PM Kisan Kyc Status Check In Mobile : पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. तर पी एम किसान योजना केवायसी प्रत्येक शेतकरी करतही आहे. पण शेतकऱ्यांना खात्री पटवून घेण्यासाठी की त्यांनी केलेली पी एम किसान योजना ई केवायसी झालेली आहे की नाही ते चेक कसं करायचं के ही कुठेही न जाता मोबाईल मधून त्याबद्दल लिहा आर्टिकल मध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो तुमची पण पी एम किसान योजना
ई केवायसी झाली असेल आणि केवायसी झाली आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता त्याच्यासाठी खालील दिलेली माहिती चा वापर करा.
पी एम किसान योजना ई केवायसी स्टेटस | PM Kisan Yojana e-KYC Status Check Online in Marathi
पी एम किसान योजना 2022 ई केवायसी झाली आहे की नाही कसे चेक करायचे त्याच्या साठी खाली दिलेल्या स्टेपचा वापर करा.
1. सर्वात आणि तुम्हाला पीएम किसान सम्मान निधि योजना अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल. लिंक खाली दिली आहे.
2. पी एम किसान योजना वेबसाईट उघडल्यानंतर खाली तुम्हाला “eKYC “असा पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल.
3. तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायला विचारले जाईल. तुमचा आधार नंबर टाकायचा “Search” बटन तुम्हाला दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.
4. त्यानंतर पी एम किसान ई केवायसी करताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल तो टाकायचा व “Get Mobile OTP” या बटनावर क्लिक करायचे.
5. “Get Mobile OTP” क्लिक केल्यानंतर, तुमची जर का पी एम किसान ई केवायसी झाली असेल तर तुम्हाला “Mobile Number Already Exist” असा मेसेज दिसायला पाहिजे. हा मेसेज जर तुम्हाला दिसला तर समजून घ्या तुमची केवायसी झाली आहे.
6. जर का तुम्हाला “Mobile Number Already Exist” हा मॅसेज दिसला नाही आणि “Get Aadhar OTP” he बटन दिसत असेल तर समजून घ्या तुमची केवायसी बाकी आहे.
7. तुम्हाला पी एम किसान केवायसी करावी लागेल. ही केवायसी तुम्ही मोबाईल मधून तसेच तुमच्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन करू शकता.
पी एम किसान योजना ई केवायसी बद्दलचे तुमचे काही प्रश्न.
प्रश्न 1: सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी करावीच लागेल का ?
उत्तर : हो, जर का तुम्हाला पी एम किसान योजना लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पी एम किसान योजना ई केवायसी करावीच लागेल.
प्रश्न 2: जर शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही तर त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत का ?
उत्तर : हो, जर शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही तर त्यांना पी एम किसान योजनेचे येणारे पुढचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे लवकर पी एम किसान योजना ई केवायसी अपडेट करून घ्या.
प्रश्न 3: पी एम किसान ई केवायसी कशी करायची ?
उत्तर : पी एम किसान योजना ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करावी लागेल. पी एम किसान योजना केवायसी कशी करायची मोबाईल मधून त्याच्या साठी येथे क्लिक करा.
प्रश्न 4: पी एम किसान योजना केवायसी ऑफलाइन करू शकतो का ?
उत्तर : हो, तुम्ही पीएम किसान की केवायसी ऑफलाइन करू शकता त्याच्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यावी लागेल.
प्रश्न 5 : पी एम किसान केवायसी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे.
उत्तर : पी एम किसान योजना ई-केवायसी करण्यासाठी खाली दिलेले डॉक्युमेंट लागते.
1. आधार कार्ड
2. मोबाईल नंबर
3. स्वतः शेतकरी (आधार कार्ड अपडेट नसेल तर)
प्रश्न 6 : पी एम किसान केवायसी करण्यासाठी आधार कार्ड अपडेट करावे लागेल का ?
उत्तर : नाही, पी एम किसान योजना केवायसी करण्यासाठी आधार कार्ड अपडेट राहिले तरी चालते नाही अपडेट राहिले तरी चालेल. आधार कार्ड अपडेट असेल तर तुम्ही स्वतः मोबाईल मधून केवायसी करू शकता. आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रा ला जाऊन पी एम किसान योजना केवायसी करावी लागेल.
प्रश्न 7: पी एम किसान योजना केवायसी करण्याची शेवटची तारीख कोणती ?
उत्तर : पी एम किसान योजना केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.
Hamipatr