दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना | Dushkalgrast Shetkari Riksha Sanmman Yojana

दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना | Dushkalgrast Shetkari Riksha Sanmman Yojana

Dushkalgrast Shetkari Riksha Sanmman Yojana – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना १ लाख रिक्षा वाटप केल्या जाणार आहेत. या बद्दल अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तर “अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना” असे या शेतकरी रिक्षा सन्मान योजनेचे अधिकृत नाव ठेवण्यात आले आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना रिक्षा मिळेल. योजनेसाठी पात्रता काय आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना संपूर्ण उपलब्ध माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dushkalgrast Shetkari Riksha Sanmman Yojana

One lakh rickshaws will be distributed to drought-affected farmers in Maharashtra. This information has been officially announced by Maharashtra State Transport Minister Pratap Sarnaik. The scheme has been named “Anathacha Nath – Drought-Affected Farmer Rickshaw Samman Yojana.”

Now, which farmers will be eligible to receive a rickshaw? What are the eligibility criteria for this scheme? Below, we have provided all the available details about the Drought-Affected Farmer Rickshaw Samman Yojana.

योजनेचे नाव आणि उद्देश थोडक्यात माहिती

  • योजनेचे नाव – अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना
  • योजना कालावधी – 2027 ते 2031
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – परिवहन विभाग
  • मुख्य उद्देश – दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शेतीसोबत अतिरिक्त रोजगार आणि उत्तपन्न मिळवून देणे
  • किती रिक्षा वाटप होणार – 1 लाख रिक्षा
  • लाभार्थी – 310+ दुष्काळग्रस्त तालुक्यातील पात्र शेतकरी
  • निवड पद्धत – संगणकीय लॉटरी

योजनेसाठी पात्रता | Eligibility Criteria

सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना बद्दल केलेल्या घोषणानुसार खालील पात्रता

  • महाराष्ट्र दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकरी
  • अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी
  • रिक्षा परवाना सरकार कडून दिला जाणार आहे.
  • शेतकरी कडे रिक्षा चालवण्यासाठी पात्र ड्राइविंग लाइसेंस पाहिजे.

अर्ज कुठे आणि कसा करावा | How to apply Riksha Sanmman Yojana

सध्या या योजनेसाठी कोणतीही अधिकृत अर्ज प्रक्रिया घोषित करण्यात आलेली नाही कीव जाहीर झालेली नाही, पण महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र सरकार कडे आहे आणि त्याच यादीचा वापर करून संगणकीय सोडत लावली जाईल. त्यामुळे अस वाटत आहे की योजनेसाठी अर्ज मांगविले जाणार नाहीत. तरी योजनेअंतर्गत कधी अधिकृत माहिती आली तर अपडेट करण्यात येईल.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रिक्षा कशा वाटप होणार? | Farmers Rickshaw Scheme

महाराष्ट्र राज्यच्या परिवहन मंत्रींनी दिलेल्या माहिती नुसार “अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना” अंतर्गत 1 लाख रिक्षा वाटप होतील. पण एकाचवेळी या सर्व रिक्षा वाटप होणार नाहीत. तर 2027 ते 2031 या कालावधीत दर वर्षी 20,000 हजार रिक्षा वाटप होतील, त्या खालील प्रमाणे.

202720,000
202820,000
202920,000
203020,000
203120,000

दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना कधी सुरू होणार?

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच 09 फेब्रुवारी 2027 रोजी पहिली रिक्षा वितरित करण्यात येणार आहे.

  • योजना सुरू होण्याचे वर्ष – फेब्रुवारी 2027
  • पहिली रिक्षा वितरण – 9 फेब्रुवारी 2027
  • पहिल्या टप्प्यातील लाभ – 20,000
  • रिक्षा वाटप कसे होईल – संगणकीय लॉटरी

रिक्षा परवाना Badge कसे मिळेल

महाराष्ट्र रिक्षा परवाना देणे बंद करण्यात आले होते. पण या योजनेकरिता 1 लाख परवाने महाराष्ट्र आरटीओ मार्फत उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज नाहीये. तसेच योजनेच्या घोषणेनुसार रिक्षा परवाना, बॅज आणि परमिट शुल्क माफ केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण या सर्व गोष्टी अधिकृत शासन निर्णय (GR) आल्यानंतरच कळतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top