MahaDBT Aadhar Verification : शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांचा कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत नंबर लागला आहे किंवा लॉटरीमध्ये सिलेक्शन झालं आहे. अशा शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचा मेसेज आला आहे. त्या मेसेज मध्ये खालील प्रमाणे माहिती देण्यात आली आहे.
महा-डीबीटी वरील आपल्या प्रोफाइल चे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी दिलेली चाळीस दिवसांची मुदत उलटून गेली आहे आपणास यासाठी पाच दिवसांची वाढीव मुदत देण्यात येत आहे या मुदतीत आधार प्रमाणीकरण न केल्यास आपली निवड रद्द होईल. असा मेसेज ज्या शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण महाडीबीटी फार्मर योजनेअंतर्गत निवड झाली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आला आहे.
तर शेतकरी बंधूंनो अजूनही तुम्ही कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन तुमचे आधार प्रमाणीकरण केले नसेल तर लवकर करून घ्या तुमच्याकडे फक्त पाच दिवस बाकी आहेत. मेसेज मध्ये दिलेल्या माहितीनुसार जर शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आधार प्रमाणीकरण केले नाही तर त्यांची निवड रद्द करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.
तर आपण खाली पाहणार आहोत मोबाईलच्या मदतीने तुम्ही महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरण कसे करायचे.
महा-डीबीटी आधार प्रमाणीकरण मोबाईल मधून करा | MahaDBT Farmer Scheme Aadhar Verification in marathi
महाडीबीटी कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप चा वापर करा.
1) सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
2) येथे तुम्हाला देण्यात आलेला User Id आणि Password टाका आणि Captch टाकून लॉगिन करा.
3) तुम्हाला एक मेसेज दिसेल अभिनंदन कृषी विभागाच्या योजनांच्या ऑनलाईन सोडतील आपली निवड झाली असून कृपया आपण कागदपत्रे अपलोड करा हे टॅब वर क्लिक करून वैयक्तिक कागदपत्रे विविध काल मर्यादित अपलोड करावी त्याच्या ok बटनावर.
4) तुम्हाला डाव्या बाजूला मुख्य पृष्ठ (Home) च्या खाली वैयक्तिक तपशील (Profile) ह्या पर्यायावर क्लिक करा.
5) माहिती अद्यावत करा टॅबच्या खाली “आधार नुसार माहिती अद्यावत करा” या पर्यायावर क्लिक करा.
6) तुमचा आधार नंबर दिसेल बाजूला OTP पाठवा बटनावर क्लिक करा.
7) तुमच्या आधार नंबर ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येतो ओटीपी टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
8) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलच्या मदतीने फक्त एका मिनिटात महाडीबीटी पोर्टलवरून कृषी यांत्रिकीकरण योजनेचे आधार प्रमाणीकरण करू शकता.
9) हीच माहिती तुम्ही खाली व्हिडिओ स्वरूपात पाहू शकता व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे आधार प्रमाणीकरण करू शकता.
10) ही माहिती खूप महत्त्वाची असल्यामुळे शेतकरी बंधूंमध्ये नक्की शेअर करा.
Mala majh Aadhar no Farmer dbt account Varun delet karaych ahe . त्यासाठी काय करावं लागेल