रेशन दुकानदार किती रेशन देतो? तुम्हाला किती रेशन मिळायला पाहिजे चेक करा आधार नंबर टाकून मोबाईल मध्ये | Ration Card RC Details Check Online in Mobile in Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ration Card RC Details Check Online – तुम्हाला तर रेशन मिळते. परंतु सरकार नियमानुसार किती रेशन मिळते हे तुम्हाला माहीत नाही. रेशन दुकानदार तर तुम्हाला रेशन देतो. परंतु तुमच्या हक्काचे रेशन तुम्हाला दिले जात नाही. तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच तुम्हाला सरकार नियमानुसार किती रेशन मिळायला पाहिजे. अशी सर्व माहिती आधार कार्डचा नंबर टाकून मोबाईल मधून चेक करू शकता. पुढे या लेखात तुम्हाला तीच माहिती देण्यात आली आहे. की तुम्ही मोबाईल मधून आधार नंबर टाकून सरकार नियमानुसार तुम्हाला किती रेशन मिळायला पाहिजे चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.

How to check ration card rc details in marathi

तुम्हाला किती रेशन मिळते? आधार नंबर टाकून चेक करा मोबाईल मध्ये. | Check Ration Card RC Details in Mobile

1) तुम्हाला किती रेशन मिळते हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे आधार नंबर पाहिजे.
2) त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून Mera Ration नावाचे ॲप डाऊनलोड करून घ्या
⬇️ App Download Link – येथे क्लिक करा
3) त्यानंतर हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये उघडा. ॲप चालू करताना तुम्हाला लोकेशन ऑन करायला सांगितले जाईल ते चालू करा.
4) आता स्क्रीन वरती काही फोटो दिसतील त्यांना बाजूला स्लाईट करा.
5) आता तुम्हाला स्क्रीन वरती खूप सारे ऑप्शन दिसतील येथे Know Your Entitlement हा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा.
6) येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील Ration Card No व Aadhar No. येथे आधार नंबर वरती क्लिक करा.
7) तुमचा बारा अंकी आधार नंबर टाका खाली सबमिट बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
8) तुम्हाला सरकार नियमानुसार विकत किती धान्य मिळायला पाहिजे आणि फ्री च्या स्कीम मध्ये किती धान्य मिळायला पाहिजे सर्व माहिती दिली असेल.
9) आता येथे तुम्ही चेक करू शकता तुम्हाला रेशन दुकानदार किती धान्य देतो हे तुम्हाला माहित आहे. त्याची तुलना या ॲप मध्ये दिलेल्या माहितीशी करा याची तफावत वाटत असेल तर तुम्ही रेशन दुकानदाराची तक्रार तहसील कार्यालयात करू शकता.
10) खाली दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही ही माहिती अजून डिटेल मध्ये पाहू शकता.

Watch Video And Check Ration Card RC Details in Marathi

 
 
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top