चंद्रयान 3 मिशन संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या | Chandrayan 3 Mission Information in Marathi Chandrayan 3 Launch Date

Chandrayaan 3 in Marathi – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आतापर्यंत जे काही मोहिम हाती घेतल्या होत्या. त्या प्रकरपणे पार पाडल्या जसे की, मंगल यान ,चंद्रयान 1,चंद्रयान 2, या मोहीम भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) पार पाडल्या आहेत. परंतु चंद्रयान 2 चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान दोन ही मोहीम अपूर्ण राहिली होती. परंतु आता भारताने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. (चंद्रयान 3 मराठी माहिती)

चंद्रयान 3 मिशन काय आहे? (What is Chandrayan 3 Mission)

अनुक्रमणिका पहा
चंद्रावर जात असलेले हे भारतीय अंतराळ संशोधन (ISRO ) यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही असे सांगितल्याची माहिती आहे. म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञान करिता चंद्रयान 3 मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे . चंद्रयान 2 नंतर भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे. परंतु आपल्या देशातील( Technology )तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे.

एलव्हीएम (LVM) सोबत चंद्रयान 3 का जोडली गेली आहेत. (Why Chandrayaan 3 Joint With LVM)

एल व्ही एम (LVM)3 हे इस्रो चे अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण यान आहे.’ चंद्रयान 3′ ह्या यानात रोव्हर , लेंडर आणि प्रॉपलशन मोड्युल असल्यामुळे त्यांना स्वतः अंतराळात प्रवेश करता येत नाही. म्हणून ‘ LVM 3 ‘जोडण्याचे कारण असे आहे की , ‘LVM 3 ‘मध्ये पुढे ढकलण्याची क्षमता असते. ज्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होऊन उपग्रहासारख्या जड वस्तूंना अवकाशात उचलण्यासाठी लागणारी आत्यावश्यक असलेली ऊर्जा’ LVM 3′ तयार करू शकते. म्हणूनच एल व्ही एम(LVM) 3 हे प्रक्षेपण यान या चंद्रयान 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे दिसून येणार आहे (चंद्रयान 3 मराठी)

एल व्ही एम (LVM ) 3 म्हणजे काय? (What is LVM in Marathi)

एल व्ही एम (LVM) 3 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) चे अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यान आहे. एल व्ही एम ची उंची 43.50 मीटर उंच इतकी आहे. तर याचे वजन 640 टन आहे. एल व्ही एम मध्ये 8 ते 9 हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. भारतातील सर्वाधिक वजन असणारे प्रक्षेपण यान म्हणून एल व्ही एम (LVM) ओळखले जाते. एल व्ही एम चे तीन स्तर आहेत. 5 जून 2017 रोजी या प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने इस्रो ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘ जी एस एल व्ही एम के 3 ‘(GSLV MK 3) पहिली कक्षा चाचणी प्रक्षेपित केली होती. ‘एलव्हीएम3’ चे ‘चंद्रयान 3 ‘हे 7 प्रक्षेपण असणार आहे. ‘चंद्रयान 2’ चे प्रक्षेपणही 2019 मध्ये याच प्रक्षेपण अस्त्राद्वारे झाले होते. ‘एल व्ही एम 3’ मध्ये कमी उंचीच्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत म्हणून मानवी मोहिमांसाठी हे उपयुक्त असल्याचे इस्रो कडून सांगण्यात आले आहे. म्हणून ‘एल व्ही एम 3’ च्या मदतीने ब्रिटन स्थित वन वेब ग्रुप कंपनीचे 36 इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते.

