तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरले गेले असे चेक करा मोबाईल मधून फक्त 1 मिनिटांत | Aadhaar Authentication History Check Online Aadhar Uses In Mobile

Aadhaar Authentication History Check Online Aadhar Uses In Mobile सर्वांना माहीत आहे की आधार कार्ड आता प्रत्येक शासकीय कामांमध्ये प्रमुख कागदपत्र म्हणून वापरले जाते. आधार कार्डचा वापर प्रत्येक ठिकाणी अनिवार्य करण्यात आला आहे. आधार कार्ड शिवाय तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. पण अशा परिस्थितीत आपण खूप ठिकाणी आधार कार्ड चे झेरॉक्स देत असतो. तर मग एक प्रश्न मनात निर्माण होतो की आपण आधार कार्ड चे झेरॉक्स तर देतोय परंतु त्याचा गैरवापर तर होत नाही ना तर तुम्ही चेक करू शकता की तुमचे आधार का कोठे वापरले गेलेले कोणत्या दिवशी वापरले गेले काय कामासाठी वापरले गेले अशी सर्व माहिती तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल च्या मदतीने चेक करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला ह्या आर्थिक मधली संपूर्ण माहिती सविस्तरपणे वाचावी लागेल तुम्हाला सरळ आणि सोप्या मराठी भाषेत आधार कार्ड कुठे वापरले गेले त्या बद्दलची माहिती व त्याच्या स्टेप देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली एक व्हिडीओ देण्यात आला आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरण्यात आले आहे ते व्हिडिओ च्या माध्यमाने पाहू शकतात तर मग चला मित्रांनो पाहूया आधार कार्ड कुठे वापरण्यात आले ते कसे चेक करायचे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

तुमचेआधार कार्ड कुठे वापरले गेले चेक करा मोबाईल मधून ( Aadhar Authentication History Check in mobile )

तर मित्रांनो तुमचे आधार कार्ड कुठे व काय कामासाठी वापरले गेले ते तुम्ही मोबाईल मधून चेक करू शकता ते फक्त एका मिनिटात त्याच्यासाठी खालील दिलेल्या माहितीचा वापर करा.

 

1) सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल.

https://uidai.gov.in/

2) लिंक वरती क्लिक करण्याआधी खाली दिलेली सर्व माहिती वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला आधार कार्ड कुठे वापरले गेलेत ते चेक करता येत आणि काही अडचण येणार नाही.

3) लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्ड ची वेबसाईट उघडेल.

4) वरती तुम्हाला My Aadhar नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे. त्या पर्यायात अस तुम्हाला Aadhaar Services असा पर्याय दिसेल त्याच्यामध्ये Aadhaar Authentication History ह्या पर्यायावर क्लिक करायचे.

5) त्यानंतर तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायला विचारले जाईल. सोबतच सिक्युरिटी कोड टाकावा लागेल आणि सेंड ओटीपी ह्या बटणावर क्लिक करावे लागेल.

6) तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी येईल. त्याचबरोबर नवीन माहिती तुम्हाला तिथे दिसेल.

7) तुम्हाला तारीख निवडावी लागेल की किती दिवसापासून तर किती दिवसाच्या आहात तील तुमच्या आधार कार्ड चा वापर कुठे कुठे झाला आहे ते तुम्हाला चेक करायचे आहे त्या तारखा तुम्हाला टाकावे लागतील.

8) त्यानंतर कमीत कमी तुम्ही 50 रेकॉर्ड एकावेळी चेक करू शकता. तुम्हाला किती रेकॉर्ड पाहायचे आहेत ते विचारले जाईल. रेकॉर्ड ची संख्या टाकायची.

9) तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाकायचा आणि व्हेरिफाय ओटीपी या बटनावर क्लिक करायचे.

10) त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये एक पीडीएफ डाउनलोड होईल त्याच्यात तुमचे आधार कार्ड कुठे काय कामासाठी कोणत्या तारखेला कोणत्या वेळी वापरले गेले अशी सर्व माहिती असेल.

11) अशा पद्धतीने तुम्ही आम्ही मोबाईल च्या मदतीने फक्त काही मिनिटातच तुमचे आधार कार्ड कुठे वापरण्यात आले आहे चेक करू शकता.

आधार कार्ड कुठे वापरण्यात आले आहे कसे चेक करायचे मोबाईल मधून व्हिडिओ च्या माध्यमाने पहा.

 

आधार कार्ड कुठे वापरण्यात आले आहे त्याबद्दल च्या काही प्रश्नांची उत्तरे.

प्रश्न : आधार कार्ड कुठे वापरण्यात आले आहे मोबाईल मधून चेक करू शकतो का ?

उत्तर : हो, वरील दिलेल्या माहितीचा वापर करून तुमचे आधार कार्ड कुठे वापरण्यात आले आहे तुम्ही चेक करू शकता.

प्रश्न : आधार कार्डची अधिकृत वेबसाईट कोणती ?

उत्तर : आधार कार्ड ची अधिकृत वेबसाईट ही https://uidai.gov.in/ आहे.

प्रश्न : आधार कार्ड कुठे वापरण्यात आले हे चेक करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे का ?

उत्तर : हो, तुमचे आधार कार्ड कुठे वापरण्यात आले हे चेक करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही चेक करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top