Ladki Bahin Yojana New Update: 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana New Update: 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana New Update – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 5 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. याबाबतची अधिकृतपणे माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी Twitter वर पोस्ट करून सांगितलेले आहे. आता या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात आले आहे. संपूर्ण माहिती समजून खाली दिले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 Lakh Beneficiaries Disqualified! Latest Update on Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 5 लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. त्याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे स्पष्ट माहिती दिली आहे ती खालील प्रमाणे.
आदिती तटकरे Twitter पोस्ट द्वारे कळवतात की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना !
दिनांक 28 जून 2024 दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
1) संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2,30,000
2) वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1,10,000
3) कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या, तसेच नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1,60,000
अशा एकूण अपात्र महिला – 5,00,000 आहेत.

5 लाख लाडक्या बहिणी अपात्र!

Ladki Bahin Yojana New Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली होती. त्याचवेळी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेमार्फत लाभ भेटणार नाही. तरी त्या नियमांचे पालन न करता महिलांनी अर्ज केलेले होते. त्या अनुषंगाने त्या महिला पात्र ठरत नाही. म्हणून त्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ भेटणार नाही. तसेच लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांकडून सह्या घोषणापत्र भरून घेतले जात होते त्यावरती या नियम अटी स्पष्टपणे दिलेल्या होत्या. तरी त्यांचे पालन न करता पाच लाख महिलांनी अर्ज केलेले होते. त्या नियम व अटींची पडताळणी केल्यानंतर या महिलांना यापुढे आता लाभ दिला जाणार नाही.

अपात्र महिलांना पैसे परत करावे लागतील का?

तर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत अधिकृतपणे मीडियासमोर माहिती दिली होती. की ज्या महिला पुढे होणाऱ्या पडताळणीमध्ये अपात्र ठरतील अशा महिलांकडून कुठल्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही. कारण जेव्हा फॉर्म ची तपासणी झाली त्यावेळी त्या महिला तपासणी करून पात्र ठरवण्यात आल्या होत्या. पण त्या महिलांना स्वतःहून पैसे परत करायचे असतील तर करू शकता. पण महिला पात्र ठरल्यानंतर पुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top