लाडक्या बहिणी होणार अपात्र | Ladki Bahin Yojana New Letest Update

लाडक्या बहिणी होणार अपात्र | Ladki Bahin Yojana New Letest Update

Ladki Bahin Yojana New Letest Update – लाडकी बहिण योजना मध्ये 5 निकष चेक केले जाणार. लाडक्या बहिणींचे फॉर्मची पडताळणी होणार. या निकषांमध्ये जर महिला बसत नसेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे. पण नेमके या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत. ते 5 निकष कोणते समजून घेऊया. तर खाली दिलेली लेखातील माहिती पूर्ण वाचा तरच सर्व माहिती समजेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्मची पडताळणी होणार

लाडकी बहिण योजनेअंतर्गत फॉर्म ची पडताळणी होणार आहे. पण कोणाचे फॉर्म चेक केले जातील. ते पण समजून घेणे महत्वाचे आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामधून लाडकी बहिण योजनेच्या तक्रारी येत आहेत. आता ज्या महिलांच्या पात्रते बदल तक्रार जाईल त्याच महिलांच्या फॉर्मची पडताळणी होईल

Ladki Bahin Yojana 5 Nikash Konte ?

1) चार चाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही जर महिलेच्या नावावर गाडी असेल किंवा पतीच्या नावावर गाडी असेल तर लाभ मिळणार नाही. (ट्रॅक्टर वगळून)

2) उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे का? किंवा त्याच्यात आता वाढ झाली तर income tax विभागाकडे माहिती मागून त्याची पडताळणी केली जाईल. जर उत्पन्नात वाढ झाली असेल तर त्या महिला अपात्र होतील.

तुम्ही रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, किंवा स्वयघोषणा पत्र अपलोड केलं असेल तरी हा नियम सर्वांसाठी सारखा असेल. त्यामुळे वेळोवेळी सर्वांची पडताळणी होईल.

3) लाडकी बहिण योजना सोडून जर महिलेला इतर शासनाच्या योजनेचा लाभ मिळत आहे का? तर लाभ मिळत असेल आणि तो 1500 पेक्षा जास्त असेल. ते लक्षात आल्यावर या पुढे त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. पण समजा जर 1000 रू त्या योजनेचा लाभ मिळत असत तर लाडकी बहिणींचे 500 रुपये दिले जातील.

(जर PM kisan किंवा नमो शेतकरी योजना 6000+6000= 12000 मिळत असतील तर लाडकी बहिणींचे 500 रू मिळतील पण याचा शासनाने अधिकृत GR काढलेला नाही GR आल्यावर तेही व्हिडिओ च्या माध्यमाने कळवण्यात येईल)

4) सरकारी नोकरी असेल, किंवा टॅक्स भरत असतील तर लाभ मिळणार नाही

5) महाराष्ट्रातील महिला पर राज्यात लग्न करून गेली असेल. तर त्यांना लाभ मिळणार नाही. किंवा परराज्यातील महिला महाराष्ट्रात लग्न करून आली तर त्यांना पतीचे कागदपत्रे सदर करावे लागेल. त्या महिलांना लाभ मिळेल.

महत्त्वाच्या काही बाबी Ladki Bahin Yojana New Letest Update: –

आधार कार्ड ची e-Kyc होणार आहे जेव्हा केंद्र सरकार व आधार म्हणजे UIDAI करून परवानगी मिळाल्यावर.

तसेच ज्या महिलांच्या नावात बदल असेल आधार कार्ड वरील नाव आणि बँक पासबुक वरील नाव वेगळे असल्यास. त्याची पडताळणी केली जाणार आणि नावात बदल आढळल्यास अपात्र ठरवण्यात येईल.

त्यामुळे आताच चेक करा बँक पासबुक वरील नाव व आधार कार्ड वरील नाव वेगळे आहे का? जर वेगळे नसेल तर काही करण्याची गरज नाही. पण वेगळे असेल तर बँकेत जावून आताच update करून घ्या.

जर महिला या पुढे या निकष मध्ये बसणार नाहीत. तर त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. फक्त त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही.

सर्वच फॉर्म ची पडताळणी होणार नाही ज्यांच्या तक्रारी आल्या असतील त्यांच्याच फॉर्म ची पडताळणी होईल. पण महाराष्ट्र शासाने जो “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” शासन निर्णय मध्ये जे निकष आहेत त्याच्यात कधीच बदल झालेला नाहीये. आणि ते निकष वेळोवेळी चेक केले जातील. त्या निकष मध्ये ज्या ज्या वेळी महिला बसणार नाही त्यावेळी त्या दिवसापासून महिला अपात्र होतील.

या मध्ये शासनाकडून काही बदल झाला किंवा नवीन माहिती मिळाली तर या लेखात माहिती Update करण्यात येईल. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट नक्की करा.

लाडक्या बहिणी होणार अपात्र | Ladki Bahin Yojana New Letest Update

FAQ – Ladki bahin yojana new letest update

Q. लाडकी बहिण योजना 2100 रू महिना कधी मिळेल.
Ans. मार्च एप्रिल महिन्या नंतर जेव्हा बजेट जाहीर होईल त्यानंतर मिळतील.

Q. लाडकी बहिण योजना फॉर्म पुन्हा केव्हा सुरू होईल?
Ans. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहिती नुसार फॉर्म पुन्हा सुरू होऊ शकता.

Q. लाडकी बहिण योजना वेबसाईट केव्हा सुरु होईल?
Ans. वेबसाईट चे सध्या काम सुरू आहे लवकरच वेबसाईट चालू होईल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top