आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा | How to link mobile number to aadhar card in marathi

How to link mobile number to aadhar card in marathi : आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा हा प्रश्न खूप दा विचारला जातो. जर का तुम्ही पाहिले तर शंभर लोकांमधून फक्त 10 लोकांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल. आपल्या यूट्यूब चैनल वर ती (Computer World Center) आधार कार्ड अपडेट करण्याची सेरीज चालू आहे. ह्या सेरीज मध्ये आतापर्यंत आधार कार्ड चा अड्रेस मोबाईल मधून कसा बदलायचा. तसेच आधार कार्ड वरील नाव कसे अपडेट करायचे हे दोन व्हिडिओ टाकले आहेत. याच्यातच खूप सार्‍या कमेंट येऊ लागल्या की आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा. त्याबद्दल माहिती देण्यासाठी हे आर्टिकल लिहित आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

aadhar card la mobile number kasa link karayacha

मित्रांनो आधार कार्ड बद्दल ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल. की तुम्ही आधार कार्ड ला मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल मधूनच अपडेट करू शकतात की नाही. आणि करता येऊ शकत असेल तर कसा करायचा व आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करता येत नसेल तर कुठून करायचा अशी सर्व माहिती तुम्हाला खाली दिली आहे.

 

आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा ? (How to link mobile to Aadhar Card ?)

आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही पाहिले तर तुमच्या आज घरातील खूप सार्‍या व्यक्तींचे अजून आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक झाला नसेल. तर मग आधार कार्ड ला मोबाईल नंबर मोबाईल मधूनच लिंक करता येतो का. तर याचे उत्तर नाही हे आहे. आधार कार्ड ला मोबाईल नंबर आपण स्वतः लिंक करू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटर ला जाऊन आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करावा लागतो.

तुम्ही मोबाईल मधून फक्त एवढे काम करू शकता आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी अपॉईंटमेंट बुक करू शकतात. जर तुम्हाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर आधार सेंटर लाच जाऊन करावा लागतो. तुम्हाला कोणी सांगत असेल की मोबाईल मधूनच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करता येतो तर हे खोटे आहे.

हो मात्र तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर आधार कार्ड मध्ये काही बदल करू शकता. जसे की आधार कार्ड वरचा पत्ता मोबाईल मधून बदलू शकता. त्याच बरोबर आधार कार्ड वरील नाव अपडेट करु शकता मोबाईल मधून. तसेच आधार कार्ड वरील जन्म तारीख अपडेट करू शकता मोबाईल मधून. हे काम तुम्ही मोबाईल मधून करू शकता. याबद्दलचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वरती उपलब्ध आहेत की आधार कार्ड मोबाईल द्वारे कसे अपडेट करायचे येथे क्लिक करून तुम्ही सर्व व्हिडीओ पाहू शकता.

 

आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा | How to update aadhar card link mobile number in marathi ?

तुमच्या आधार कार्ड ला आधीपासून लिंक असलेला मोबाईल नंबर पण तुम्ही अपडेट करू शकता. पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जवळच्या आधार सेंटरला भेट देऊन हे काम करावे लागेल. तुम्ही स्वतः मोबाईल मधून हे काम करू शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top