Ladki Bahin Yojana Documents New List In Marathi – लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. कारण आतापर्यंत खूप सारी डॉक्युमेंट्स बदललेली आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” याच्या कागदपत्रांच्या नियमांमध्ये खूप सारे बदल सुद्धा केलेले आहेत. तर आता या सर्व बदलानंतर लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे नेमके कोणते? त्याची संपूर्ण लिस्ट व सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Documents Maharashtra
माझी लाडकी बहिणी योजनेचे ऑनलाईन फार्म 31 ऑगस्ट 2024 पर्यंत भरल्या जाणार आहेत. तसेच हे अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती, लाडके बहिणी योजनेचा फार्म भरताना कोणती कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. याबाबतच्या खूप साऱ्या शंका अर्जदार महिलांच्या मनात आहे. तर आता लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केली जाणारी आवश्यक कागदपत्रे अधिकृतपणे खाली देण्यात आलेल्या आहेत. त्याला पर्यायी मार्ग म्हणून कोणती कागदपत्रे अपलोड करावी ती पण माहिती दिलेली आहे.
कागदपत्रे लिस्ट | Ladki Bahin Yojana Documents New List Updated PDF In Marathi
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- हमी पत्र (Download)
- उत्पन्न दाखला/ किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अधिवास प्रमाणपत्र/ किंवा 15 वर्ष पूर्वीचे रेशनकार्ड किंवा 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड/किंवा शाळा सोडल्याचा दाखला/ किंवा जन्म दाखला
महिलेचा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला असेल तर पतीचे खालील पैकी कागदपत्रे जोडावे
- अधिवास प्रमाणपत्र
- किंवा शाळा दोसल्याचा दाखला
- किंवा जन्म दाखला
- 15 वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड
- किंवा 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड
📄 ladki bahin yojana maharashtra documents list in marathi
काही महत्त्वाच्या सूचना सर्वांसाठी | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Documents New Update in Marathi
1) एखाद्या महिलेचे नाव लग्न झाल्यानंतर सासरच्या रेशन कार्ड मध्ये नसेल तरी ते रेशन कार्ड उत्पन्न दाखल्याच्या जागेवर अपलोड करू शकतात.
2) जर एखाद्या व्यक्तीकडे रेशन कार्डच नसेल तर अशा परिस्थितीत स्वयं घोषणापत्र अपलोड करा (परंतु याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना दिली होती पण याबाबत अधिकृतपणे शासन निर्णयात माहिती दिलेली नाही. त्यामुळे स्वयंघोषणापत्र बाबतची जबाबदारी स्वतः अर्जदाराची राहील याची काळजी घ्या. किंवा त्या ऐवजी उत्पन्न दाखला काढून घ्या.)
3) पंधरा वर्षांपूर्वीचे फक्त रेशन कार्ड आणि मतदान कार्ड ही दोनच डॉक्युमेंट लागणार आहेत.
4) जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला कधीही काढलेला असेल तरी तो चालणार आहे.
5) अर्जदार महिलेचे नाव सर्व कागदपत्रांवरती एकसारखे आहे का ते पण चेक करा नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.
6) ऑनलाइन फॉर्म भरताना सर्व फार्म एकदा चेक करा त्यानंतरच फॉर्म सबमिट करा.