पॅन कार्ड – 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे पॅन कार्ड कसे काढायचे.- Minor Pan Card Apply Online in Marathi

Minor Pan Card Apply Online in Marathi : मित्रांनो सध्याच्या डिजीटल युगात लहान मुलांना सुद्धा पॅन कार्डची गरज भासत आहे. तर अशा परिस्थितीत लहान मुलांचे पॅन कार्ड किंवा अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड कसे काढायचे म्हणजेच आपण म्हणू शकतो 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे पॅन कार्ड कसे काढायचे. त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे देणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत वाचायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मोबाईल मधूनच तुमच्या मुलाचे पॅन कार्ड किंवा तुमच्या स्वतःचे पॅन कार्ड काढता येईल. 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाच्या पेन काढलाच Minor Pan Card असे म्हटले जाते. तर मग चला पाहूया अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड कसे काढले जाते तेही घरी बसून मोबाईल च्या मदतीने.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लहान मुलाचे पॅन कार्ड काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ? (documents required for minor pan card)

1. मुलाचे आधार कार्ड

2. जन्म दाखला ( आधार कार्ड वरती जन्मतारीख पूर्ण असेल तर आवश्यकता नाही)

3. वडीलांचे आधार कार्ड

4. दोन पासपोर्ट साईज फोटो

5. मोबाईल नंबर, ईमेल आयडी

 

18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलाचे पॅन कार्ड असे काढा ? ( Child Pancard, Minor Pan Card, Below 18 Pancard)

लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे त्याची सविस्तर माहिती स्टेप-बाय-स्टेप खाली दिलेली आहे. त्याच्या साठी खाली दिलेली माहिती व्यवस्थितपणे वाचा.

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये खालील दिलेली वेबसाईट उघडावी लागेल.

https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

  • वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल त्याच्यात दिलेली माहिती भरा जसे की
  • Application Type मध्ये New Pan Indian Citizen (Form 49A) सिलेक्ट करा.
  • Category मध्ये Individual सिलेक्ट करा.
  • तुमच्या Gender नुसार Title निवडा
  • तुमचे Last Name, First Name, Middle Name टाका.
  • तुमची जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी टाका.
  • खाली एका ठिकाणी कुमार करायला सांगितले जाईल तिथे टिक मार करा त्याचा कोड व्यवस्थितपणे टाका आणि Submit बटनावर क्लिक करा.
  • एवढे सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला टोकन नंबर मिळेल त्याचा स्क्रीन शॉट काढा किंवा एका वहीवर लिहून घ्या. त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर परत एक नवीन फॉर्म ओपन होईल.
  •  त्याच्या तुम्हाला Forword Document Physically हा पर्याय निवडायचा.
  • तुम्हाला तिथे तुमच्या आधार कार्ड चे शेवटचे चार अंक टाकायला विचारले जाईल. त्याचबरोबर तुमच्या आधार कार्ड वरती तुमचे नाव जसे असेल तसे तसे टाका.
  • त्यानंतर तुमचे जेंडर निवडावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव टाकावे लागेल. वडिलांचे नाव टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे.
  • परत तुमच्या सोबत दुसरे पेज उघडेल तिथे तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला दोन पर्याय देण्यात येतील ऑफिशियल ऍड्रेस आणि रेसिडेन्सी ऍड्रेस तर तुम्ही रेसिडेन्सी ऍड्रेस हा पर्याय निवडायचा.
  • त्यानंतर फक्त रेसिडेन्सी ड्रेसच्या पर्या खाली तुमचा पत्ता न चुकता व्यवस्थितपणे टाका.
  • त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक पर्याय असेल तिथे Yes या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या वडिलांची माहिती टाका. जसे की नाव पत्ता जन्मतारीख अशी सर्व माहिती टाकल्यानंतर Next बटणावर क्लिक करा.
  • परत तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला एक कोड निवडावा लागत असतो. सर्वात आधी तुमचे राज्य निवडा तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर खाली तुम्हाला नवीन पर्याय येतील त्याच्यातून परत तुमचा जिल्हा निवडायचा आणि Next बटणावर क्लिक करायचे.
  • त्यानंतर परत तुमच्या समोर शेवटचे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला डॉक्युमेंट निवडावे लागेल जसे की नावाचा पुरावा, तुमच्या ऍड्रेस साठी पुरावा, तुमच्या जन्मतारखेचा पुरावा. हे सर्व निवडल्यानंतर खाली रिप्रेझेंटेटिव्ह निवडावा लागेल प्लेस म्हणजे जागेचे नाव तिथे तुमचा तालुका किंवा जिल्ह्याचं नाव टाकू शकता.
  • सर्व माहिती अचूकपणे भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे. त्यानंतर फॉर्म कन्फर्म करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड चे पुढचे आठ अंकात टाकायला विचारले जाईल ते आठ अंक न चुकता टाकावे लागतील. त्यानंतर फार्म एकदा चेक करून घ्या पुढे तुम्हाला फॉर्म एडीट करता येणार नाही माहिती बरोबर असेल तर खाली सबमिट बटणावर क्लिक करायचे.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला 107 रुपयाची पेमेंट करावे लागेल ती तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑनलाईन करू शकता.
  • पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला आधार अथेंतिकेशन करण्याचा पर्याय येईल त्याच्यावर टिकमार्क करून आधार अथेंतिकेशन करून घ्यायचे.
  • आधार अथेंतिकेशन झाल्यानंतर तुमच्यासमोर जनरेट प्रिंट नावाचा पर्याय येईल त्याच्यावर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करायचा. तिथे तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल तुमची जन्मतारीख तेथे पासवर्ड असेल उदा : 12/12/2012 तर पासवर्ड असेल 12122012.
  • फॉर्म डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढायची त्याच्यावर दोन फोटो चिटकवायचे फोटोच्या खाली तुम्हाला तुमची सही करावी लागेल त्यानंतर फॉर्म च्या दुसऱ्या पेज वरती पण खाली बॉक्समध्ये सही करावी लागेल फॉर्म भरल्यानंतर.
  • त्याच्या सोबत तुम्हाला काही कागदपत्रे जोडावी लागते फार्म भरत असताना जी कागदपत्रे तुम्ही निवडली होती नावाचा पुरावा तुमच्या एड्रेस पुरावा जन्मतारखेचा पुरावा तसेच तुमच्या वडिलांच्या आधार कार्ड चे झेरॉक्स जोडावे लागेल.
  • सर्व कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर हा फॉर्म स्पीड पोस्ट ने पॅन कार्ड ऑफिस ला पाठवावा लागेल. खाली दिलेल्या पत्त्यावर ती तुम्ही हा फॉर्म पाठवायचा.

