Saman Nagarik Kayda In Marathi – समान नागरी कायदा म्हणजे देशात किंवा राज्यात वेगवेगळ्या धर्मांचे त्या धर्मानुसार असणारे वेगवेगळे कायदे , या सगळ्यांना मिळून असा एकच कायदा ,की जो कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो, त्यांच्या लग्नप्रथा, घटस्फोट ,दत्तक विधी, व वारसा हक्क किंवा मालमत्तेची वाटणी या सगळ्यांमध्ये एकच कायदा लागू होईल तो म्हणजे समान नागरी कायदा आहे.
समान नागरी कायदा म्हणजे कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा वैयक्तिक चालीरीती किंवा प्रथा यांच्यातील बदल नाहीतर, सर्व धर्मीयांनी एकाच कायद्यात असून आपल्या देशातील किंवा राज्यातील कायद्यापासून संरक्षण मिळणार असून आपल्या धर्मनिरपेक्षतेची तत्व देखील बळकट होणार आहे.
अनुक्रमणिका
पहा
समान नागरी कायदा म्हणजे काय? (Saman Nagari Kayda Manje Kay)
समान नागरी कायदा (Uniform Civil Code) म्हणजे आपल्या देशातील सर्व धर्माच्या लोकांसाठी एकाच प्रकारचे सर्व कायदे म्हणजे समान नागरी कायदा होय. जात धर्म यांच्या भेद भावाशिवाय समान नागरी कायदा लागू होईल.
समान नागरी कायदा मराठी माहिती (Saman Nagarik Kayda Information in Marathi)
समान नागरी कायदा म्हणजे देशातील सर्व धर्मीयांच्या नागरिकांसाठी एकच कायदा असे होय. जात ,धर्म ,लिंगभेद यांचे शिवाय समान नागरिक कायदा लागू होईल. सध्याच्या स्थितीत हिंदू ,ख्रिश्चन ,पारसी ,मुस्लिम या धर्मांचे त्यांच्या धर्मानुसार विवाह, घटस्फोट ,वारसा हक्क ,मालमत्तेची वाटणी आणि दत्तक विधी याच्यासाठी या धर्मांची त्यांच्या धर्मा नुसार वेगवेगळे कायदे कार्यरत आहेत. समान नागरी कायदा लागू झाल्यामुळे या सगळ्या धर्माची जी काही त्यांच्या धर्मानुसार असणारे कायदे ती रद्द होऊन एकच समान नागरी कायदा लागू होईल. ज्यामध्ये हिंदू पारशी ख्रिश्चन मुस्लिम या सर्व धर्मीयांना जात किंवा धर्म यांच्यातील भेदभाव नष्ट होतील. समान नागरी कायद्याचे एकच उद्दिष्टे आहे की, हा कायदा कुठलीही जात किंवा धर्म यांच्याशी संबंध न ठेवता सर्व धर्मीयांना समान हक्क व समान कायदा लागू होईल. समान नागरी कायदा वैयक्तिक नसून सामाजिक ऐक्याचे आणि एकात्मतेचे स्वरूप म्हणून कार्यरत होईल. (Uniform Civil Code in Marathi)
समान नागरी कायद्याचे फायदे (Benefits of Saman Nagarik Kayada)
1. समान नागरी कायदा लागू झाल्यामुळे देशातील वेगवेगळ्या जाती व धर्म जरी असले तरी सर्वांसाठी समान कायदा असेल व समान नागरी हक्क व त्यातील संधी देखील मिळेल.
2. सर्व धर्मीयांसाठी एकच कायदा असेल म्हणून न्यायव्यवस्थेला सुद्धा निर्णय घेण्याबद्दलच्या अडचणींमध्ये मदत होईल.
3. कायदा एक असल्यामुळे जात धर्म यांचे भेदभावाचे प्रश्न सुटतील व एकीची भावना सगळ्यांच्या मनात निर्माण होईल. व सगळ्यांच्याच चालीरीती समजण्यास एकमेकांना मदत होईल.
4. समान नागरिक कायदा झाल्यामुळे देशातील सामान्य नागरिकांना देखील कायद्याचे महत्त्व व्यवस्थित समजून घेता येईल. जसे की वारसा हक्क व मालमत्तेची वाटणी यासाठी मदत होईल.
5. समान नागरी कायदा लागू झाल्यामुळे सर्व धर्मांतील लग्न व घटस्फोट प्रक्रियेत बदल होतील.
समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य. (Which First State Has Uniform Civil Code)
भारतात अजून पर्यंत गोव्यात पोर्तुगीज सरकारच्या काळात समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे.
