Ladki Bahin Yojana eKYC Status Check Online – महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरजू व गरीब महिलांना साक्षरता व आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्या महिलांना दरमहा 1500 रुपये महिना दिला जातो. परंतु सध्या योग्य पात्र लाभार्थी ओळखण्यासाठी व त्याची पडताळणी करण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना eKYC प्रक्रिया करायला सांगितले आहे. खूप सार्या लाभार्थ्यांची eKYC सुद्धा झालेले आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर की केवायसी झाल्यानंतर पुन्हा केवायसी खरच झाले आहे की नाही त्याचं स्टेटस कसे चेक करायचे. त्याची A to Z स्टेप by स्टेप प्रोसेस खाली दिली आहे.
Ladki Bahin Yojana eKYC Status Check Online
The Government of Maharashtra has launched the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana to support underprivileged women by providing a monthly allowance of ₹1,500 to eligible beneficiaries. To identify and verify genuine applicants, all beneficiaries are required to complete the eKYC process. Many women have already finished eKYC, but a common challenge is how to check whether eKYC is actually completed and approved. This guide offers an A to Z, step-by-step eKYC status check for the Majhi Ladki Bahin Yojana covering how to verify completion, confirm approval, and troubleshoot common issues so Maharashtra women can quickly check eKYC status online, ensure eligibility, and receive timely benefits under the scheme.
सर्वांनी स्टेटस चेक करा | Ladki Bahin eKYC Status Check Online
तुम्ही केलेली माझी लाडकी बहीण योजना ई – केवायसी झाली की नाही कशी चेक करायची स्टेटस कसे चेक करायचे Step by Step प्रोसेस पाहूया.
- सर्वात आधी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- Website – https://ladakibahin.maharashtra.gov.in
- आता “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे” असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता eKYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे पेज ओपन होईल.
- मग लाभार्थी आधार क्रमांक टाका, Captcha टाका.
- खाली “मी सहमत आहे” हा पर्याय सिलेक्ट करा त्यानंतर OTP पाठवा यावर क्लिक करा.
- जर तुमची eKYC Successful झाली असेल तर. “या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे” असा मेसेज दाखवला जाईल.
- त्याऐवजी OTP Send झाला, म्हणजे तुमची केवायसी बाकी आहे, OTP टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता, की तुमची लाडकी बहीण योजना eKYC झाली की नाही.

