👩‍💼 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना मिळणार 1500 रू महिना असा अर्ज करा | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024

👩‍💼 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना मिळणार 1500 रू महिना असा अर्ज करा | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 – महाराष्ट्रातील मुली व महिलांना आता दर महा 1500 रू मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत मुली व महिला यांना मदत व्हावी यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत. तर या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” साठी अर्ज कसा करावा?, अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?, तसेच या योजनेसाठी कोणत्या मुली व महिला अर्ज करू शकता?, या योजनेसाठी वयाची अट काय आहे? तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? अर्ज करण्याची वेबसाईट कोणती? अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अनुक्रमणिका पहा

लाडकी बहिण योजना काय आहे | What is Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे? ते पाहूया महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा 1500 रू दिले जाणार आहेत. तर ही मदत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिले जाणार आहे. तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली आहे.

थोडक्यात माहिती | Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana Information

योजनेचे नाव मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना
राज्य महाराष्ट्र
कोणी सुरू केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कधी सुरू झाली 1 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 (मुदतवाढ)
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील मुली व महिला
वयाची अट 21 ते 65 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
महिलांना लाभ 1500 रू महिना
पहिला हप्ता कधी मिळेल 14 ऑगस्ट 2024
हप्ता कधी मिळेल प्रत्येक महिन्याच्या 15 तारखे पर्यंत
अर्ज कुठे करावा स्वतः किंवा अंगणवाडी/ग्रामपंचायत/सेतू सुविधा केंद्र
हमी पत्र फॉर्म येथे डाउनलोड करा
Official Website/App Narishakti Doot App Download
Mazi Ladaki Bahin Yojana GR PDF येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा असा करा अर्ज

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश

 • राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितींना चालना देणे.
 • त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे.
 • राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे.
 • राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तिकरणास चालना मिळणे.
 • महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारणा करणे.

माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कोण आहेत.

महाराष्ट्रात नवीन सुरू झालेली योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिला लाभार्थी राहणार आहेत.

पात्रता काय आहे | Eligibility Criteria for Mukhyamantri Mazi Ladki Bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय आहे? त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

 1. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
 2. राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यकत्या आणि निराधार महिला.
 3. महिलेचे कमीत कमी वय 21 वर्षे पूर्ण असावे तर जास्तीत जास्त 65 वर्षेपर्यंत
 4. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महिलेचे बँकेत खाते असावे.
 5. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्र कोण? पात्र कोण? |Mazi ladki bhain yojana Eligibility Criteria

 

आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Maji Ladaki Bahin yojana documents list in marathi

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
2. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
3. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा डोमासाईल
4. कुटुंबाचा उत्पन्न दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे)
5. बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
6. पासपोर्ट साईज फोटो.
7. रेशन कार्ड.
8. सदर योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा | How to apply for Mukhyamantri Mazi Ladaki Bahin yojana

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल तयार केले जाईल. तसेच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशा महिला ग्रामपंचायती सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून अर्जाची पोचपावती दिली जाईल.
तसेच अर्जदार महिलेला फॉर्म भरत्यावेळी स्वतः हजर राहावे लागेल. कारण महिलेचा फोटो काढण्यात येईल तसेच ही केवायसी करण्यात येईल. यासाठी महिलेने खालील आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी.
1. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड)
2. स्वतःचे आधार कार्ड

 

माझी लाडकी बहीण योजना लिस्ट कधी लागेल? | Majhi Ladaki Bahin Yojana List 2024

ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर. त्यांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल वरती तसेच वरती जारी करण्यात येईल. तसेच त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत अशा ठिकाणी लावण्यात येणार आहे. हे तात्पुरती निव्वळ यादी 16 जुलै 2024 रोजी लावण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यादी लावण्यात येईल. अंतिम यादी अर्जदारांना तात्पुरत्या यादीमध्ये काही तफावत आढळल्यास त्यांनी केलेल्या तक्रारी यांचे निवारण केल्यानंतर लावण्यात येईल. अंतिम यादी 01 ऑगस्ट 2024 रोजी लावण्यात येईल.

वयाची अट काय आहे | Age limit for Mukhyamantri Majhi Ladaki Bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी वयाची अट काय आहे? पाहूया तर महिला व मुलींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट देण्यात आलेली आहे. तर अर्जदार महिलेचे वय अर्ज करता वेळी कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती | Mukhyamantri mazhi Ladaki Bahin yojana last date

तर लाडली बहण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ते पाहूया. तर 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयात दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. तसेच शासनाने वेळोवेळी तारखेत जर का बदल केला तर त्याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट वरती अपडेट करण्यात येईल.

