maha id card download | महा आयडी कार्ड डाउनलोड

maha id card download | महा आयडी कार्ड डाउनलोड

maha id card download – जर तुम्ही आधी पासून महा सारथी महा आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन केले असेल. तरच तुम्ही महा id कार्ड डाउनलोड करू शकता. कारण खूप वेळा काही जण महा आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन न करता डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतात. पण तेव्हा error येतो म्हणून महा आयडी कार्ड डाउनलोड करण्याआधी रजिस्ट्रेशन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे महा id कार्ड कसे काढावे, महा आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन कसे करावे, आवश्यक कागदपत्रे कोणती, सर्व प्रोसेस माहिती खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महा आयडी कार्ड म्हणजे काय | What is the Maha Id Card?

महा सारथीचे महा आयडी कार्ड हे महाराष्ट्रातील नागरिकांना एकात्मिक महा आयडी च्या माध्यमातून शासकीय सेवा आणि कल्याणकारी योजनाचा सहज लाभ घेता यावा यासाठी विकसित करण्यात आलेले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. महा id कार्ड महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवा एकच ठिकाणी उपलब्ध करून देते. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या वेबसाईट वर जाण्याची गरज राहत नाही. समान माहिती वारंवार भरायची किंवा न समजणाऱ्या प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकत कमी होते. महा सारथी महा आयडी च्या माध्यमातून नागरिक त्याच्या पडताळलेल्या प्रोफाईलच्या आधारे कोणत्या शासकीय योजना आणि सेवांसाठी ते पात्र आहेत हे सहजपणे जाणून घेऊ शकतात.

maha id card download करण्यासाठी आवश्यक गोष्टी

  • महा सारथी पोर्टल वरती 24 तास आधी रजिस्ट्रेशन केलेले असावे.
  • रजिस्टर मोबाईल नंबर
  • आधार कार्ड

maha id card download कसे करावे | How to download maha id card

खालील पद्धतीचा वापर करून तुम्ही महा सारथीचे महा आयडी कार्ड घर बसल्या मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरून डाउनलोड करू शकता. ते ही फक्त 2 मिनिटांत. maha id card download करण्याची step by step process.

Step 1 : Maha id card Registration

महा सारथी पोर्टल वरती आधी रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि रजिस्ट्रेशन करायला 24 तास पेक्षा जास्त वेळ झालेला असावा.

Step 2 : Visit Maha sarathi Maha id Portal

आता महा सारथी च्या अधिकृत वेबसाईट वरती या. pop-up close करा.

Step 3 : Menu वर क्लिक करा

वेबसाइट उघडल्यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन रेषा (☰) यावर क्लिक करा.

Step 4 : Login वर click करा

Menu मध्ये लॉगिन पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि नागरी login वर click करा.

Step 5 : Aadhaar निवडा

आता लॉगिन करण्यासाठी Aadhaar हा पर्याय Select करा

स्टेप 6 : OTP टाका

तुमच्या आधार कार्ड शी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो OTP टाका आणि Submit करा.

स्टेप 7 : Maha ID card पहा

लॉगिन केल्यानंतर Digilocker मध्ये login करण्याचा पर्याय दिसेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लॉगिन करू शकता. किंवा Skip सुद्धा करू शकता. आता तुमचा महा आयडी कार्ड दिसेल. त्यावरील माहिती तुम्ही चेक करू शकता.

स्टेप 8 : Maha id card download करा

आता महा आयडी कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि महा आयडी कार्ड डाउनलोड होईल.

स्टेप 9 : Password टाका

Download केलेले maha id card open करतांना Password विचारला जाईल. महा id कार्ड बनवताना दिलेल्या माहिती नुसार Password हा: तुमच्या नावाची पहिली 4 अक्षर + तुमचे जन्म वर्ष असा असेल.

उदाहरण म्हणून : नाव Avinash Tirmale जन्म वर्ष 1990 तर Password असेल AVIN1990

Step 10 : maha id card open करा

जर तुम्ही योग्य पासवर्ड टाकला तर तुमचे Maha ID Card Open होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे Maha ID Card Download करू शकता.

Maha Sarathi Maha ID Card Official Website

maha id websiteयेथे क्लिक करा
महिला शेतकरी प्रमाणपत्र येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top