आधार कार्ड चे नाव कसे अपडेट करायचे मोबाईल मधून 2022 मध्ये | How To Update Aadhaar card name in online 2022 mobile

How To Update Aadhaar card name in online mobile : आधार कार्ड खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. तुम्ही जर का पाहिले तर खूप लोकांच्या आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम आहेत कोणाचे नाव चुकीचे कोणाचा पत्ता चुकीचा कोणाचे जन्म तारीख चुकीची असे खुप सारे चुका आधार कार्ड मध्ये तुम्हाला सापडतील तर आपण आज पाहणार आहोत. तुमच्या आधार कार्डवर चे नाव जर चुकले असेल तर तुम्ही कुठेही न जाता मोबाईल मधूनच आधार कार्ड वरचे नाव अपडेट करू शकतात (update aadhar card name) त्याच्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या स्टेप चा वापर करून आधार कार्ड अपडेट करावे लागेल. पण मोबाईल मधून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही हे काम मोबाईल मधून करू शकता. तर मग चला पाहूया आधार कार्ड मोबाईल मधून कैसे अपडेट करायचे किंवा आधार कार्ड मधील नावात बदल कसा करायचा तोही मोबाईल मधून.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आधार कार्ड वरील नाव कसे अपडेट करायचे – How to update aadhar card name online

1) सर्वात आधी खालील दिलेल्या वेबसाईट वरती जायचे.

https://myaadhaar.uidai.gov.in/

2) तुम्हाला “Login” बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

3) त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा संकेतांक टाकायचा “Send OTP” या बटनावर क्लिक करायचे.

4) तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आणि “login” बटनावर क्लिक करायचे.

5) तुम्हाला तिसऱ्या नंबर वरती ” Update Aadhar Card online” असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

6) त्यानंतर तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील त्याच्या मधून “Name Change” ह्या पर्यायावर क्लिक करायचे.

7) त्यानंतर तुम्हाला काही सूचना दिसतील त्या वाचून घ्या त्यानंतर “procced to update aadhar” या पर्यायावर क्लिक करायचे.

8) तुम्हाला तुमचे आधीचे नाव दिसेल, त्याच्याखाली तुम्हाला नाव अपडेट करण्यासाठीचा पर्याय दिसेल.

9) तिथे तुम्हाला जे नाव अपडेट किंवा बदल करायचा आहे ते नाव टाका.

10) तुम्हाला एखादे डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल तुम्हाला लिस्ट दिसेल त्याच्यातून तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करायचे.

11) त्यानंतर “Next” बटणावर क्लिक करायचे. पुढे काही चेक बॉक्स असतील त्याच्यावर क्लिक करायचे आणि “Next” बटनावर क्लिक करायचे.

12) आता येथे तुम्हाला पन्नास रुपये ऑनलाइन पेमेंट करावी लागेल पेमेंट करून घ्या.

13) पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पावती डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करून पावती डाऊनलोड करून घ्या.

14) तुम्ही जर का बरोबर कागदपत्र अपलोड केले असेल तर पाच ते सात दिवसाच्या आत तुमचे आधार कार्ड अपडेट होईल म्हणजे तुमच्या आधार कार्डवर चे नाव अपडेट होईल.

15) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल च्या मदतीने घरी बसूनच आधार कार्ड अपडेट करू शकतात.

आधार कार्ड अपडेट झाले की नाही कसे चेक करायचे – How to Check Aadhar card Update Status in mobile

1) सर्वात आधी खालील दिलेल्या वेबसाईट वरती जायचे.

https://myaadhaar.uidai.gov.in/

2) तुम्हाला “Login” बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

3) त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा संकेतांक टाकायचा “Send OTP” या बटनावर क्लिक करायचे.

4) तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आणि “login” बटनावर क्लिक करायचे.

5) त्यानंतर सर्वात खाली जायचे ” Aadhar Update Query” मध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट झाले आहे की नाही त्याबद्दल माहिती मिळेल.

6) अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट झाले की नाही चेक करू शकता.

 

आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर कसे डाउनलोड करायचे | How to Download Aadhar card after Update

1) सर्वात आधी खालील दिलेल्या वेबसाईट वरती जायचे.

https://myaadhaar.uidai.gov.in/

2) तुम्हाला “Login” बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

3) त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा संकेतांक टाकायचा “Send OTP” या बटनावर क्लिक करायचे.

4) तुमच्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकायचा आणि “login” बटनावर क्लिक करायचे.

5) तुम्हाला ” Download Aadhar” असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे.

6) तुमचे आधार कार्ड मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल.

7) त्याला पासवर्ड असतो उदाहरण म्हणून तुमचे नाव आधार कार्ड वरती ANIKET असेल आणि जन्म वर्ष 1990 असेल तर तुमच्या आधार कार्ड चा पासवर्ड ANIK1990 असा असेल.

8) अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top