा, आलेला OTP टाका Verify करा
  • तुमच account तयार होईल,
  • पुन्हा Fill Enumeration form वर क्लिक करा,
  • येथे मोबाईल नंबर CAPTCH टाकून OTP SEND करा
  • आलेला OTP टाकून Verify & Login करा.
  • येथे राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा,
  • तुमचा मतदान कार्ड नंबर टाका, सर्च बटनावर क्लिक करा.

✅ जर BLO ने तुमचा फॉर्म ऑनलाईन भरला असेल तर, “Your Form Has Already Been Submitted” असा मेसेज show होईल तुम्हाला काही करण्याची गरज नाही,

👉 पण SIR फॉर्म Show होत असेल तर तुमच्या BLO ला तुमचा SIR फॉर्म लवकर भरायला सांगा.

🔶 याच पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा SIR फॉर्म भरून झाला आहे की नाही त्याचं स्टेटस चेक करू शकता. आणि तुमच्या मित्र परिवाराला नक्की चेक करायला सांगा.


✅ हे वाचा – सरपंच ग्रामपंचायत निवडणूक साठी लागणारे आवश्यपत्रे


📌 SIR Form Status Check Online in Marathi

SIR फॉर्म भरण्याची शेवटची तारीख महाराष्ट्र | SIR form Fill Up Last Date Maharashtra

तुम्हा सर्वांना माहीतच असेल SIR फॉर्म भरणे महाराष्ट्रात खूप दिवसांपासून सुरू आहे. खूप वेळा फॉर्म भरण्याची तारखेत मुदत वाढ सुद्धा झाली. आता SIR फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 आहे. म्हणून त्यापूर्वी तुमचा एसआयआर फॉर्म BLO कडे नक्की जमा करा.

📄 SIR Form Status येथे क्लिक करा
🗓️ शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026

📄 निष्कर्ष : महाराष्ट्रात SIR फॉर्म भरणे सुरू आहे, सगळेच जास्त करून SIR फॉर्म BLO कडून भरला जात आहे. पण कळतं न कळत यदाकदाचित BLO कडून online फॉर्म Submit करणे राहून गेलं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हणून एकदा नक्की चेक करा, SIR form status.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top