Pesa Act In Marathi – खूप लोकांना पेसा म्हणजे काय आहे ? पेसा बद्दलची माहिती नसेल. पेसा कायदा म्हणजे काय आहे ? हा कायदा कधीपासून अमलात आला व कोणासाठी लागू करण्यात आला याबद्दलची सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
अनुक्रमणिका
पहा
पेसा कायदा कधी लागू करण्यात आला
पैसा या कायद्याला मराठीत (अनुसूचित क्षेत्र विस्तार )असे म्हटले जाते. 24 डिसेंबर 1996 मध्ये भारतीय संविधानानुसार या कायद्याला लागू करण्यात आले.
Pesa meaning in Marathi (पेसा म्हणजे काय?)
“पेसा म्हणजे आदिवासी अनुसूचित जातीसाठी तयार केलेला एक कायदा आहे.” यामध्ये आदिवासी यांच्यात असलेले शिक्षण कौशल्य विकसित व्हावे यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा व पर्यटन विभाग, सांस्कृतिक कार्य, परंपरा प्रथा यांचे संवर्धन व जतन करणे आदिवासींची व्यवस्था स्वशासन बळकट करणे. हे पैसा कायद्याचे उद्देश आहे.
पेसा क्षेत्र म्हणजे काय? (What is PESA)
जिल्हा पातळीवर आदिवासी अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळते. त्या क्षेत्राला किंवा जिल्हा पेसा क्षेत्र म्हटले जाते.
पेसा क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजे काय? (What is PESA Area Talathi Post)
अनुसूचित विभागामध्ये राखीव असलेल्या तलाठी पदांची अनुसूचित क्षेत्रामध्ये वास्तव्यास असणाऱ्या लोकांसाठी असलेली तलाठी पदे. म्हणजे पेसा क्षेत्रातील तलाठी पदे होय.
पेसा अंतर्गत कोणती उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात?
जे विद्यार्थी अनुसूचित जातीतील अनुसूचित क्षेत्र व विभागाचे रहिवासी असतील. ते विद्यार्थी तलाठीच नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही पेसा अंतर्गत जाहीर झालेल्या भरतीसाठी अर्ज भरण्यास पात्र असू शकतात. याचा अर्थ पेसा अंतर्गत भरली जाणारी पदे ही अनुसूचित क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. परंतु पेसा अंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित क्षेत्रात रहिवासी असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थी त्याचे पालक व संबंधित हे अनुसूचित क्षेत्रात 26 जानेवारी 1950 पासून चे रहिवासी असण्याचा पुरावा ज्या विद्यार्थ्यांकडे असेल तेच विद्यार्थी अर्ज करू शकतात. हा पुरावा तहसील कार्यालयात उपलब्ध असतो.
ज्या जिल्ह्यातील पेसा अंतर्गत पद भरती होत असेल त्याच जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील रहिवासी विद्यार्थी अनुसूचित जातीचा विद्यार्थी पेसा अंतर्गत भरतीसाठी अर्ज करू शकतो. उदा. नाशिक जिल्ह्यासाठी पेसा अंतर्गत होणाऱ्या भरतीत अर्ज करणारा विद्यार्थी हा धुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जातीचा रहिवासी असलेल्या अर्ज करू शकत नाही.
स्थानिक अनुसूचित जातीचा उमेदवार कोणाला म्हटले जाते?
अनुसूचित जातीचे विद्यार्थी ,आई वडील किंवा आजीआजोबा हे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात 26 जानेवारी 1950 पासून रहिवासी असतील अशा विद्यार्थ्यांना आणि अनुसूचित जाती चा उमेदवार म्हटले जाते.
पेसा कायद्यांतर्गत एकूण किती राज्यांचा समावेश होतो. (How Many State Cover Under Pesa Act)
पेसा कायद्यांतर्गत भारतातील एकूण 10 राज्यांचा समावेश आहे. ते खालील प्रमाणे.
महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश ,गुजरात ,झारखंड ,उडीसा, मध्य प्रदेश छत्तीसगड ,हिमाचल प्रदेश ,राजस्थान, तेलंगणा इत्यादींचा समावेश आहे.
पेसा अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांची नावे खालील प्रमाणे
धुळे ,नाशिक ,नंदुरबार, पुणे ,अहमदनगर ,ठाणे ,पालघर, जळगाव ,यवतमाळ ,अमरावती ,नांदेड ,चंद्रपूर ,गडचिरोली. (list of pesa Distict Maharashtra)
पेसा दाखला कुठे मिळतो. (Pesa Certificate)
पेस दाखला तहसीलदार कार्यालयात सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपल्या सरकार पोर्टलवर मिळतो.