चंद्रयान 3 प्रक्षेपण कधी आहे? (Chandrayan 3 Launch Date)

चंद्रयान 3 चे प्रक्षेपण जुलै महिन्या त होईल असे इस्रोचे अध्यक्ष ‘एम सोमनाथ’ यांनी सांगितले होते. एम सोमनाथ यांच्या सांगितल्यावरून 13 ते 19 जुलै पर्यंत चंद्रयान 3 प्रक्षेपित करण्याची शक्यता आहे. चंद्रयान तीन ची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इस्रो कडून ‘चंद्रयान 3’ ‘ एल व्ही एम 3’ ला जोडून टेस्टिंग आणि चेकिंग सुरू आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन या अंतराळ केंद्रावरून ‘चंद्रयान 3’ प्रक्षेपित करण्यात येईल.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

घरकुल यादी मोबाईल मध्ये पहा

हे यान चंद्रावर काय करणार आहे? (Chandrayaan 3 What it can do on Moon)

‘चंद्रयान 1’व ‘चंद्रयान 2’ हे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार होते . तर ‘चंद्रयान 3’ हे प्रत्यक्षात चंद्रावर उतरून आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. ‘चंद्रयान 3’ हे ‘चंद्रयान 2’ सारखेच असणार आहे. परंतु यावेळी फक्त लॅन्डर ,रोवर आणि प्रोपलशन मॉडेल असणार आहे. चंद्रयान 3 ही प्रॉपलशन मॉडेल लेंडर आणि रोव्हर हे चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेत घेऊन जाईल आणि चंद्रयान 3 अगदी सहजपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल चंद्रयान 3 मध्ये ऑर्बिट पाठवले जाणार नाही. कारण चंद्रयान 2 च्या ऑर्बिट कडून यासाठी मदत घेतली जाणार आहे.

इस्रो चंद्रयान 3 मोहीमचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत? (What is ISRO Chandrayaan 3 Mohim Objectives)

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्त्रोन यांनी जाहीर केले आहे की, भारत पुन्हा एकदा चंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 14 जुलै 2023 ला चंद्रयान 3 अवकाशात जाणार आहे. इस्रो चंद्रयान 3 ची मोहीम 24 तासांची रंगीत तालीम व लॉन्च रिहर्सल 11 जुलैला पार पडली. चंद्रयान 3 भारताच्या चंद्र अभियानातलं 3 रे यान आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगने उतरवण्याच्या प्रयत्न केला जाईल. या मिशनमध्ये सर्व प्रक्रिया चंद्रयान दोन सारखीच राहणार आहे. चंद्रावर याआधी अमेरिका चीन व रशिया हे देश गेले असून, या देशांनी कामगिरी साधली आहे.

चंद्रयान 2 आणि चंद्रयान 3 मध्ये काय फरक आहे? (What is Difference Between Chandrayan 2 and Chandrayan 3)

चंद्रयान 2 ही मोहीम चंद्रयान 1 नंतरची भारताची दुसरी चंद्र मोहीम होती. ती यशस्वी ठरली होती. यानंतर 22 जुलै 2019 रोजी दुसऱ्या चंद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले. परंतु चंद्रयान 2 मध्ये लॅन्डर आणि रोव्हर क्रॅश झाल्यामुळे भारताच्या दुसरे चंद्रयान अयशस्वी झाले. चंद्रयान 2 विक्रम ब्लेंडर अलगद उतण्याऐवजी चंद्रावर कोसळले त्यामुळे ज्या कारणामुळे चंद्रयान 2 अयशस्वी झाले त्यामध्ये महत्वाचे बदल करून चंद्रयान 3 हे याच्यात लॅन्डर रोव्हर आणि प्रॉपलशन मॉडेल चा वापर करण्यात आलेला आहे. चंद्राच्या पृष्ठावर अलगदपणे उतरवण्यास मदत होणार आहे असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंग हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

चंद्रयान 3 मोहीम चा एकूण बजेट किती (Total Budget Of Chandrayan 3)

चंद्रयान 3 मिशनचा एकूण बजेट 615 कोटी रुपये राहणार आहे. या बजेटला पाहिलं तर इतर देशांपेक्षा खूप कमी बजेट मानले जात आहे. यावेळेस इस्रो कमी बजेटमध्ये मोठी कामगिरी करणार आहे. चंद्रयान 3 आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा सेंटरमध्ये दुपारी 2:30 वाजेला प्रक्षेपण केले जाणार आहे.

