Job Card Online Apply – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मागणाऱ्या कुटुंबासाठी कुटुंब ओळखपत्र दिले जाते. त्यालाच दुसरे नाव म्हणजे “जॉब कार्ड” असे म्हटले जाते. खेड्या गावात असो किंवा शहरात रोजगार मागणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड भेटत असते. मग ते ग्रामपंचायत असो नगरपंचायत, नगरपलिका, महानगरपालिका. यापैकी कुठल्याही विभागातून तुम्ही रोजगाराचे किंवा जॉब कार्डची मागणी करू शकता. पण रोजगार मागणाऱ्या कुटुंबासाठी काही नियम अटी असतात. मग तुम्हालाही जॉब कार्ड काढायचं असेल. त्याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या आपल्या मराठी भाषेत खाली देण्यात आली आहे. एकदा माहिती पूर्ण वाचा म्हणजे तुमच्या मनात कुठलेही शंका राहणार नाही.
जॉब कार्ड हे फक्त रोजगारसाठी कामात येत नसते. तर ते काही सरकारी योजना व सरकारी कामांसाठी ओळखपत्र किंवा आधार कार्ड प्रमाणे वापरले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांनी कुटुंब ओळखपत्र म्हणजेच जॉब कार्ड काढून घेणे गरजेचे आहे. सध्या तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत फॉर्म भरायचा असेल. त्यालाच घरकुल योजना 2025 असे सुद्धा संबोधले जाते. त्याचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा जॉब कार्ड नंबरची आवश्यकता असते. तुम्हाला समजलेच असेल जॉब कार्ड सध्या किती महत्त्वाचे आहे. आता खाली आपण जॉब कार्ड म्हणजे काय समजून घेऊया?
Job card Maharashtra – The Mahatma Gandhi National rural employment guarantee act or scheme. Narega job card maharashtra. in this article we learn about what is job card, what is job card number, how to download job card in mobile in Marathi. How to search and find job card number. How to apply for news after, how to take all village job card list.
MGnrega Job Card म्हणजे काय? | What is job card?
तर जॉब कार्ड म्हणजे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मागणाऱ्या कुटुंबासाठी एक विशिष्ट प्रकारचे संपूर्ण कुटुंबाचे ओळखपत्र दिले जातात. त्या ओळखपत्राचा वापर ग्रामपंचायत अथवा नगरपालिका महानगरपालिका कडून मिळणाऱ्या रोजगाराची त्याच्यात माहिती भरण्यात येते. त्याचेच दुसरे नाव म्हणजे जॉब कार्ड होय. याचाच अर्थ रोजगाराबद्दल माहिती साठवून ठेवणारे कार्ड म्हणजेच जॉब कार्ड होय.
जॉब कार्ड नंबर म्हणजे काय? | Job card number?
प्रत्येक जॉब कार्ड ला विशिष्ट प्रकारचा 14 अंकी नंबर दिला गेला असतो. याचा वापर करून आपण आपले जॉब कार्ड कुठेही अक्सेस करू शकतो. जॉब कार्ड नंबर विशिष्ट प्रकारच्या संख्येने मिळून तयार करण्यात आलेला असतो. जसे की सुरुवातीचे दोन अक्षर राज्य दर्शवतात, नंतरचे दोन अंक जिल्हा दर्शवतात, मग नंतरचे तीन अंक तालुका दर्शवतात, त्यानंतरचे तीन अंक ग्रामपंचायत दर्शवतात, अजून त्यानंतरचे तीन अंक गाव दर्शवतात, मग शेवटचे तीन अंक कुटुंब नंबर दर्शवतात. आशा combination ने जॉब कार्ड नंबर तयार झाला असतो. आणि त्या 14 अंकी नंबरला जॉब कार्ड नंबर म्हटले जाते.
जॉब कार्ड अधिकृत वेबसाईट | MGNREGA Job card official website
जर तुम्हाला जॉब कार्ड बद्दल अधिकृतपणे अधिक माहिती हवी असेल. तर तुम्ही भारत सरकारच्या जॉब कार्ड च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. वेबसाईट लिंक खाली दिली आहे.
🌐 जॉब कार्ड वेबसाईट | nrega.nic.in |
जॉब कार्ड नंबर कसा काढावा | How to find job card number online
तुम्हाला जर का तुमचा जॉब कार्ड नंबर माहित नसेल. तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत तुमच्या मोबाईल मधून तुमचा जॉब कार्ड नंबर शोधू शकता. जॉब कार्ड नंबर कसा शोधायचा त्याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
1) सर्वात आधी जॉब कार्ड च्या वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती या.
2) येथे “Generate Reports” या पर्यावर क्लिक करा.
3) तुमचे राज्य निवडा जसे की “Maharashtra”
4) आता “Financial Year” या ठिकाणी चालू वर्ष निवडा “District” या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा, Block म्हणजे तुमचा तालुका निवडा, शेवटी “Panchayat” म्हणजे तुमच्या गावाचं नाव निवडा. मग “Proceed” बटनावर क्लिक करा.
5) मग “R1. Job Card/ Registration” असा पहिला Box दिसेल त्यामध्ये 3 नंबर चा पर्याय “Job Card/Employment Register” या पर्यायावर क्लिक करा.
6) येथे तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे किंवा कुटुंबांचे जॉब कार्ड तयार झाले आहेत त्यांची नावे व त्यांच्या नावाच्या समोर जॉब कार्ड नंबर पाहायला भेटेल.
7) या यादीत तुमचे नाव शोधा त्यापुढे तुमचा जॉब कार्ड नंबर पाहायला भेटेल.
8) जर का या यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड साठी अर्ज करावा लागेल.
9) नवीन जॉब कार्ड कसे काढावे? त्याची माहिती खाली देण्यात आले आहे.
