ITI समुपदेशन फेरी म्हणजे काय | What is ITI Samupadeshan Feri In Marathi ITI 5th Merit List –

What is ITI Samupadeshan Feri In Marathi ITI 5th Merit List – :  ITI समुपदेशन फेरी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची लिस्ट असते. परंतु तरी विद्यार्थी या क्षेत्रामध्ये नवीन असल्यामुळे त्यांना माहीत नसते की समुपदेशन फेरी म्हणजे काय समुपदेशन फेरीमध्ये ऍडमिशन कसे केले जाते फार्म कसा भरावा लागतो. परंतु या पोस्टमध्ये तुम्हाला आयटीआय समुपदेशन फेरी बद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. या माहितीच्या मदतीने तुम्ही आयटीआय समुपदेशन फेरी काय असते ती कशी राबवली जाते संपूर्ण माहिती मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
आयटीआय पाचवी मेरिट लिस्ट , आयटीआय समुपदेशन फेरी, आयटीआय स्पॉट राऊंड, iti समुपदेशन फेरी म्हणजे काय, आयटीआय फिफ्थ मेरिट लिस्ट

ITI समुपदेशन फेरी म्हणजे काय ? | What is ITI Samupadesh Feri Merit list – ITI 5th Merit list

ITI समुपदेशन फेरी त्यालाच आपण ITI 5th Merit list म्हणू शकतो तसेच ITI Spot round असे सुद्धा संबोधले जाते. तर ITI समुपदेशन फेरी म्हणजे आयटीआयच्या चारही मेरिट लिस्ट लागल्यानंतर रिक्त असलेल्या जागा भरणा करण्यासाठी तयार करण्यात आलेली मेरिट लिस्ट म्हणजे ITI समुपदेशन फेरी होय.

ITI समुपदेशन फेरी कशी असते | How is it ITI Samupadesh Merit List

ITI समुपदेशन फेरीमध्ये वरती दिलेल्या माहितीप्रमाणे आयटीआय संस्थांमध्ये रिक्त असलेल्या जागांची माहिती घेऊन त्या जागा भरल्या जातात. ITI समुपदेशन या फेरीमध्ये रिक्त असलेले आयटीआय ट्रेड विद्यार्थ्यांच्या इच्छेप्रमाणे रिक्त असलेल्या ट्रेड मधून त्यांना निवड करायला सांगितले जाते. त्यानंतर त्यांना अलोटमेंट लेटर दिले जाते आणि त्याच दिवशी त्यांना ऍडमिशन करावे लागते अशा पद्धतीने ITI समुपदेशन असते.

ITI समुपदेशन साठी कोण पात्र असते कोण नाही| Eligibility for ITI Samupadesh Feri or ITI 5th merit list

1) ITI समुपदेशन फेरीसाठी असे विद्यार्थी पात्र असतात की ज्यांचा आयटीआयच्या चारही मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागला नसेल ते विद्यार्थी या ITI समुपदेशन साठी पात्र असतात.
2) ज्या विद्यार्थ्यांनी ITI ॲडमिशन फॉर्म भरलेला नाहीये परंतु ITI समुपदेशन फेरीच्या वेळेस त्यांनी फार्म भरला तर ते सुद्धा या ITI समुपदेशन फेरी साठी पात्र असतात.

ITI समुपदेशन फेरी साठी नवीन ऍडमिशन फॉर्म भरावा लागतो का ? | ITI Samupadesh Feri new admission form filling required or not

ITI समुपदेशन फेरीसाठी फक्त काही विद्यार्थ्यांना नवीन ऍडमिशन फॉर्म भरावा लागत असतो. त्याबद्दल खाली सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे.
1) असे विद्यार्थी की ज्यांचा आयटीआयच्या चारही मेरिट लिस्ट मध्ये नंबर लागला नाही अशा विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरायची आवश्यकता राहत नाही आधी भरलेला ऍडमिशन फॉर्म च्या मदतीने ते ITI समुपदेशन या फेरी साठी पात्र असतात.
2) असे विद्यार्थी की ज्यांनी चारही मेरिट लिस्ट लागेपर्यंत आयटीआय ऍडमिशन फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरावा लागतो.
3) असे विद्यार्थी की ज्यांचा नंबर आयटीआयच्या पहिल्या तीन मेरिट लिस्ट मध्ये लागला होता आणि कंपल्सरी ट्रेड मध्ये जर त्यांचा नंबर लागला असेल आणि त्यांनी ऍडमिशन घेतले नाही तर अशा परिस्थितीत त्यांना सुद्धा नवीन फॉर्म भरावा लागतो.
4) असे विद्यार्थी की ज्यांचा नंबर आयटीआयच्या पहिल्या तीन मिरीट लिस्ट मध्ये लाख होता परंतु ते ट्रेड कंपल्सरी न होते. अशा विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरायची आवश्यकता नाही.
5) असे विद्यार्थी की ज्यांचा नंबर आयटीआयच्या चौथ्या मिरीट लिस्ट मध्ये लागला होता परंतु त्यांनी ऍडमिशन घेतले नाही अशा परिस्थितीत सुद्धा विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरायचे आवश्यकता नाही.

ITI समुपदेशन फेरी मध्ये ऍडमिशन कसे घेतले जाते ? 

ITI समुपदेशन फेरीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आधी तुम्हाला तुमची पात्रता चेक करावी लागते वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही पात्र आहात की नाही हे चेक करून घ्या त्यानंतर तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागत असेल तर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरायची आवश्यकता नसेल तर पुढची माहिती वाचा.
1) ज्या विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म भरला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म भरला नसेल सर्वांना दिलेल्या टाईम टेबल नुसार ITI समुपदेशन फेरी साठी शाळा निवडावी लागते.
2) ITI समुपदेशन मध्ये ट्रेड निवडावे लागत नाही. या फेरीमध्ये ट्रेड शाळेत गेल्यानंतर वाटप केले जातात किंवा निवडावे लागतात.
3) ITI समुपदेशन फेरी साठी दिलेल्या टाईम टेबल नुसार तुम्हाला शाळेला भेट द्यावी लागते. तेथे ट्रेड वाटप झाल्यानंतर ऍडमिशन करावे लागते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top