Chandrayaan Mission 3 All Short Information in English

Chandrayan 3 Mission Information

Mission type

Lunar lander, rover,propulsion modul

Operator

Indian Space Research Organisation (ISRO)

Website

www.isro.gov.in

Mssion duration

14 days

Payload mass

Propulsion Module 2148 kg, Lander Module (Vikram) 1752kg including rover of 26kg Total 3900kg

Power

Propulsion Modul:758W Lander : 738W, WS with Bias Rover: 50W

Launch Date

14 July 2023 at 2:35 pm

Roket

LVM3 M4

Launch site

Satish Dhawan Space Center

Contractor

ISRO

Spacecraft component

Rover

Landing Date

23 August 2023

Landing site

69.367621 S, 32.348126 E

चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 मिशन का राबवण्यात आले (Chandrayaan 3 marathi)

चंद्रयान 1 हे भारतातील अंतराळ संशोधन संस्थेचे चंद्रावरील मोहिमेच्या पहिला टप्पा घेऊन जाणारे यान होते. चंद्रयान 1 मानवरहित अंतरिक्ष यान होते. चंद्रयान 1 मिशन दरम्यान चंद्रावरील पृष्ठभागावर असलेल्या पाण्याचा शोध घेण्याच्या प्रयत्न करण्यात आला होता. आणि चंद्रयान 2 मोहीमेचे उद्दिष्ट होते की चंद्रभोवती असलेल्या वातावरणाची माहिती गोळा गोळा करणे.

कोण आहे रितू करिधाल? (Who is Ritu Karidhal Information in Marathi)

डॉ. रितू करिधल श्रीवास्तव या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. म्हणजे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या जन्म 13 एप्रिल 1975 रोजी लखनऊ (उत्तर प्रदेश) मध्ये झाला. त्यांच्या पतीचे नाव अविनाश श्रीवास्तव असे आहे. आणि त्यांना दोन मुले आहेत आदित्य आणि अनिशा डॉ. रितू करिधल श्रीवास्तव यांना 2007 मध्ये असलेले राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्ट अवार्ड मिळाला आहे. भारताच्या मंगळाच्या परिभ्रमण मोहिमेमध्ये मंगळयानाच्या उप ऑपरेशन डायरेक्टर होत्या. डॉ. रितू करिधल श्रीवास्तव यांना भारतातील अनेक रॉकेट वुमन पैकी एक म्हणून संबोधले जाते. त्यांच्या जन्म मध्ये झाला होता. ते एक एरोस्पेस इंजिनियर आहेत.

ISRO Chandrayan Mission 1, 2, 3 Dates

All
Chandrayan Mission Date

Chandrayaan
1 mission Launch Date

22 October 2008

Chandrayaan
2 mission Launch Date

22 July 2019

Chandrayaan
3 mission Launch Date

14
July 2023

चंद्रयान 3 सुरक्षित व यशस्वीरित्या पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत पोहोचण्याचे इस्रो ने कळविले.

भारताचे अनेक वर्षाचे स्वप्न असणारे चंद्रयान 3 हे 14 जुलै या दिवशी यशस्वीपणे लॉन्च केले होते. तर आत्ताच्या स्थितीत चंद्रयान 3 हे पृथ्वीच्या भोवती कक्षांमध्ये फिरण्याचे दिसून येत आहे. चंद्रयान 3 ने पृथ्वीभोवती 5 फेरा पूर्ण केल्यानंतर चंद्राच्या दिशेने पुढे ढकलले गेले असून ते आत्ता 4 थ्या कक्षे मधून 5 व्या कक्षेमध्ये चंद्रयान 3 यशस्वीरित्या ढकलण्यात आले आहे.