Address : Protean eGov Technologies Limited 4th floor, Sapphire Chambers, Baner Road, Baner, Pune – 411045

  • भारतातील इतर दुसऱ्या राज्यातील असाल तर Address येथे पहा 👉 More Address
  • फार्म पाठवल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या आत पोस्टाद्वारे तुमच्या घरी तुमचे पॅन कार्ड घेऊन जाईल.

लहान मुलांचे  पॅन कार्ड बद्दलची काही प्रश्नांची उत्तरे (Minor Pan Card Some Questions and Answer)

 

प्रश्न : 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली मुले पॅन कार्ड काढू शकता का ? (Can below 18 make Pan Card?)

उत्तर : हो, 18 वर्षापेक्षा कमी वय असलेले मुले पॅन कार्ड काढू शकतात त्याच्यासाठी वरती दिलेली माहिती वाचा तुम्ही पण पॅन कार्ड काढू शकता.

प्रश्न : लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे? (How can I get minor PAN Card?)

उत्तर : ह्या आर्टिकल मध्ये वरती लहान मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे याची सर्व माहिती दिली आहे ती माहिती वाचून तुम्ही लहान मुलांचे पॅन कार्ड काढू शकतात.

प्रश्न : लहान मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट ? (Documents Required for minor pan card?)

उत्तर : लहान मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी खालील दिलेले डाकुमेंट ची गरज भासते.

1. आधार कार्ड

2. शाळेचा दाखला (आधार कार्ड वरती जन्मतारीख पूर्ण असेल तर गरज नाही)

3. वडीलांचे आधार कार्ड.

4. मोबाईल नंबर व ईमेल आयडी

प्रश्न : अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड काढण्यासाठी किती वय लागते ? (minor pan card age limit?)

उत्तर : लहान मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी वय 1 वर्षापासून ते 18 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे.

प्रश्न : लहान मुलांचे पॅन कार्ड असते का ? (Can a Minor Pan Card?)

उत्तर : हो, लहान मुलांचे पण पॅन कार्ड आता काढता येते ज्यांचे वय 1 वर्षापासून ते 18 वर्ष पर्यंत असेल अशा मुलांचे पॅन कार्ड काढता येते.

प्रश्न : मी अठरा वर्षाच्या आधी पॅन कार्ड काढू शकतो का? (Can I make PAN Card Before 18?)

उत्तर : हो, तुम्ही अठरा वर्षाच्या आधी पॅन कार्ड काढू शकतात त्याच्यासाठी वरती माहिती दिली आहे त्याचा वापर करून मोबाईल मधूनच तुम्ही अर्ज करू शकतात.

प्रश्न : लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या पॅन कार्ड नंबर मध्ये बदल होतो का? (Does PAN Number Change Form Minor To Major?)

उत्तर : नाही, लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या पॅनकार्ड नंबर मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही फक्त फोटो बदलला जाऊ शकतो जन्मतारीख बदलली जाऊ शकते तसेच नावात बदल करू शकता पण पॅन कार्ड नंबर तसाच राहतो.

प्रश्न : लहान मुलांच्या पॅन कार्ड वरती फोटो येतो का ? (minor pan card photo?)

उत्तर : नाही, लहान मुलांच्या पॅन कार्ड म्हणजेच अठरा वर्ष आतील मुलांच्या पॅन कार्ड वर फोटो येत नाही.

प्रश्न : पॅन कार्ड काढण्यासाठी मोबाईल मधून अर्ज करू शकतो का ? ( I Can Apply Pan card in mobile ?)

उत्तर : हो, तुम्ही मोबाईल मधून पॅन कार्ड चा अर्ज भरू शकता.

प्रश्न : पॅन कार्ड काढण्याची वेबसाईट कोणती ? (NSDL Pan card official website link?)

उत्तर : ही NSDL ची official website आहे. https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top