📃 पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Police Bharti Document List Ground Physical Required Documents List in Marathi

Police bharti documents list 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Police Bharti Document List 2024-25 : मित्रांनो पोलीस भरती म्हटले म्हणजेच डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. जे मुलांना भरती निघण्याआधी काढून घेतलेले बरे. कारण भरती निघाल्यानंतर मुलांची धावपळ होते. त्याच कारणास्तव या लेखांमध्ये खाली तुम्हाला पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते. त्याची पूर्ण यादी देण्यात आलेली आहे. त्या यादीत देण्यात आलेले सर्वच कागदपत्रे तुम्हाला लागतील असं नाही. त्या यादीमध्ये काही आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेले आहेत. तर काही इतर कागदपत्रे. ज्याच्यात मुलगा कोणता प्रवर्गाचा आहे त्याचा शिक्षण किती झालं आहे. त्या पद्धतीने ती कागदपत्रे लागतात. तर माहिती खूप महत्त्वाचे आहे नक्की वाचा.
[Police bharti documents list. maharashtra police bharti documents verification list 2024-25 in marathi. download police bharti documents list pdf. police bharti sathi laganare aavashyak kagadpatre in marathi]

 

पोलीस भरती मैदानी चाचणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

Police Bharti 2024 Required Document List in Marathi – पोलीस भरती मैदानी चाचणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तुम्ही जर का पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंट घेऊन गेले नाही तर तुम्हाला पोलीस भरती मैदानी चाचणीचा पात्र ठरविण्यात येते. त्यामुळे तुमच्यासाठी खाली आवश्यक असलेल्या कागदपत्रांची लिस्ट देण्यात आली आहे. या लिस्टमध्ये देण्यात आलेल्या व तुमच्या शिक्षण पात्रतेनुसार व तुमच्या पात्रतेनुसार आवश्यक असलेले डॉक्युमेंट चेक करा आणि त्यांचे झेरॉक्स तसेच ओरिजनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावे लागेल. (police bharti documents verification list)

 

Police bharti documents list 2024
Police bharti documents list 2024

पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Maharashtra Police Bharti 2024 Document List in Marathi

खाली देण्यात आलेले कागदपत्रे प्रत्येकाला लागतीलच असे नाही, कागदपत्रे ही उमेदवाराच्या शिक्षण पात्रतेनुसार व त्याचे कॅटेगिरी नुसार लागतात. तुमचं जेवढे शिक्षण झालेलं असेल त्याच शिक्षण पात्रतेचे कागदपत्रे तुम्हाला लागतील. तसेच तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक होमगार्ड असाल तरच हे कागदपत्रे लागतील. या पातळीवर तुम्ही बसत नसाल तर त्या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता नाही.
1) 10 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
2) 12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
3) पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
4) मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष/ द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
5) पद्वित्तीर्ण पदवी असल्यास प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
6) ITI/डिप्लोमा मार्कशीट
7) शाळा सोडल्याचा दाखला
8) शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट
9) जातीचे प्रमाणपत्र
10) वयाचा दाखला
11) अधिवास प्रमाणपत्र
12) नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट
13) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
14) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
15) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
16) भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
17) विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
18) वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र (असल्यास)
19) होमगार्ड प्रमाणपत्र (असल्यास)
20) आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन
21) माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
22) माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन (असल्यास)
23) चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top