 चंद्रयान 3 ची पृथ्वीभोवती शेवटची फेरी

चंद्रयान 3 हे 5 व्या कक्षेतून ढकलल्यानंतर काही थोड्या कालावधी मध्येच चंद्रयान पृथ्वीपासून 1,27,609 किलोमीटर एवढे अंतर 236 किलोमीटर या कक्षेमध्ये चंद्रयान 3 ने प्रवेश केला. चंद्रयान 3 ची आत्ताची अवस्था चांगली असून चंद्रयान 3 चे रेडियस हे थोड्या परीक्षणानंतर खात्री करून माहिती देण्यात येईल. अशी माहिती इस्रो ने ट्विट करून सांगितले आहे.

पुढची फायरिंग एक ऑगस्टला

चंद्रयान 3 हे 1 ऑगस्ट या दिवशी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर निघून चंद्राकडे वाटचाल सुरू करणार आहे. यावेळी चंद्रयान 3 ला इस्रो कडून अंतिम वेळा ढकलण्यात येईल. या प्रक्रियेला ट्रान्स लुनार इंजेक्शन असे म्हणतात. 1ऑगस्ट या दिवशी रात्री 12 ते 1 च्या सुमारास ट्रान्स लुनार इंजेक्शन ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

चंद्रयान 3 चंद्राभोवती फेऱ्या मारणार

चंद्रयान 3 चंद्राच्या जवळपास पोचल्यावर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग साठी प्रयत्न करेन सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंच कक्षेमध्ये स्थिर होईल. याकरता चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेमधून ज्या पद्धतीने टप्प्यानुसार बाहेर काढण्यात आले त्याचप्रमाणे याच्या विपरीत पद्धतीने चंद्राच्या कक्षे मध्ये ते प्रवास करणार आहे
चंद्रयान तीन चा आत्तापर्यंतचा प्रवास व्यवस्थित रित्या पूर्ण झाला असून 24 ऑगस्ट या दिवशी चंद्रयान 3 ला चंद्रावर स्वाफ्ट लँडिंग करता येऊ शकते . असे इस्रो कडून सांगण्यात आले आहे. व चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी रित्या पूर्ण झाल्यावर भारत हा चंद्रावर उतरणारा चौथ्या क्रमांकाचा देश असणार आहे.

चंद्रयान 3 ची चंद्राकडे वाटचाल

 इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान 3 चे पृथ्वीच्या कक्षेमधून चंद्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली . म्हणजेच त्याला (TLI)ट्रान्सलुनर इंजेक्शन असे म्हटले जाते. याच्या आधी चंद्रयान लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये प्रवास करत होते . त्याचे अंतर पृथ्वीपासून कमीत कमी 236 किलोमीटर आणि जास्तीत जास्त अंतर 1,27,603 किलोमीटर इतके होते. आणि 5 ऑगस्ट या दिवशी चंद्राच्या कक्षेमध्ये पोहोचणार आणि 23 ऑगस्ट या दिवशी चंद्रावर उतरेल.
ट्रान्सलुनर इंजेक्शन या प्रक्रिये करता इस्रोच्या बेंगलोर मुख्यालय येथील शास्त्रज्ञांनी थोड्या कालावधी करता चंद्रयान 3 चे इंजिन सुरू केले. चंद्रयान 3 पृथ्वीपासून 236 किलोमीटर इतक्या अंतरावर असताना इंजिन फायरिंग केली गेली. इस्रो ने सांगितले की, चंद्रयान 3 पृथ्वीभोवती त्याची प्रदक्षिणा पूर्ण करत चंद्राच्या दिशेने पुढे सरकत आहे . इस्रो ने अंतराळ यान ट्रान्सलुनर कक्षे मध्ये ठेवले आहे .
 चंद्रयान 3 मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपलशन मॉड्युल आहेत. लँडर आणि रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून त्या ठिकाणी 14 दिवस प्रयोग करतील. प्रोपलशन मॉड्युल चंद्राच्या कक्षेमध्ये राहील व पृथ्वीवरून येत असलेल्या रेडिएशनचा बद्दलचा अभ्यास करणार आहे. या चंद्रयान 3 मोहीम मार्फत इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात . याबद्दलची माहिती मिळवणार आहे . आणि चंद्रा वरच्या मातीचा देखील अभ्यास करणार आहे

