लाडकी विद्यार्थिनी योजना | ladki vidyarthini yojana

लाडकी विद्यार्थिनी योजना | ladki vidyarthini yojana

ladki vidyarthini yojana – लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने मार्फत विद्यार्थिनींना वर्षाला 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर चला ladki vidyarthini yojana बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया, जसे योजना कोणी सुरू केली, कोणत्या विद्यार्थीनींसाठी सुरू केली, कोण पात्र आहे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा आहे.

Ladki Vidyarthini Yojana

आपल्या महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी आधी पासून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू आहे. आता शाळकरी विद्यार्थीनींसाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. नाव लाडकी विद्यार्थिनी योजना.

थोडक्यात माहिती – लाडकी विद्यार्थिनी योजना

योजनाज्योती कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना
संकल्पनाखासदार श्रीकांत शिंदे
शिक्षण पात्रता7 वी ते 12 वी
आर्थिक मदतदर महा 500 रु/ वार्षिक 6000
उद्देशविद्यार्थिनींना शैक्षणिक आर्थिक मदत करणे

Ladki Vidyarthini Yojana कोणी सुरू केली

तर ही योजना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्याचा निर्णय उल्हासनगर महानगरपालिका यांनी घेतला आहे. योजनेच्या पार्शभूमीवर 19 हजार विद्यार्थिनींची नोंदणी ही योजना प्रत्यक्ष रित्या सुरू होण्यापूर्वीच उल्हासनगरमध्ये करण्यात आली.

विद्यार्थिनींना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार

आता 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत आणि शिक्षण घेतांना पैशांची अडचण येऊन शिक्षण थांबायला नको या उद्देशाने या योजनेची संकल्पना मांडण्यात आली आहे. ज्योती कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना अंतर्गत सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना प्रत्येक महिन्याला 500 रुपये असे वार्षिक 6000 हजार रुपये या योजने मार्फत दिले जाणार आहेत.

Ladki Vidyarthini Yojana – आवश्यक कागदपत्रे

  • विद्यार्थिनीचे आधार कार्ड – Aadhaar Card
  • बोनाफाईड सर्टिफिकेट – Bonafide Certificate
  • उत्पन्न दाखला – Income Certificate
  • विद्यार्थिनीच्या नावाचे बँक पासबुक – Bank Passbook
  • पासपोर्ट साईझ फोटो – Passport Size Photo

Ladki Vidyarthini Yojana – अर्ज कसा करावा

या योजनाच्या उपलब्ध माहिती नुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या योजनेचे अर्ज वाटप केले जात आहेत. असे सांगितले जात आहेत, या योजनेची अजून ऑनलाईन वेबसाइट सुरू झालेली नाही. महानगरपालिकेकडून फॉर्म भरण्याबाबत लवकरच सूचना देण्यात येऊ शकतात. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना सुरू करण्यात आलेली आहे की नाही ही पण माहिती सध्या उपलब्ध नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top