Thibak Sinchan Yojana 80 Takke Anudan Apply Online : ठिबक सिंचन योजना 2022 असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईल मध्ये – ठिबक सिंचन योजना 2022 महाराष्ट्र – ठिबक सिंचन योजना फॉर्म कसा भरायचा – ठिबक सिंचन योजना 80 टक्के अनुदान संपूर्ण माहिती – ठिबक सिंचन योजना 80 टक्के अनुदान कसा भरावा ऑनलाईन फॉर्म- ठिबक सिंचन अनुदान योजना
ठिबक सिंचन योजना 80 टक्के अनुदान : ठिबक सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढवण्यासाठी राज्य सरकारने ठिबक सिंचन करीता आता सरसकट 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याच्या निर्णय घेतला आहे. खूप सारे शेतकरी आता ठिबक सिंचनाचा वापर करून शेती करायला सुरुवात करत आहेत अशा परिस्थितीत शेतकरी महागठिबक घेऊन शेती करण्यापेक्षा राज्य सरकारने दिलेल्या ठिबक सिंचन योजनेचा वापर करून 80 टक्के अनुदान घेऊन ठिबक सिंचन विकत घेऊ शकता. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल हा फार्म महाडीबीटी वेबसाईटवरुन भरावा लागतो या आर्टिकल मध्ये तुम्ही पाहणार आहात मोबाईल मधून तुम्ही ठिबक सिंचन योजनेचा फॉर्म कशाप्रकारे भरू शकता याची डिटेल मध्ये माहिती देण्यात आलेली आहे.
ठिबक सिंचन योजना फार्म मोबाईल मधून कसा भरायचा – Thibak Sinchan Form Fill In Mobile
सूचना : ठिबक सिंचन योजना फॉर्म मोबाईल मधून भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असेल म्हणजेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे तरच मोबाईल मधून हा फॉर्म भरू शकतात.
- शेतकरी बंधूंनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये खालील दिलेली वेबसाईट उघडावी लागेल. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
- वेबसाईट उघडण्या आधी खाली दिलेली सर्व माहिती एकदा वाचा मग फॉर्म भरायला सुरुवात करा.
- वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये उघडल्यानंतर तिथे तुम्हाला ” नवीन अर्जदार नोंदणी “असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी अर्ज उघडेल त्याच्यातून ची माहिती टाका जसे की अर्जदाराचे नाव त्यानंतर वापरकर्त्याचे नाव म्हणजे तुमचं हे युजरनेम असेल त्यानंतर पास वर टाका त्यानंतर तोच पासवर्ड पुन्हा टाका.
- त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी टाकावा लागेल त्याच्यावर ओटीपी पाठवून तो ओटीपी व्हेरिफाय करावा लागेल. याच पद्धतीने मोबाईल नंबर टाकून मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवून त्याला व्हेरिफाय करावा लागेल. परत खाली तुम्हाला एक संकेतांक दिसेल तू संकेतांक टाकून नोंदणी करा या बटनावर क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल.
- महाडीबीटी वेबसाईटवर ती तुमची नोंद झाल्यानंतर तुम्हाला नोंद झाली आहे असा मेसेज दिसेल.
- त्यानंतर परत वेबसाईट वरती येऊन अर्जदार वा घेणे या बटनावर क्लिक करायचे. वापरकर्ता आयडियाच्या वर क्लिक करायचे. तिथे तुम्ही तयार केलेले युजरनेम आणि पासवर्ड टाकून संकेतांक टाकून लॉग इन करा या बटनावर क्लिक करायचे.
- तुम्ही तुमच्या प्रोफाईल मध्ये लॉगिन व्हाल तिथे तुम्हाला प्रोफाइल पूर्ण करण्याचा पर्याय येईल. त्याच्यावर क्लिक करून तुमची पूर्ण माहिती टाकायची जसे की तुमची वैयक्तिक माहिती, तुमचा जातीचा तपशील, तुम्ही अपंग आहात का नाही ती माहिती, त्यानंतर तुमच्या बँक खात्याचा तपशील बँक खाते क्रमांक आयएफसी कोड शाखेचे नाव एवढी सर्व माहिती भरून खाली तुम्हाला टिकमार्क करावी लागेल आणि माहिती जतन करा या बटनावर क्लिक करून माहिती सेव करून घ्यायची.
- शेतकरी बंधूंनो आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत वाचा याच्यात सरळ आणि सोप्या मराठी भाषेमध्ये ठिबक सिंचन फॉर्म कसा भरायचा मोबाईल मधून याची सर्व माहिती दिली आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल पत्त्या बद्दलची सविस्तर माहिती भरावी लागेल जसे की तुमचा पत्ता राज्य जिल्हा तालुका तुमचे गाव पिन कोड अशी सर्व माहिती भरावी लागेल सर्व माहिती भरल्यानंतर खाली जतन करा या बटनावर क्लिक करायचे.
- ही आता तुमच्या प्रोफाईल पुर्ण करण्याची शेवटची स्टेप असेल याच्या तुम्हाला शेठ जमिनीचा तपशील भरावा लागेल तुमची शेती कोणत्या गावात आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला इथे भरावी लागेल तुमचे राज्य तुम्हाला निवडावे लागेल जिल्हा निवडावा लागेल तालुका तसेच तुमची शेती कोणत्या गावात आहे त्या गावाचे नाव निवडावे लागेल.
- त्यानंतर तुमचा शेतीचा खात्याचा तपशील तुम्हाला भरावा लागेल तुमचा खाते नंबर तुमचे एकूण क्षेत्र किती आहे ते हेक्टर आणि आर मध्ये भरावे लागेल.