चंद्रयान 3 चा आतापर्यंतचा प्रवास – 

1) 14 जुलै या दिवशी चंद्रयान 3 170 किलोमीटर × 36,500 किलोमीटर च्या कक्षेत लॉन्च करण्यात आले होते.
2) 15 जुलै या दिवशी पहिली कक्षा 41,762 किलोमीटर × 173 किलोमीटर एवढी वाढवण्यात आले .
3) 17 जुलै या दिवशी दुसऱ्या वेळा कक्षा 41,603 किलोमीटर × 226 किलोमीटर एवढी वाढवण्यात आले.
4) 18 जुलै या दिवशी तिसऱ्या वेळा कक्षा 5,1400 किलोमीटर ×228 किलोमीटर वाढवली.
5) 20 जुलै या दिवशी चौथ्या वेळा कक्षा 17,351 किलोमीटर × 233 किलोमीटर एवढी वाढवली.
6) 25 जुलै या दिवशी पाचव्या वेळा कक्षा 1.27,603 किलोमीटर × 236 किलोमीटर पर्यंत वाढवण्यात आले
7) 31 जुलै ते 1ऑगस्ट च्या रात्री मध्यान मध्ये चंद्राने कक्षा सोडली

चंद्रयान 3 मिशन बद्दल महत्वाचे प्रश्न

1) चंद्रयान 3 मिशन मधून भारताला काय साध्य होणार आहे ?
इस्रोचे शास्त्रज्ञ मनीष पुरोहित यांनी सांगितले की, चंद्रयान मिशन मध्ये भारत जगासमोर व्यक्त करू शकतो की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होण्याची आणि त्या ठिकाणी रोव्हर चालण्याची क्षमता आहे . यामुळे जगातील भारतावरचा विश्वास दृढ होईल . यामुळे भारतातील व्यवसायांमध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल . भारताने हेवी लिफ्ट लॉन्च वेहिकल LVM 3 – M4 याच्यावरून चंद्रयान लॉन्च केले. यामुळे जगाला भारताने दाखवून दिले की, LVM 3 – M4 याची क्षमता किती आहे .
2) चंद्रयान 3 मिशन दक्षिण ध्रुवावर का पाठवले गेले? 
चंद्राची ध्रुवीय प्रदेश हे दुसऱ्या प्रदेशांपेक्षा वेगळे आहेत . त्या ठिकाणी काही असे भाग आहेत की तेथे सूर्यप्रकाश कधीही पोहचू शकत नाही . आणि तेथील तापमान 200 अंश सेल्सिअस इतके खाली येत. त्यामुळे त्या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपात अजून तेथे पाणी असू शकते. असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. भारताच्या 2008 च्या चंद्रयान 1 मिशनमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असण्याची माहिती दर्शवली होती.
चंद्रयान 3 मिशन ची लँडिंग साईट चंद्रयान 2 प्रमाणे अंश अक्षांशावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ असेल . परंतु यावेळी क्षेत्रफळ वाढवले आहे. चंद्रयान 2 ची लँडिंग साईट 500 मिटर × 500 मिटर इतकी होती . तर चंद्रयान 3 ची लँडिंग साईट 4 किलोमीटर × 2.5 किलोमीटर ही आहे.
चंद्रयान 3 मिशनमध्ये सर्व काही सुरळीत झाल्यास , चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारे जगातील पहिले अंतराळ यान ठरणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी आधीचे अंतराळयान विषुववृत्तीय प्रदेशात, चंद्र विषुववृत्ताच्या उत्तर किंवा दक्षिणेला अंश अक्षांशावर उतरले आहेत.
3) चंद्रयान 3 मिशनमध्ये लँडरमध्ये 5 ऐवजी 4 इंजिन का आहेत?