भारतातील काही राज्यात अजून समान नागरी कायदा लागू केला नाही. ख्रिश्चन,पारशी,मुस्लिम,शीख या धर्मातील लोकांना अजून त्यांच्या धर्मानुसार वावरण्याची सवय आहे. परंतु भारतात समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर सर्व धर्मीयांना या कायद्याचे पालन करणे अनिवार्य राहील व सर्व धर्मीयांना एकच कायद्यानुरूप चालावे लागेल.
समान नागरी कायदा कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट आहे.
भारतीय संविधानात समान नागरी कायदा (युनिफॉर्म सिविल कोड) लागू करणे बाबत कलम 44 मध्ये या कायद्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कलम 44 हे राज्याचे व देशाचे नितीनिर्देशक तत्वांचा एक भाग आहे. नितीनिर्देशक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालय आदेश करू शकत नाही. परंतु न्यायालय हे तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करू शकते.
समान नागरी कायद्याची उद्दिष्टे. (Saman Nagari Kayda Uddishte)
समान नागरी कायदा लागू करण्याचे उद्दिष्टे कोणत्याही गुन्ह्याबद्दल शिक्षा करणे हे नाही. तर समान नागरिक कायदा म्हणजे विविध धर्मातील किंवा जातीतील लोकांचे विवाह, घटस्फोट,दत्तक विधी, व मालमत्तेची वाटणी ,वारस हक्क इत्यादी बद्दलच्या धर्मानुसार असणाऱ्या अनेक कायद्याचे एकाच कायद्यात रूपांतर करणे हे आहे
FAQ: Saman Nagarik Kayda In Marathi Uniform Civil Code In Marathi (UCC)
प्रश्न. समान नागरी कायद्याची व्याख्या. (Defination of Uniform Civil Code)
उत्तर. समान नागरी कायदा म्हणजे सर्व धर्मीयांसाठी एकच कायदा होय.
प्रश्न. समान नागरी कायदा लागू करणारी पहिली राज्य कोणते?
उत्तर. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
प्रश्न. दमण आणि दीव मध्ये समान नागरी कायदा आहे का?
उत्तर. गोवा दमण आणि दीव पोर्तुगीज प्रशासन कायदा 1962 च्या कलम 5(1)एकद्वारे टिकून राहिला
प्रश्न. समान नागरी कायदा लागू करणारे पहिले चार राज्य.(Which Four State Has Uniform Civil Code)
उत्तर. उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि आसाम या राज्यांनी समान नागरी कायदा लागू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
प्रश्न. समान नागरिक कायद्याला विरोध का?
उत्तर. समान नागरी कायदा हा धार्मिक अधिकारांच्या विरोधात जाईल असे काहींची मत आहे.
प्रश्न. समान नागरिक कायदा का आवश्यक आहे ? (Why Uniform Civil Code is Very Important)
उत्तर. देशातील अनेक धर्म धर्मातील लोकांना ऐक्य आणि एकात्मतेला चालना देण्यासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे.
प्रश्न. समान नागरी कायदा कोणत्या कलमात समाविष्ट आहे?
उत्तर. कलम 44 समाविष्ट आहे.
प्रश्न. UCC म्हणजे काय? (What is UCC)
उत्तर. Uniform Civil Code होय.
प्रश्न. UCC चा मराठीत अर्थ काय? (UCC meaning in marathi)
उत्तर. समान नागरी कायदा होय.
प्रश्न. UCC ची स्थापना कधी झाली?
उत्तर. 1953 मध्ये झाली.
प्रश्न. देशातील सर्व नागरिकांसाठी कायदा समान असणे म्हणजे काय.?
उत्तर. कोणत्याही धर्मातला किंवा जातीतला नागरिक असो यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता लागू होणारा कायदा म्हणजे समान नागरी कायदा .
प्रश्न. कोण कोणत्या देशात समान नागरी कायदा आहे?
उत्तर. अमेरिका, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि आयर्लंड इत्यादी देशांमध्ये नागरिक समान कायदा आहे.
प्रश्न. अमेरिकेत समान नागरी कायदा पाडला जातो का?
उत्तर. अमेरिकेत वेगळ्या धर्मासाठी किंवा समुदायासाठी वेगळे कायदे नाहीत फक्त कायद्याचा एकच संच पाडला जातो तो म्हणजे समान नागरी कायदा.
प्रश्न. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल?
उत्तर. मूलभूत हक्कांच्या संवर्धनासाठी स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात यावी यासाठी व व धर्मनिरपेक्ष असलेल्या देशात सार्वजनिक जीवनात धर्माला बाजूला ठेवता आले पाहिजे.
प्रश्न. समान नागरी कायद्यानंतर काय बदल होतील?
उत्तर. विवाह व घटस्फोट आणि वारसा याबाबत धर्म तटस्थ समान कायदे व मुलींना वारसा हक्कचा समान अधिकार नाही. समान नागरी कायदा त्यात बदल करू शकते.
प्रश्न. Full Form of UCC?
उत्तर. Uniform Civil Code