What is Budget in Marathi – बजेट म्हणजे काय? बजेट कसा बनवला जातो? बजेटचे देशासाठी एवढे महत्त्व का आहे? जाणून घ्या बजेट बद्दलच्या सर्व रोचक गोष्टी तेही सरळ आणि सोप्या मराठी भाषेत. आपल्या देशाचा बजेट हा दरवर्षी सादर केला जात असतो. परंतु खूप लोकांना माहीत नाही की नेमके बजेट म्हणजे काय? बजेट दरवर्षी का काढला जातो. बजेट ला अर्थसंकल्प असेही म्हटले जाते. बजेट विषयी सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.
बजेट म्हणजे काय? 2023 What is Budget 2023 in Marathi?
अनुक्रमणिका
पहा
Budget Mhanje Kay – बजेट म्हणजे देशाचा वर्षासाठीचा जमा खर्च होय. किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, तर बजेट म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षात आपल्याकडे म्हणजेच देशाकडे किती पैसा गोळा होणार आहे. याचा अंदाजी अहवाल. यातील किती पैसे देशाच्या कोणकोणत्या कामासाठी कुठे कुठे खर्च होणार आहे. याचा अंदाज पत्र म्हणजे बजेट होय. (Budget 2023 India)
बजेट म्हणजे काय 2023 याबद्दलच्या खूप सार्या व्याख्या आहेत त्यातील काही व्याख्या खालील प्रमाणे.
1) केंद्रीय अर्थसंकल्प हे एका विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या कमाई आणि खर्चाचे अंदाजे विवरण आहे. सरकार विशिष्ट आर्थिक वर्षातील अंदाजे कमय आणि खर्चाचा तपशील अर्थसंकल्पाद्वारे सादर करते. यालाच आर्थिक बजेट असे म्हणतात.
2) विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लाभलेल्या आर्थिक मर्यादा नुसार जमाखर्चाची तोंड मिळवणे करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प होय किंवा त्यालाच आपण बजेट असे म्हणतो.
बजेट कसा तयार करतात? | 2023 Union Budget of india in Marathi
देशाच्या बजेट तयार करण्यासाठी वेगवेगळी मंत्रालय मिळून अर्थसंकल्पाने वर काम करतात. जसे की वेगवेगळी मंत्रालय केंद्रशासित प्रदेश राज्य वित्तीय संस्था सुरक्षा विभागातील वेगवेगळी खाते, उद्योगपती, विविध समित्या, शेतकरी, अशा सर्वांकडून येणारा पैसा व खर्च होणारा पैसा याबद्दलची माहिती गोळा केली जाते. त्याचबरोबर अर्थतज्ज्ञांचा सुद्धा बजेट तयार करण्यासाठी सल्ला घेतला जात असतो. या सर्वांचा विचार करून या सर्व बाबी पंतप्रधानांना सांगितल्या जातात. त्याचबरोबर निधीची तरतूद आणि कर विषयी माहिती त्यांना कळवली जाते व शिक्का झाल्यावर अर्थसंकल्प निश्चित होतो.
बजेटमध्ये कोणत्या मुख्य गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
बजेटमध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प त्याची कमाई आणि खर्च यांचा तपशील. तसेच नागरिकांच्या कल्याणकारी योजनांवरील खर्च. आयातीवरील खर्च. सुरक्षा आणि पगारावरील खर्च. व कर्जावरील व्याज हे सरकारचे प्रमुख खर्च आहेत. त्याचबरोबर याच्यात सरकारला मिळणाऱ्या कमाईच्या वाटेमध्ये येणारा कर. सार्वजनिक कंपन्यांची कमाई आणि जारी केलेले बॉण्ड त्यांच्यापासून मिळणारी कमाई यांचा समावेश आर्थिक बजेट मध्ये असतो.
केंद्रीय बजेटाचे दोन भाग कोणते?
केंद्रीय बजेट असे दोन भाग पडतात. हे दोघी भाग कोण कोणते हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. पहिला भाग म्हणजे
1) महसूल बजेट
2) कॅपिटल बजेट (भांडवली बजेट)
1) महसूल बजेट म्हणजे काय?
महसूल बजेट म्हणजे सरकारचे उत्पन्न आणि खर्च याची माहिती. त्याचबरोबर महसूल प्राप्ती किंवा कमाई आणि सरकारला मिळालेला महसूल खर्च याचे एकत्रीकरण म्हणजे महसूल बजेट होय.
2) कॅपिटल बजेट (भांडवली बजेट) म्हणजे काय?
कॅपिटल बजेट म्हणजे देशाचा भांडवली खर्च याच्यात यंत्रसामग्री उपकरणे घर आरोग्य सुविधा शिक्षण यावरील सरकारचा केलेला खर्चाचा लेखाजोखा समाविष्ट असतो. यालाच भांडवली बजेट किंवा कॅपिटल बजेट म्हटले जाते.
केंद्रीय बजेट 2023 माहिती | Union Budget or India 2023 in Marathi
आर्थिक केंद्रीय बजेट 2023 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत. अर्थसंकल्प केंद्रीय बजेट हा एक फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजेला सादर करण्यात येईल. हा अर्थसंकल्प देशातील अंदाजेच खर्चाच्या आणि उत्पन्नाचे अंदाज आला गृहीत धरून बनवलेला असतो. बजेट 2023 हा 01 एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षासाठी लागू असेल.
शासनाला उत्पन्न कुठून मिळते? | Government Income Scource
प्रत्येकाच्या मनात प्रश्न येत असतो की, सरकारला मिळाणारा पैसा कुठून येत असतो. शासनाला मिळणारे उत्पन्नाचे स्त्रोत्र काय आहेत. त्याची माहिती खालील प्रमाणे.
1) Income Tax
2) Corporate Tax
3) GST
4) Excise Duty
5) Disinvestment
6) Road & Toll
7) Passport & Viss Fees
8) Reserve Bank Fund
9) Government Companies
10) Electricity, Phone, Gas
12) State Government Intrest
Budget या शब्दाचा अर्थ काय होतो? | Budget Meaning in Marathi?
Budget म्हणजे अंदाजपत्रक. किंवा अर्थसंकल्प, किंवा प्रमुख जमाखर्चांची यादी. यालाच बजेट असे म्हटले जाते.
FAQ : Union Budget of india 2023 information in Marathi
Q: Who Presented Union Budget 2023
Ans: भारताचा अर्थसंकल्पीय आर्थिक बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून 01 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केला जाईल.
Q: What is the date of Budget 2023?
Ans: देशाचा आर्थिक अर्थसंकल्पीय बजेट हा एक फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजेला जाहीर करण्यात येईल.
Q: What is Union Budget 2023?
Ans: युनियन बजेट 2023 म्हणजे, देशाचा आर्थिक जमा खर्च जो पुढच्या आर्थिक वर्षासाठी दिला जात असतो. युनियन बजेट म्हणजे सरकारकडे जमा होणारा पैसा कोणकोणत्या मार्गाने येईल आणि तो कोणकोणत्या उपयुक्त ठिकाणी खर्च केला जाईल याचा विश्लेषण पद्धत सुरळीत अहवाल म्हणजेच युनियन बजेट होय.