लँडर मध्ये 4 इंजिन (थ्रस्टर्स) 4 ठिकाणी कोपऱ्यामध्ये बसविण्यात आले आहेत. परंतु आधी मध्यभागी बसवलेले 5 इंजिन काढण्यात आले आहे. फायनल लँडिंग फक्त 2 इंजिन च्या साह्याने केली जाईल. की ज्या मुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये 2 इंजिन काम करू शकतील . चंद्रयान 2 च्या मिशनमध्ये शेवटच्या क्षणी 5वे इंजिन जोडण्यात आले होते. परंतु यावेळी अधिक इंधन सोबत घेऊन जाण्यासाठी इंजिन काढून घेतले आहे.
4) चंद्रयान 3 मिशन फक्त 14 दिवसांचे का ?
इस्रोचे शास्त्रज्ञ मनीष पुरोहित म्हणाले की, चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस प्रकाश असतो यामुळे ज्यावेळी तेथे रात्र असते त्यावेळी तापमान 100 अंश सेल्सियस इतके खाली येत. चंद्रयान च्या लेंडर आणि रोव्हर हे त्यांच्या सोलर पॅनल मधून ऊर्जा तयार करतील . आणि ते 14 दिवस वीज तयार करतील परंतु वीज तयार होण्याची प्रक्रिया रात्री होणार नाही. विज तयार न झाल्यामुळे लेंडर आणि रोव्हर मधील इलेक्ट्रॉनिक वस्तू या तेथील थंडीमुळे खराब होतील . म्हणून चंद्रयान 3 मिशन 14 दिवसांसाठी आहे .
चंद्रयान 3 मिशन यशस्वी पार पडल्यावर . चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे. अमेरिका रशिया आणि चीन या देशांनंतर भारत चौथ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे . अमेरिका आणि रशिया या देशांनी चंद्रावर यशस्वीपणे उतरण्याआधी अनेक वेळा अपयशी झाले. 2013 मध्ये चाईंग 3 मिशनच्या प्रथम प्रयत्न मध्ये यशस्वी होणारा चीन पहिला आणि एकमेव देश आहे.

चंद्रयान तीन (Chandrayan 3)

भारताचे स्वप्न असणारी चंद्रयान 3 मोहिमेतील बदल प्रोपल्शन मॉडेल मधून विक्रम लेंडर यशस्वीपणे वेगळे झाले. यानंतर लेंडर स्वतः चंद्र मोहिमेत पुढे जाईल. चंद्रयान 3 चे दोन भागात विभाजन झाले असून,प्रोपल्शन मॉडेल मधून विक्रम लेंडर आणि रोव्हर वेगळे झाले. यासोबतच सॉफ्ट लँडिंग साठी उलट मोजणी सुरू झाली आहे. इस्रो ने शक्यता दर्शवली आहे की 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान चंद्रयान 3 चे विक्रम लेंडर हे दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल.

चंद्रयान 3 साठी महत्वाचा दिवस

चंद्रयान तीन साठी आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा होता. आज दुपारी इस्रो च्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान 3 च्या स्पेस क्राफ्ट चे दोन भागात विभाजन केले . प्रोपल्शन मॉडेल मधून विक्रम लेंडर आणि रोव्हर यांना वेगळे केले. या प्रक्रियेमधून चंद्रयान 3 ची शेवटची प्रक्रिया देखील पूर्ण झाली, म्हणजेच आता चंद्रावर फक्त सॉफ्ट लँडिंग होईल आणि ते विक्रम लेंडर एकटेच करेल. 16 ऑगस्ट 2023 या दिवशी इस्रो ने चंद्रयान 3 ची 153 किलोमीटर ×163 किलोमीटर या कक्षेमध्ये प्रवेश केला होता. इस्रो ने 23 ऑगस्ट 2023 हा दिवस सॉफ्ट लँडिंग साठी निवडलेला आहे.

