Mahila Shetkari Praman Patra – महाराष्ट्र सरकार ने शेतात राबणाऱ्या महिलांसाठी त्यांना अधिकृत ओळख देण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. या कायद्या अंतर्गत जी महिला शेतात राबते, तिला शेतकरी म्हणून ओळख मिळायलाच हवी. असे याचे धोरण आहे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026. तर महिला शेतकरी प्रमाणपत्र कोणत्या महिलांना मिळेल. कोणत्या महिला या महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी पात्र आहेत. कोणत्या महिला अपात्र आहेत. महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. महिला शेतकरी प्रमाणपत्र काढल्याचा फायदा काय आहे. सगळी माहिती खाली दिली आहे.
Mahila Shetkari Pramanpatra
Maharashtra Women Farmer Empowerment Act 2026: The Maharashtra Government has introduced the Maharashtra Women Farmers Empowerment Act, 2026 to give official recognition to women actively involved in farming and allied agricultural activities. Under this law, eligible women can obtain a Women Farmer Certificate (Mahila Shetkari Pramanpatra) even if the agricultural land is not registered in their name. This article explains who is eligible for the Women Farmer Certificate, which women are ineligible, eligibility criteria, required documents, online application process, Gram Sabha approval, and the major benefits of the certificate, including easier access to government agricultural schemes, crop loans, crop insurance, subsidies, agricultural inputs, training, technology support and other farmer welfare benefits. Women farmers, tenant farmers, sharecroppers, agricultural labourers and women engaged in various allied farming activities can check the complete Maharashtra Women Farmer Certificate 2026 eligibility, documents, application process and benefits here.
महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे काय
महिला शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे एखादी महिला शेती किंवा शेतीशी संबंधित काम करते आणि ती महिला “शेतकरी” आहे या अधिकृत पुरावा होय. या महिला शेतकरी प्रमाणपत्र मुळे महिलेला अधिकृत महिला शेतकरी म्हणून ओळख मिळू शकते. विशेष म्हणजे जमीन तिच्या स्वतःच्या नावावर असणे आवश्यक नाही.
महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत?
महाराष्ट्र शासनाच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी पात्र असलेल्या महिलांसाठी निकष खालील प्रमाणे
- वय 18 वर्ष पेक्षा जास्त असलेली महिला
- अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असावी.
- शेती किंवा शेतीशी पुरक किंवा निगडित कामात प्रत्यक्ष सहभागी असलेली महिला.
- स्वतःच्या नावावर शेती नसेल तरी चालेल.
- स्वतःची जमीन कसणारी महिला
- दुसऱ्याची जमीन तोंडी किंवा लेखिका कराराने भाड्याने घेऊन शेती करणारी महिला
- स्वतःची जमीन नसली तरी शेतमजुरी पशुपालन रोपवाटिका इत्यादी कामे करणारी महिला
- बियाणे, जनावरांच्या किंवा माशाच्या जातीचे संवर्धन करणारी महिला
- मत्स्य व्यवसाय मत्स्य शेती करणारी महिला पात्र ठरू शकते
- वर्षातून किमान एक हंगामात महाराष्ट्रात शेती करणारी महिला देखील पात्र ठरू शकते.
महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्या महिला अपात्र आहेत?
महिला शेतकरी प्रमाणपत्र साठी कोणत्या महिला अपात्र आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे.
- वय 18 वर्षापेक्षा कमी असेल महिला अपात्र
- नगरपरिषद / नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाशी महिला अपात्र
- शेती किंवा शेतीशी संबंधित/पुरक काम करत नसणाऱ्या महिला अपात्र
- ग्रामसभा / नगरपंचायतीच्या पडताळणीत अर्जदार कायद्यातील शेतीच्या व्याख्येनुसार काम करत नसल्याचे आढळल्यास अपात्र केले जाऊ शकते.
महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- अधिवास प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र किंवा वीज बिल
- आधार सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर
महिला शेतकरी प्रमाणपत्र शासन निर्णय & अधिकृत वेबसाईट
| शासन निर्णय | येथे क्लिक करा |
| माहिती पुस्तक | येथे क्लिक करा |
| शासन निर्णय 2 | येथे क्लिक करा |
| महिला शेतकरी पोर्टल | येथे क्लिक करा |
| लाडकी बहीण योजना | येथे पहा |
महिला शेतकरी प्रमाणपत्र कसे मिळते?
महिला शेतकरी प्रमाणपत्र खालील टप्पे नुसार मिळते.
टप्पा 1 – ऑनलाईन अर्ज
ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत हद्दीत राहणारी आणि शेती/ शेतीपूरक काम करणारे महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. शेती किंवा शेतीशी निगडित काम करणारे कोणतीही महिला ऑनलाईन अर्ज करू शकते.
टप्पा 2 – ग्रामसभेची पडताळणी.
पुढच्या ग्रामसभेत किंवा नगरपंचायतीच्या बैठकीत अर्जावर विचार होतो. अर्जदार विषयी ग्रामसभेत विचार केला जातो.
टप्पा 3 – पडताळणी व ठराव मंजूर
महिला प्रत्यक्ष शेती किंवा शेतीपूरक काम करते का याची पडताळणी करून अर्ज मंजूर किंवा नाकारण्याचा ठराव केला जातो. ग्रामसभा मंजुरी किंवा नकाराचा भराव करते, नकाराचे कारण 7 दिवसात कळवले जाते.
टप्पा 4 – प्रमाणपत्र मिळते
ठराव मंजूर झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले जाते.
टप्पा 5 – अर्ज नाकारल्यास
अर्ज नाकारल्यास त्याचे कारण 7 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात कळवले जाते.
टप्पा 6 – अपील
निर्णयाबाबत आक्षेप असल्यास महिला 120 दिवसाच्या आत अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागू शकते.
महिला शेतकरी प्रमाणपत्र चे फायदे | Benifits of Mahila Shetkari Pramanpatra
महिला शेतकरी प्रमाणपत्र काढल्यानंतर महिलांना होणारे फायदे कोणते ते खालील प्रमाणे.
- अधिकृत महिला शेतकरी म्हणून ओळख मिळते.
- सरकारी व कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल.
- कृषी अर्थ सहाय्यक अनुदानाच्या योजनेसाठी पात्रता
- शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळेल.
- बियाणे, खते व शेती योजनांचा लाभ
- पिक विमा व कृषी विस्तार सेवांचा लाभ
- विधवा, घटस्फोटीत व एकल महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सहाय्य
- महिला शेतकरी निधीतून सहाय्य.
- शेतमालाची वाहतूक, साठवणूक व बाजारपेठेशी जोडणी
- प्रशिक्षण, कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञानात व डिजिटल सेवांचा लाभ

