(7/12) Satbara Utara ULPIN Information Maharashtra in Marathi : शेतकरी बंधूंनो जमिनीचा सातबारा उतारा याच्यात खूप मोठा बदल झालेला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन उपाययोजना शेत जमिनीसाठी राबविण्यात येत आहे. याच्या माध्यमाने देशातील शेत जमीन ती शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील असो शेतजमिनीच्या प्रत्येक तुकड्याला आता एक विशिष्ट अकरा अंकी नंबर दिला जात आहे त्याला काही जण सातबारा उतारा आधार नंबर असं म्हणत आहेत तर त्याचे अधिकृत नाव ULPIN नंबर असे आहे. याचा फुल फॉर्म युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर असा होतो.
अनुक्रमणिका
पहा
सातबारा आधार नंबर म्हणजे काय ? | Satbara ULPIN information in marathi – satbara aadhar number
शेतकरी बंधूंनो सर्वजण याला सातबारा आधार नंबर उच्चारत आहेत तो सातबारा उताऱ्याचा अकरा अंकी असलेला रँडम आयडेंटिफिकेशन नंबर आहे त्याला ULPIN Number in 712 Maharashtra असे म्हटले जाते. हा सातबारा यु एल पिन अकरा अंकी असून याचा फुल फॉर्म युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर असा होतो. (ULPIN Full Form is Unique Land Parcel identification number) याच नंबरला सातबारा आधार नंबर असे म्हटले जात आहे.
ULPIN असलेला सातबारा कसा डाउनलोड करायचा | ULPIN Asalela Satbara utara kasa downlaod karayacha
शेतकरी बंधूंना माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येकाला आता सातबारा उतारा कसा डाऊनलोड करायचा ते माहितीच असेल सातबारा उतारा सध्या दोन पद्धती डाऊनलोड केला जातो त्याचे दोन स्वरूप आहेत एक नवीन डिजिटल सातबारा उतारा आणि एक सातबारा उतारा जो आपण फक्त पाहू शकतो तो सहकारी कामांमध्ये चालत नाही तर दोघे सातबारा उतारा डाऊनलोड झाल्यानंतर त्याच्या गट नंबर च्या खाली तुम्हाला ULPIN पाहायला मिळेल. आज तुमचा सातबारा उतारा चा आधार क्रमांक असणार आहे. त्याचबरोबर डिजिटल सातबारा उताऱ्या वरती तुम्हाला बारकोड दिसेल बारकोड च्या खाली सुद्धा तुम्हाला तुमचा सातबारा उताऱ्याचा आधार नंबर म्हणजेच युएनपीन पाहायला मिळेल.
सातबारा ULPIN चे फायदे कोणते ? | Benefits of Satbara Utara ULPIN ?
नवीन सातबारा उताऱ्यावर येणारा ULPIN खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
याचे शेतकऱ्यांना खूप फायदेही होणार आहे. जसे की जमीन विकत असताना होणारी फसवणूक आता या युएलपीन मुळे होणार नाही. यु एल पीन शेत जमीन ही कोणाच्या नावावर आहे लगेच कळेल.
शेत जमिनीचे अदलाबदली किंवा एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर शेत जमीन करत असताना शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल.
त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात एलपींचा शेती व्यवहार करताना खूप मोठा सहभाग असेल.