पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण महाज्योती मोबाईल मधून फॉर्म भरा 2024 | Mahajyoti Police Pharti 2023 Bharti Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2024 Last Date Eligibility Qualification Online Application Form

Mahajyoti Police Bharti 2024 Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023 – फ्री पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर संस्थेकडून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करिता. ओबीसी/विजेएनटी/ एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तर या पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांना 27 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने महाजोतीच्या वेबसाईट वरती जाऊन अचूक पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण महाजोती ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची कागदपत्रे अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. (mahajyoti police bharti training 2023 online application form fillup process education qualification salary age limit syllabus of mahajyoti police bharti free taining program)

Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी फास्ट असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत. तर या योजनेचे स्वरूप, योजनेच्या लाभासाठी पात्रता, शारीरिक क्षमता, अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी (Category Wise Reservation) प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. (mahajyoti police bharti training 2023)

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेचे स्वरूप (mahajyoti police bharti training 2023)

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना महाजोती संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
प्रशिक्षणाचा कालावधी – 4 महिने करिता
विद्यावेतन – ₹6000 रु प्रति उमेदवार (ऑफलाइन प्रशिक्षणाकरिता)
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या – नागपूर साठी – 300 ते छत्रपती संभाजीनगर साठी – 300 एकूण 600 उमेदवार
शिक्षण पात्रता (Education/ Qualification) – 12 वी पास
वयाची अट (Age Limit) – 18 ते 25 वर्ष

योजनेच्या लाभासाठी पात्रता (Eligibility) – 

1) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी
2) विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी (OBC/VJ/NT/SBC)
3) विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी
4) विद्यार्थी हा बारावी पास असावा किंवा असावी
5) मुलं किंवा मुली दोघेही अर्ज करू शकतात

शारीरिक क्षमता (Physical Ability)

विद्यार्थी प्रशिक्षणा करिता पात्र झाल्यास खालील बाबींची पूर्तता करण्यात यावी अन्यथा योजनेचा लाभ घेता येणार नाही.
उंची (पुरुष) – कमीत कमी 165 से.मी.
उंची (महिला) – कमीत कमी 155 से.मी.
छाती – कमीत कमी 79 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 84 सेमी) केवळ पुरुषांकरिता

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड
2) रहिवासी दाखला
3) जातीचा प्रमाणपत्र
4) वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
5) 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
6) बँकेचा तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक)

अर्ज कसा करावा (Online Application Form Fillup Process)

1) अर्ज करण्यासाठी महाजोतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईट वरती जाऊन Notice Board या पर्यावर क्लिक करून पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
2) अर्जासोबत वरती देण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रे Self Attested करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून मग अपलोड करावे.
(mahajyoti police bharti training 2023)
अर्ज करण्यासाठी वेबसाइट लिंक – येथे क्लिक करा
 
🛑 मोबाइल मधून फॉर्म कसा भरायचा – विडियो पहा 
जाहिरात PDF – Downlaod
थोडक्यात जाहिरात तपशील – DOWNLOAD PDF

सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी (कॅटेगिरी नुसार आरक्षण)

फक्त खाली दिलेल्या कॅटेगरी चे मूल- मुली अर्ज करू शकता
 
1) इतर मागस वर्ग (OBC) – 59%
2) निरधी सुचित जमाती -अ (VJ -A) 10%
3) भटक्या जमाती ब (NT-B) 8%
4) भटक्या जमाती क (NT-C) 11%
5) भटक्या जमाती ड (NT-D) 6%
6) विशेष मागास प्रवर्ग (SBC) – 6%
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

आरक्षण – (महिला व अनाथ) (Reservation)

1) इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागा महिलांसाठी आरक्षित.
2) तसेच अनाथांसाठी 1 टक्के जागा आरक्षित.

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती (Terms and conditions of training)

1) अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023
2) विहित नमुन्यामध्ये कागदपत्रांसहित अर्ज केलेल्या पात्र असलेल्या उमेदवारांची सांगणी करून परीक्षा घेऊन मग पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.
3) पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या विद्यार्थी ज्या दिनांकास रुजू होते त्या दिवसापासून त्यांना रू. 6000 हजार प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू करण्यात येईल. पण प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या उमेदवारांनाच विद्यावेतन देण्यात येईल.
4) विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाची लिंक असलेले बँक खाते देणे अनिवार्य आहे.
5) महा ज्योती कडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारथी पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महाजोतीकडील सदर प्रशिक्षण व्यतिरिक्त कोणत्याही प्रशिक्षण योजनेत अधीछात्रवृतीचा लाभ धारक नसावा. विद्यार्थी अशा प्रकारचा दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्याविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
6) सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्याने वरील अटी व शर्तींचा अभंग केल्यास तसेच चुकीची किंवा कोटी कागदपत्रे माहिती सादर केल्यास त्याच्यावर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल व यापुढे महाजोतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेणे असते पात्र असणार नाही.
7) नमूद निकषांची पूर्तता न करणाऱ्या व अपूर्ण अर्ज करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
8) जाहिरात रद्द करणे, मुदतवाड करणे, अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील.
9) पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
10) अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाजोतीच्या कॉल सेंटरवर पुढील क्रमांकावर
संपर्क करावा. 8956775376/77/78/79/80

FAQ – Mahajyoti Police Pharti 2023 Bharti Police Bharti Pariksha Purv Prashikshan Mahajyoti 2023 Last Date Eligibility Qualification Online Application Form

Q. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना कोण राबवत आहे?
Ans. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti) नागपूर राबवत आहे.
Q. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. सध्या स्थितीला 27 ऑगस्ट 2023 आहे. परंतु मुदत वाढ करण्याचे अधिकार महाज्योतीकडे आहेत.
Q. महाज्योती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण साठी शिक्षण पात्रता?
Ans. बारावी पास असलेले इच्छुक विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकता.
Q. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कालावधी किती महिने आहे?
Ans. प्रशिक्षण कालावधी 4 महिने करीत आहे.
Q. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण वेळेस विद्यार्थ्यांना विद्यावेतन किती मिळणार आहे?
Ans. पात्र विद्यार्थ्यांना रू. 6000/- एवढे विद्यावेतन मिळणार आहे.
Q. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी एकूण जागा?
Ans. नागपूर – 300 ते छत्रपती संभाजी नगर – 300 एकूण 600
Q. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण महाज्योती फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
Ans. वरती लेखक तुम्हाला आवश्यक असलेले कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे.
Q. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मुली फार्म भरू शकतात का?
Ans. हो, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी मुली फॉर्म भरू शकता.
Q. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी दहावी पास वरती अर्ज करू शकतो का?
Ans. नाही, पोलीस भरती प्रशिक्षणासाठी कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे.
Q. महा ज्योती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अर्ज करण्याची वेबसाईट?
Ans. www.mahajyoti.org.in या वेबसाईट वरती Notice Board मध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top