Gram panchayat nivadanuk kagadpatre pdf : या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत सरपंच निवडणुकीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे pdf, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार पात्रता आणि ग्रामपंचायत निवडणूक फॉर्म कसा भरायचा तसेच ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार पात्रता नियम व अटी अशी सर्व माहिती तुम्हाला येथे मराठी भाषेत मिळणार आहे.
प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायत कार्यालय व गावाची देखरेख करणारा व्यक्ती म्हणजे सरपंच. तर प्रत्येकाची इच्छा असते की गावात आपण सरपंच व्हायचे निवडणूक लढवायची परंतु सरपंच निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी किंवा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? सरपंच निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियम व अटी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल.
सरपंच निवडणुकीसाठी पात्रता – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता | Sarpanch Nivadanuk Patrata
तुम्हाला जर सरपंच निवडणुकीसाठी उभे राहायचे असेल तर खाली दिलेले पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
1) सरपंच निवडणुकीत उभी राहणारी व्यक्ती भारतीय असावी.
2) उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.
3) ज्या ग्रामपंचायत साठी निवडणूक लढत आहेत त्या ग्रामपंचायतीचा मतदाता असणे आवश्यक आहे.
4) उमेदवाराकडे ग्रामपंचायत तिचा कोणताही कर घरपट्टी पानपट्टी थकबाकी नसावी.
5) उमेदवार हा शासकीय व सरकारी कर्मचारी नसावा.
6) उमेदवाराच्या नावावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा.
7) ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त मुलं किंवा आपत्य नसावेत.
8) उमेदवार हा कमीत कमी सातवी पास असणे आवश्यक आहे.
सरपंच होण्यासाठी शिक्षणाची अट किती ? | Gram Panchayat Election Qualification
ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी किंवा सरपंच निवडणुकीत उभे राहण्यासाठी व्यक्ती हा सुशिक्षित असणे आवश्यक आहे. सरपंच उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी निवडणूक विभागाने शिक्षणाची अट लावली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणारा उमेदवार हा कमीत कमी किमान सातवी (7 वी) पास असणे आवश्यक आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त.
ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी वयाची अट किती ? | Gram Panchayat Election Age Limit
ग्रामपंचायत निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी वयाची अट किती किंवा सरपंच बनण्यासाठी वयाची अट किती असा प्रश्न सहजच आपल्या मनात येत असतो त्याचे उत्तर तुम्हाला येथे नक्की दिले जाईल. तुम्हाला जर का सरपंच निवडणुकीत उभे राहायचे असेल तर तुमचे कमीत कमी वय हे 21 वर्षे असणे आवश्यक आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त.
ग्रामपंचायत निवडणूक फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरावा ?
सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी वयाची अट पात्रता कोणकोणते कागदपत्रे लागतात ही सर्व माहिती मिळाल्यानंतर उमेदवाराला ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. तर सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी हा ऑनलाइन अर्ज कोणत्या वेबसाईटवरून भरावा हा प्रश्न नक्कीच आपल्या मनात येतो. तर उमेदवार हा खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करून ग्रामपंचायत निवडणूक फॉर्म भरू शकतो.
🌐 वेबसाईट लिंक : Apply Online