What is Full Form of Pesa (पेसा चे संक्षिप्त रूप)
(Panchayat Extension to Schedule Areas Act.) पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार.
पेसा आणि नॉन पेसा क्षेत्र म्हणजे काय? (What is PESA & Non PESA)
पेसा अनुसूचित जमाती मधील लोकांशी संबंधित आहे. अनुसूचित विभागामध्ये रहिवासी असणाऱ्या अनुसूचित जमाती मधील लोकांसाठी पेसा क्षेत्र आहे.
जे लोक अनुसूचित जमातीमध्ये मोडत नाहीत. त्या लोकांसाठी पेसा क्षेत्र कायदा लागू नाही.
Pesa Act Village List PDF Maharashtra (पेसा कायदा गावांची यादी) (पेसा कायदा PDF)
पेसा कायदा काय आहे? याची माहिती तर आपल्याला मिळाली. परंतु आता पैसा कायदा महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लागू होतो. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये लागू होतो. त्याचबरोबर कोणत्या तालुक्यामधील गावांमध्ये लागू. याची पूर्ण लिस्ट खाली देण्यात आलेल्या पीडीएफ (PDF) मध्ये दिली आहे. तसेच पेसा कायदा PDF माहिती या एकाच पीडीएफ मध्ये मिळून जाईल.
✅ पेसा कायदा PDF व गावांची यादी – Download PDF
FAQ: Pesa Act Information in Marathi What is PESA Act What is PESA Area What is PESA Talathi What is meaning of pesa
1. पेसा कायदा म्हणजे काय? (Pesa Kayada Mahnje Kay)
उत्तर. पेसा कायदा अनुसूचित जमाती मधील लोकांची संबंधित कायदा आहे. अनुसूचित जमाती मधील लोकांच्या परंपरा सांस्कृतिक यांची जतन संवर्धन करण्यासाठी पेसा कायदा करण्यात आला आहे.
2. पेसा कायदा किती राज्यांमध्ये आहे? (Pesa Kayada Kiti Rajyanmadhye Aahe)
उत्तर. पेसा कायदा एकूण 10 राज्यात आहे.
3. पेसा कायदा कोण लागू करतो? (pesa Kayada kon lagu karat)
उत्तर. पेसा कायदा हा राज्यातील राज्यपाल लागू करतो.
4. पेसा दाखला कुठे मिळतो? (Pesa Dakhaka Kuthe Milato)
उत्तर. पेसा दाखला तहसीलदार कार्यालयात भेटतो.
5. पेसा कायदा कधी अमलात आला. (Pesa Kayada Kadhi Amalat Aala)
उत्तर. 1996 साली .
6. पेसा कायदा महाराष्ट्रात किती जिल्ह्यात आहे. (Pesa Kayada Maharashtra Kiti Jilyat aahe)
उत्तर. एकूण 13 जिल्ह्यात आहे.
7. पेसा कायद्याची उद्दिष्टे काय आहेत? (pesa kayadhyachi udishtte Kay aahet)
उत्तर. ग्रामीण प्रशासन स्थापित करणे आणि ग्रामसभेला एकत्रित केंद्र बनवणे.
8. महाराष्ट्र सरकारने पैसा कायदा कधी लागू केला.
उत्तर. पंचायत विस्तार अधिनियम 1996 मध्ये महाराष्ट्र सरकारने पैसा कायदा लागू केला.
9. पेसा चा अर्थ काय आहे? (Pesa cha arth Kay aahe)
उत्तर. अनुसूचित क्षेत्राचा विस्तार.
10. पेसा कायद्यात अनुसूची 6 लागू आहे का?
उत्तर.6 व्या अनुसूचित अंतर्गत ईशान्य कडील राज्याचे शासनासाठी स्वायत्ता परिषद अस्तित्वात आहे. ते पेसा मध्ये समाविष्ट नाही.
Sarv na jay Aadivasi,,,,ml vte ha pesa kayda lavkar lagu zla pahje va mze sarv bhau,,and banhi ahe tyna ya pesa kayda cha labh gheta ala pahije,, Aadivasi samaj khup kahi vikas zlale nahi,,mhnau aamche sarv aadivasi bhadav ahe tyna ha pesa,, kayda sahbhagi hauva ase ml vte ahe,,jay Aadivasi,,jay savidhan