Anganwadi Bharti Maharashtra Documents List In Marathi | अंगणवाडी भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Anganwadi Bharti Maharashtra Documents List In Marathi | अंगणवाडी भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Anganwadi Bharti Maharashtra Documents List In Marathi – महाराष्ट्र अंगणवाडी भरती साठी अर्ज करायचा असेल अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तो ऑफलाईन पद्धतीने करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला एक physical form भरावा लागतो. त्या फॉर्म सोबत तुम्हाला काही Documents जोडावे लागतात. तर ते महत्त्वाचे Documents कागदपत्रे कोणकोणते त्यांची लिस्ट तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म जमा करणार आहात तेव्हा तुम्हाला खाली दिलेली सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडून फॉर्म जमा करावा लागेल. आता ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganwadi Bharti Maharashtra Documents List In Marathi

Maharashtra Anganwadi Sevika & Madatanis Bharti, if you apply to that then you can apply offline for this recruitment. if you apply for Anganwadi Bharti then you always knows the required documents attach to the form the you can submit the form to mahila & bal Vikas vibhag at your tehasil. All the important documents for Anganwadi Bharti is given below.

अंगणवाडी भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Anganwadi Bharti Documents

महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे. खाली देण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे एकात्मिक बालविकास विभाग सेवा योजना कार्यालय शिरपूर 1, तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या माहितीनुसार देण्यात आलेली आहेत.

1) अर्ज फॉर्म (विहित नमुन्यात पूर्ण भरलेला)

2) रहिवाशी दाखला/ स्वयंघोषणापत्र

3) शाळा सोडल्याचा दाखला/ Leaving Certificate

4) लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र

5) 12 वी गुणपत्रक/प्रमाणपत्र

6) पदवी गुणपत्रक/ प्रमाणपत्र (असल्यास)

7) डी. एड/ बी एड गुणपत्रक (असल्यास)

8) पदव्युत्तर पदवी गुणपत्रक (असल्यास)

9) जातीचा दाखला (Caste Certificate)

10) विधवा किंवा अनाथ असल्यास त्याचे प्रमाणपत्र

11) आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा वीज बिल

12) लग्न झाले असल्या नावात बदल असल्यास रू 100/- स्टॅम्प पेपर व विवाह नोंदणी प्रमाणपत्र

अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे माहिती व्हिडिओ

अंगणवाडी भरती अर्ज कसा करावा | Anganwadi Bharti Form Kasa Bharava

जर तुम्हाला अंगणवाडी मार्फत अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतीने यासाठी अर्ज करायचा असेल. तर हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो. यासाठी कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर किंवा सायबर कॅफेवर जाण्याची गरज नाही. अंगणवाडी भरतीचे फॉर्म नेहमी ऑफलाइन पद्धतीने भरले जात असतात. हा फॉर्म तुम्ही तुमच्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास विभाग किंवा महिला व बालविकास विभाग या ठिकाणी अर्ज करावा लागेल. त्याबाबतची माहिती तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील अंगणवाडी मध्ये विचारू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top