इस्रो ने चंद्रयान 3 बद्दल दिली महत्वाची माहिती

चंद्रयान तीन बद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली, इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रोपल्शन मॉडेल मॉडेल मधून लेंडर यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले. आणि आता 24 तासानंतर म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान लेंडर ला खालच्या कक्षेत डीबुस्ट करण्याची प्रक्रिया चालू केली जाईल . “डीबुस्ट म्हणजे लेंडरची गती कमी करण्याची प्रक्रिया होय.” या डीबुस्ट प्रक्रियेमध्ये लेंडर ची गती कमी करून एका कक्षेमध्ये स्थिर केले जाईल . त्या ठिकाणाहून चंद्राच्या जवळचा बिंदू (पेरील्यून) 30 किलोमीटर आणि चंद्राच्या दूरचा बिंदू (अपोल्यून)100 किलोमीटर इतके अंतर आहे. या ठिकाणाहून 23 ऑगस्ट 2023 या दिवशी लेंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल.

चंद्रयान 3 चा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग चा क्षण जवळ आला आज उतरणार चंद्रावर चाद्रायान

भारताची जगासमोर नवीन ओळख बनवून देणारे चंद्रयान 3 मिशन. आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चंद्रयान 3 चे विक्रम लँडर ज्यावेळी सॉफ्ट लँडिंग करेल त्यावेळी चंद्रयान 3 मिशनचा यश प्राप्तीचा शेवटचा क्षण असणार आहे. या चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंग च्या शेवटच्या क्षणातील 15 ते 20 मिनिटे खूप महत्त्वाचे असतील. असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे इस्रोचे शास्त्रज्ञ चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग प्रक्रिये करता एक सारखे लक्ष केंद्रित करून सावध आहेत. चंद्रयानाचे चंद्रावर उतरण्याआधी चे काही मिनिटे जास्त जोखीमेचे असतील.
चंद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग या शेवटच्या टप्प्यात लँडिंग च्या सर्व प्रक्रिया विक्रम लेंडर ला स्वतः कराव्या लागतील. त्यामध्ये विक्रम लेंडर ला ठराविक वेळी आणि ठराविक उंचीवर स्वतःचे इंजिन स्वतः फायर करावे लागेल.
चंद्रयान 3 विक्रम लेंडर चे आज संध्याकाळी 6.04 वाजेला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग होणार आहे.

चंद्रयान 3 मिशन यशस्वी | Chandrayan 3 Mission Successful

चंद्रयान 3 मिशन ऐतिहासिक मिशन ठरले. विक्रम लेंडर ने रोव्हर च्या सोबतीने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे केली.
चंद्रयान तीन मिशन चंद्रावर यशस्वीपणे उतरले.
विक्रम लेंडर ने रोव्हरच्या सोबतीने लेंडिंग केली.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार जगातील भारत पहिला देश ठरला.

Chandrayan 3 Landed on the Moon

ISRO च्या चंद्रयान 3 मिशन ने भारतामध्ये एक ऐतिहासिक क्षण घडवून आणला. चंद्रयान 3 च्या लेंडर मॉड्युल ( LM ) विक्रम ने रोव्हर सोबत यशस्वीपणे लँडिंग केली. भारत हा जगातील पहिला देश आहे. की ज्या देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडिंग केली. बुधवारी म्हणजेच आजच्या दिवशी चंद्रयान 3 मिशनच्या सॉफ्ट लँडिंग च्या प्रक्रिये करता. देशातील आणि जगभरातील लोक याच क्षणाची वाट पाहत होते.
चंद्रयान 3 सायंकाळी 5:44 वाजेला विक्रम लेंडर ने योग्य पोझिशन घेतली. इस्रोच्या कमांड सेंटर मधून ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) ला लॉन्च केले गेले. शेवटचे 15 ते 17 मिनिट खूप जास्त तणावाचे होते. इस्रोच्या कमान सेंटर पासून ते देशातील संपूर्ण जनता चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंग च्या क्षणाची वाट पाहत होते. आणि ते विक्रम लेंडर ने सॉफ्ट लँडिंग चे चंदेरी क्षण यशस्वीपणे संपूर्ण जगासमोर दाखवले.
🛑 चंद्रयान 3 मिशन ISRO Live Eventयेथे क्लिक करा

