Aadhar Bank Link Online At Home | आधार बँक कसे लिंक करायचे घर बसल्या

Aadhar Bank Link Online At Home | आधार बँक कसे लिंक करायचे घर बसल्या

Aadhar Bank Link Online – सध्याच्या स्थितीत सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर तो DBT द्वारे दिला जातो म्हणजेच Direct Benifits Transfer द्वारे आणि हा लाभ घेण्यासाठी तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. पण आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे म्हणजे बँकेत जाऊन रांगेत उभे राहून या गोष्टी कराव्या लगतात. पण तुम्हाला अशी पद्धत सांगितली जाणार आहे यांनी तुम्ही घरबसल्या मोबाईल मधूनच “Aadhaar Bank Online लिंक करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Bank खाते कसे Link करायचे Online

आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे सजा खूप महत्त्वाचे झाले आहे. सरकारच्या खूप सार्‍या योजना राबवते याचा लाभ आधार कार्ड ला बँक खाते जर लिंक नसेल तर मिळत नाही. खऱ्या कोणकोणत्या योजने आहेत त्याची माहिती थोडक्यात खाली देण्यात आलेले आहेत. जर खाली दिलेल्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे खूप गरजेचे आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार बँक खाते लिंक असणे आवश्यक

1) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना
2) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana)
3) प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)
4) अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)
5) प्रधानमंत्री वय वंदना योजना
6) प्रधानमंत्री घरकुल आवास योजना
7) धनलक्ष्मी योजना (Dhanalakshmi Yojana)
8) सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप योजना (All scholarship yojana)

आता आधार कार्ड बँक खाते कसे लिंक करायचे पाहूया

आधार ला बँक खाते लिंक करण्याच्या 3 पद्धती आहेत. ज्याने तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करू शकता. अशा दोन पद्धती आहेत ज्याने तुम्ही घरबसल्या मोबाईल मधूनच आधार कार्ड बँक खाते लिंक करू शकता.

1) पहिली पद्धत – तर या पद्धतीने तुम्ही घरबसल्या मोबाईल मधूनच तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घेऊ शकता.
2) त्यासाठी NPCI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. “https://www.npci.org.in/
3) येथे “Comsumer” या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर “Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) येथे क्लिक करा.
4) येथे Menu बार दिसेल त्यावर क्लिक करा मग “Aadhaar Seeding/Deseeding” या पर्यावर क्लिक करा.
5) येथे तुमचा “Aadhaar Number” टाका येथे “Seeding” हा पर्याय निवडा.
6) तुमच्या बँकेचे नाव निवडा, मग “Seeding Type” निवडा.
7) Account Number टाका खाली टिक मार्क करून “Submit” करा
8) तुमच्या मोबाईल नंबर वरती “OTP” येईल तो टाका आणि झाले.
9) पुढील 2 दिवसात तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक होईल.

📢 सूचना – या बँकांची नावे येथे दिलेली नाही त्याचं कारण म्हणजे, त्या बँकांना आधार लिंक त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून करता येते म्हणून येथे त्यांचे नाव देण्यात आलेले नाही.

आधार बँक लिंक करा घर बसल्या

 

2) दुसरी पद्धत – या पद्धतीने तुम्हाला जे ही बँक खाते आधार कार्ड ला लिंक करायचे आहे. त्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, इंटरनेट बँकिंग चा वापर करून आधार कार्ड ला बँक खाते लिंक करता येईल

3) तिसरी पद्धत – Offline पद्धतीने Physically बँकेत जाऊन Aadhar Bank Link करू शकता
1) बँकेत जाऊन आधार कार्ड ला बँक खाते लिंक करण्यासाठी, एक फिजिकल फॉर्म भरून घ्यावा लागेल. त्यासाठी येथे क्लिक करा – Aadhar Seeding Form Download
2) त्यानंतर हा फॉर्म भरायचा आहे फार्म कसा भरायचा त्याबद्दल माहिती त्याच पीडीएफ मध्ये दिली आहे.
3) फॉर्म भरून त्याला आधार कार्ड तसेच बँक पासबुक जोडून संबंधित बँकेत जमा करायचा आहे.
4) त्यानंतर पुढील 24 तासात तुमच्या “Aadhar Card Bank” खाते लिंक होईल.

🌐 आधार बँक लिंक स्टेटस् असे चेक करा – येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top