गावाची जॉब कार्ड यादी कशी पहावी | Job Card Village List PDF Download
जर का तुम्हाला तुमच्या गावाची जॉब कार्ड यादी पहायची असेल किंवा डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही काही सेकंदात मोबाईल मधून पाहू शकता किंवा डाऊनलोड करू शकता. आता ही जॉब कार्ड यादी पूर्ण गावाची कशी डाऊनलोड करायची. किंवा जॉब कार्ड यादी कशी पहायची सर्व माहिती खाली दिली आहे.
1) सर्वात आधी जॉब कार्ड च्या वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती या.
2) येथे “Generate Reports” या पर्यावर क्लिक करा.
3) तुमचे राज्य निवडा जसे की “Maharashtra”
4) आता “Financial Year” या ठिकाणी चालू वर्ष निवडा “District” या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा, Block म्हणजे तुमचा तालुका निवडा, शेवटी “Panchayat” म्हणजे तुमच्या गावाचं नाव निवडा. मग “Proceed” बटनावर क्लिक करा.
5) मग “R1. Job Card/ Registration” असा पहिला Box दिसेल त्यामध्ये 3 नंबर चा पर्याय “Job Card/Employment Register” या पर्यायावर क्लिक करा.
6) येथे तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे किंवा कुटुंबांचे जॉब कार्ड तयार झाले आहेत त्यांची नावे व त्यांच्या नावाच्या समोर जॉब कार्ड नंबर पाहायला भेटेल.
7) आता या यादीला तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकतात.
8) या यादीमध्ये वेगवेगळ्या कलर अनुसार तुम्हाला नावे पाहायला भेटतील. त्याचा अर्थ काय होतो त्याची माहिती सुद्धा यादीच्या खाली दिलेली आहे.
ऑनलाईन जॉब कार्ड कसे डाउनलोड करावे | How to download job card
तुम्हाला तुमचे जॉब कार्ड डाऊनलोड करायचे असेल. तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून हे काम करू शकता. आता तुम्ही तुमचे जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे तेही घर असल्यामुळे मोबाईल मधून त्याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
1) सर्वात आधी जॉब कार्ड च्या वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती या.
2) येथे “Generate Reports” या पर्यावर क्लिक करा.
3) तुमचे राज्य निवडा जसे की “Maharashtra”
4) आता “Financial Year” या ठिकाणी चालू वर्ष निवडा “District” या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडा, Block म्हणजे तुमचा तालुका निवडा, शेवटी “Panchayat” म्हणजे तुमच्या गावाचं नाव निवडा. मग “Proceed” बटनावर क्लिक करा.
5) मग “R1. Job Card/ Registration” असा पहिला Box दिसेल त्यामध्ये 3 नंबर चा पर्याय “Job Card/Employment Register” या पर्यायावर क्लिक करा.
6) येथे तुमच्या गावातील ज्या व्यक्तींचे किंवा कुटुंबांचे जॉब कार्ड तयार झाले आहेत त्यांची नावे व त्यांच्या नावाच्या समोर जॉब कार्ड नंबर पाहायला भेटेल.
7) आता तुम्हाला ज्याचे जॉब कार्ड डाउनलोड करायचे आहे त्याच्या नावासमोरील जॉब कार्ड नंबर वरती क्लिक करा.
8) तुमचे जॉब कार्ड तुम्हाला पाहायला भेटून जाईल. त्याला तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता.
1) आधार कार्ड ( पूर्ण कुटुंबाचे)
2) मतदान कार्ड (असल्यास पूर्ण कुटुंबाचे)
3) राष्ट्रीयकृत बँकेचे किंवा पोस्टाचे खाते (असल्यास पूर्ण कुटुंबाचे)
4) रेशन कार्ड (गरजेनुसार)
जर का तुमच्या गावाच्या जॉब कार्ड यादी तुमचे नाव नसेल तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड साठी अर्ज करावा लागेल. अर्ज करताना अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि अकुशल काम करू इच्छिणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती नोंदणीसाठी पात्र असतील. जॉब कार्ड साठी अर्ज करण्यास कुठल्याही प्रकारची शेवटची तारीख नसते. तुम्ही वर्षभरात सुट्टीचे दिवस उघडून कधीही अर्ज करू शकता.
जर का तुमच्या गावाच्या जॉब कार्ड च्या यादी तुमच्या नाव नसेल. तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड साठी अर्ज करावा लागेल. आता जॉब कार्ड साठी नव्याने अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून सांगितले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला नवीन जॉब कार्ड साठी अर्ज करता येईल. नवीन जॉब कार्ड साठी अर्ज करण्यासाठी एक फार्म लागतो त्याची पीडीएफ खाली देण्यात आली आहे.
जॉब कार्ड फॉर्म PDF | Job card form pdf download
जॉब कार्ड साठी फॉर्म हा ऑफलाइन पद्धतीने जमा केला जात असतो. त्यासाठी खाली दिलेल्या फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून पुन्हा चुकता भरून ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कडे जमा करावा.
जॉब कार्ड फॉर्म PDF | डाउनलोड करा |
FAQ – MGNREGA Job Card Online Apply Maharashtra
Q. नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कब कार्ड काढण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
ans. सुट्टीचे दिवस वगळता व वर्षभरातून तुम्ही जॉब कार्डसाठी कधीही अर्ज करू शकता.
Q. जॉब कार्ड साठी कोण अर्ज करू शकतो?
ans. 18 वर्षे पूर्ण असलेले आणि आकुशल काम करू इच्छिणाऱ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जॉब कार्ड साठी अर्ज करू शकते.
Q. NAREGA Full Form इंग्रजी आणि मराठी?
ans. मराठी – राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. English – National rural employment guarantee act