फॉर्म कुठे मिळेल | Ladaki Bahin yojana form pdf download

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना PDF form कुठे मिळेल. पहा तर माझी लाडकी बहिण योजनेसाठी कुठल्याही प्रकारचा कागदाचा फार्म भरण्याची गरज नाही. अर्जदारांना फक्त आवश्यक असलेले कागदपत्रे लागेल. त्यानंतर या योजनेसाठी फार्मा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येईल. फार्म भरून झाल्यावर तुम्हाला त्याची पोचपावती देण्यात येईल. त्यामुळे अर्जदारांना फार्म घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.

Mukhyamantri mazi ladki bahin yojana gr pdf

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 महाराष्ट्र अधिकृत शासन निर्णय (GR) PDF Download करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही योजनेबद्दल अधिकृत सविस्तर माहिती GR PDF मध्ये पाहू शकता.

⬇️ शासन निर्णय (GR PDF) GR Download
नवीन सुधारित (GR) GR Download
⬇️  हमी पात्र Download

FAQ – Mukhyamantri Majhi Ladaki Bahin Yojana Maharashtra 2024 In Marathi

Q. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील?
Ans. लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत.

Q. लाडकी बहिण योजना Online Apply करू शकतो का?
Ans. हो, लाडकी बहिण योजना फॉर्म ऑनलाईन भरू शकतो.

Q. मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना अर्ज करण्याची वेबसाईट कोणती?
Ans. या योजनेसाठी लवकरच वेबसाईट उपलब्ध होणार आहे.

Q. मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजना निवड यादी कधी लागेल?
Ans. या योजनेची अंतिम निवड यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी लागणार आहे.

Q. माझा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला आहे परंतु लग्न संबंध महाराष्ट्रात झाले आहे तर मी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो करू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासिल सर्टिफिकेट असायला हवे. ते नसेल तर पतीचा शाळा सोडल्याचा दाखला मतदान कार्ड रेशन कार्ड फॉर्म भरतांना Upload करू शकता

Q. पांढरी रेशन कार्डधारक महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. नाही कारण पांढरे रेशन कार्ड हे अशा व्यक्तीला मिळते ज्याचे उत्पन्न जास्त आहे किंवा त्याला सरकारी नोकरी आहे आणि योजनेच्या शासन निर्णयानुसार तुम्ही अर्ज करू शकत नाही.

Q. अविवाहित मुली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात का?
Ans. नाही, या योजनेसाठी फक्त विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार महिला अर्ज करू शकता.

Q. माझ्याकडे जन्म दाखला नसेल तर मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो करू शकता, कारण जर तुमच्याकडे जन्म दाखला नसेल तर तुम्ही अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासिल सर्टिफिकेट जोडू शकता. जन्म दाखला किंवा डोमासिल सर्टिफिकेट यापैकी कोणतेही एक कागदपत्रे तुमच्याकडे असावे.

Q. माझ्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो करू शकता परंतु त्यासाठी तुमच्याकडे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड या पैकी कोणतेही एक कागदपत्रे असायला आहे.

Q. रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. नाही, जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर रेशन कार्ड मध्ये नाव असणे अनिवार्य आहे. तुमचं नाव रेशन कार्ड मध्ये असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता.

Q. जर माझे नाव ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये असेल परंतु ओरिजनल रेशन कार्ड मध्ये नसेल तर अर्ज करू शकते का?
Ans. हो, तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड ची प्रिंट काढून ते डॉक्युमेंट सोबत जोडू शकता आणि अर्ज सुद्धा करू शकता.

Q. माझे लग्न झाले आहे आणि वय 21 वर्षापेक्षा कमी आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. नाही, जरी तुमचं लग्न झालं असेल परंतु वय 21 वर्षापेक्षा जास्त नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही.

Q. अपंग महिला मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेसाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो, अपंग महिला सुद्धा माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता.

Q. कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात का?
Ans. जर कुटुंब निराधार असेल आणि योजनेच्या नियमात बसत असेल तर अर्ज करू शकतात.

28 thoughts on “👩‍💼 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना मिळणार 1500 रू महिना असा अर्ज करा | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024”

 1. प्रवण

  जर महिलेचे पतिकडचे नाव वेगळे असेल तर काय करावे लागेल

 2. Jyoti Yuvraj Burkul

  मी अंगणवाडी मदतनीस आहे मी अर्ज करू शकते का?

 3. Prashant Deore

  Labharthi che bank account kontyahi banket asel tar chalel ki only nationlise bank pahije?

 4. Prashant Deore

  Labharthi che bank account kontyahi banket asel tar chalel ki only nationlise bank pahije? tyasathi konti bank pahije

 5. माझी लाडकी बहीण योजना ये महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे ते घरी बसलेल्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना लाभली आहे तरी आपण सर्वजण स्वतः जाऊन अंगणवाडीत अँड ग्रामपंचायत येथून फॉर्म भरून घ्यावे माझी ही नम्र विनंती आहे

 6. Pallavi shivaji more

  21 running asel tr arj kru kay 31 August nantr 21 complete hot asel tr tyanni kadhi arj krava

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top