FAQ: Chandrayan 3 Mission Information in Marathi Chandrayan 3 Launch Date (Chandrayaan 3 mahiti)

1. चंद्रयान 3 चे मुख्य उद्देश काय आहे? (What is the chandrayan 3 mission)
उत्तर.लॅन्डरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवण्याचा उद्देश आहे.
2. चंद्रयान कधी लॉन्च होणार आहे? (Chandrayaan 3 launch date in marathi)
उत्तर. 13 ते 19 जुलै पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
4. चंद्रयान 3 कुठे उतरणार आहे? (where chandrayan 3 is land)
उत्तर. चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरण्याची शक्यता आहे.
5.एल व्ही एम (LVM) चा फुल फॉर्म काय आहे? (full of LVM)
उत्तर. लॉन्च व्हेईकल मार्क 3 असा होतो.
6. एल व्ही एम मध्ये किती वजन पेलण्याची क्षमता आहे?
उत्तर. एल व्ही एम मध्ये 8 ते 9 हजार किलोग्रॅम वजन करण्याची क्षमता आहे.
7. ”LVM 3”चे काय काम आहे?
उत्तर. LVM 3 मध्ये पुढे ढकलण्याची क्षमता आहे ज्यामुळे गुरुत्वाकर्षणशक्ती कमी होऊन उपग्रहासारख्या जड वस्तूंना अवकाशात अलगद उचलण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्याचे काम LVM 3करते.
8. LVM 3 ची उंची किती आहे? (What is hight of LVM)
उत्तर. 43.50 मीटर इतकी LVM 3 उंची आहे.
9. LVM 3 चे वजन किती आहे? (What is weight of LVM)
उत्तर.LVM 3 चे वजन 640 टन इतके आहे.
10. चंद्रयान 3 कुठून लॉन्च होणार आहे? (Where Form Launch Chandrayan 3)
उत्तर. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून माणसं होणार आहे.
11. चंद्रयान 3 मोहीम चा एकूण बजेट किती असणार आहे?
उत्तर. एकूण बजेट 615 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
12. LVM 3 काय आहे? (What is LVM 3)
उत्तर. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रक्षेपण यान आहे.
13. चंद्रयान 3 का महत्त्वाचे आहे? (What is Importants of Chandrayan 3)
उत्तर .चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे आणि रोहर वापरून त्याचे कलाकृती शोधणे चंद्रयान दोन जे करू शकले नाही ते करणे हा चंद्रयान 3 चा उद्देश आहे.
14.कोणत्या देशाने मानवाला चंद्रावर पाठवले?
उत्तर. युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका (USA) या देशाने मानवाला चंद्रावर पाठवले.
15. चंद्रयान 3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहेत? (Who is Project director of Chandrayan 3)
उत्तर. पी विरामुथुवेल हे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत.
16. रितू करीधाल यांची चंद्रयान 3 मध्ये काय भूमिका आहे.
उत्तर. रितू करिधाल यांचा चंद्रयान 2 मिशन मध्ये डायरेक्टर होत्या. म्हणून इस्रो ने 2020 मध्ये त्यांना चंद्रयान 3 महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निश्चय केला होता.
17.चंद्रयान किती वाजेला लॉन्च होणार आहे? (ISRO Chandrayaan 3 Launch Time)
उत्तर. चंद्रयान 3 हे 14 जुलै रोजी दुपारी 2:35 लॉंच होणारा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top