- ही माहिती भरल्यानंतर तुमचा सातबारा उतारा याचा तपशील तुम्हाला भरावा लागेल असे की तुमचा गट नंबर तुमच्या वैयक्तिक मालकीची जमीन संयुक्त मालकीची जमीन सामाईक मालकीची जमीन त्यानंतर सिंचनाखालील क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र अशी सर्व माहिती तुमचा सातबारा उतारा वरून पाहून भरून घ्यायची त्यानंतर खाली तुम्हाला जमिनीचा तपशील जतन करा हे बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून माहिती सेव्ह करून घ्यायची.
- एवढी सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या प्रोफाइल च्या बाजूला मुख्यपृष्ठ वरती पिकाचा तपशील सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे तिथे तुमचा गट नंबर निवडायचा हंगाम निवडायचा पिकाचा प्रकार पिक निवडायचे त्यानंतर खाली पिकाचा समावेश करा असे बटण दिसेल त्याच्यावर क्लिक करून पिकाचा समावेश करायचा.
- त्यानंतर मुख्यपृष्ट नावाच्या बटनावर क्लिक करायचे तिथे तुम्हाला अर्ज करा असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर सिंचन साधने व सुविधा असा पर्याय दिसेल तिथे तुम्हाला बाबी निवडा या बटनावर क्लिक करावे लागेल.
- परत इथे तुम्हाला तुमच्या पिकाबद्दल ची ठिबक सिंचन बद्दल ची माहिती भरावी लागेल ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ठिबक सिंचन किंवा तुमचे पिकाची लागवड किती अंतरावर तुम्ही करणार आहेत ती माहिती भरावी लागेल.
- पिकाची माहिती ॲड झाल्यानंतर परत मुख्यपृष्ठ त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अर्ज करा हा पर्याय पुन्हा तुम्हाला दिसेल त्यानंतर अर्ज सादर करा हा पर्याय तुम्हाला दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.
- तुम्हाला तिथे तुम्ही निवडलेल्या बाबींना क्रम द्यायला विचारले जाईल तो क्रम तुम्ही द्यायचा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे.
- तुम्हाला 29 रुपये तिथे पेमेंट करावी लागेल तुम्ही फोन पे गुगल पे किंवा डिजिटल पेमेंट मोड द्वारे पेमेंट करून घ्यायची त्यानंतर त्याची पावती तुम्हाला मिळेल त्याची कुठेही बाहेरून प्रिंट काढून किंवा स्क्रीन शॉट काढून घ्यायचा.
- त्यानंतर मुख्यपृष्ठावर जाऊन मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करायचे तिथे तुम्हाला तुमचा अर्ज छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायांमध्ये दिसेल. तिथून तुम्हाला पोहोच पावती डाउनलोड करावी लागेल.
- फी ची पावती आणि पोहोच पावती याची प्रिंट काढून घ्यायची. महाडीबीटी द्वारे ठिबक सिंचनाचा अर्ज केल्यास अर्जाची निवड लॉटरी पद्धतीने होत असते त्यामुळे तुम्हाला इथे वाट पाहावी लागेल किंवा तुमच्या जवळच्या कृषी केंद्राला जाऊन भेट द्यावी लागेल.
- तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला वेबसाईट वरती तुमच्या प्रोफाईल मध्ये लॉगिन करून काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल जसे की सातबारा उतारा खाते उतारा बँक पासबुक तसेच तुम्ही घेत असलेल्या ठिबक सिंचन ची खरेदीची पावती.
- ही होती महाडीबीटी द्वारे ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल मधून अर्ज कसा करायचा त्याची माहिती. शेतकरी बंधूंनो या आर्टिकल मध्ये तुम्हाला ठिबक सिंचन योजना 80 टक्के अनुदान याचा फार्म मोबाईल मधून कसा भरायचा याची सविस्तर माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत देण्यात आलेली आहे तुम्हाला माहिती आवडली असल्यास तुमच्या इतर शेतकरी बांधून मध्ये शेअर करायला विसरू नका.
ठिबक सिंचन योजने बद्दल काही प्रश्न व उत्तरे
प्रश्न : ठिबक सिंचन अर्ज मोबाईल मधून भरू शकतो का ?
उत्तर : हो, ठिबक सिंचन योजना आज मोबाईल मधून भरू शकता वरती तुम्हाला मोबाईल मधून ठिबक सिंचन योजना फॉर्म कसा भरायचा याची सर्व माहिती दिली आहे.
प्रश्न : ठिबक सिंचन योजना फॉर्म भरण्याची वेबसाईट कोणती ?
उत्तर : ठिबक सिंचन योजना फॉर्म भरण्याची ही https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login वेबसाइट आहे.
प्रश्न : ठिबक सिंचन योजना फार्म भरल्यानंतर किती टक्के अनुदान मिळेल.
उत्तर : राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार ठिबक सिंचन योजनेचा फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला ऐंशी टक्के अनुदान मिळू शकते.
प्रश्न : ठिबक सिंचन योजना फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते ?
उत्तर : ठिबक सिंचन योजना फॉर्म भरत असताना खाली दिलेले डॉक्युमेंट लागतात.
1. शेतकऱ्याचे आधार कार्ड
2. बँक खाते पासबुक
3. सातबारा उतारा व खाते उतारा.
4. ईमेल आयडी व मोबाईल नंबर
प्रश्न : ठिबक सिंचन योजना फार्म मोबाईल मधून भरण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ?
उत्तर : ठिबक सिंचन योजना फार्म मोबाईल मधून बघण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे शेतकऱ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तरच शेतकरी मोबाईल मधून फॉर्म भरू शकता.