💹 शेअर मार्केट बेसिक नॉलेज मराठी मध्ये | Share Market Basic Knowledge In Marathi

Share Market Basic Knowledge In Marathi

Share market basic knowledge in marathi – शेअर मार्केट बद्दल बेसिक आपण शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही शेअर मार्केट शिकू शकणार आणि शेअर मार्केट मध्ये Treding करू शकणार. जर तुम्हाला “Share Market” अगदी Basic पासून समजून घ्यायचे असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहेत. आपण या chapter मध्ये आपण शिकणार आहोत “Introduction To Share / Stock Market” तर चला मग पाहूया Basic Stock Market.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अनुक्रमणिका पहा

Share market basic knowledge in marathi

शेअर मार्केट चे संपूर्ण बेसिक नॉलेज आपण या पहिल्या चॅप्टर 1 (Chapter 1) मध्ये घेणार आहोत. ज्याच्यात तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि तेही खूप सोप्या आणि सरळ मराठी भाषेत. जेणे करून तुम्हाला शेअर मार्केट शिकता येईल.


Chapter – 1


Chapter 2 – 📈 शेअर मार्केट टेक्निकल ॲनालिसिस

📢 सूचना – Chapter 1 वाचून झाल्यावर मगच Chapter 2 वाचा नाहीतर Chapter 2 समजणार नाही

शेअर मार्केट बद्दल पसरलेल्या काही अफवा/ मीथ | Busting the Myths of the Stock Market

 1. Stock market मध्ये Investment करणे खूप Risky आहे.
 2. तुमच्याकडे Finance चे चांगले Knowledge पाहिजे.
 3. 25 दिन मे पैसा double…!
 4. Stock Market जुगार आहे का?
 5. Stock Market मध्ये invest करण्याची चांगली वेळ कोणती?
 6. Stock Market हे पैसा बनवण्याचे ठिकाण आहे का?

स्टॉक मार्केट म्हणजे काय? | What is Stock Market

1. Stock market असे ठिकाण जिथे Shares ची खरेदी विक्री केली जाते.
2. या ठिकाणी buyer and seller, stock broker च्या माध्यमाने भेटतात.
3. News आणि Events Stock Price कमी जास्त करतात.

“शेअर मार्केट” आणि “स्टॉक मार्केट” यामध्ये काय फरक आहे? | Difference Between Stock Market & Share Market

सांगायचं म्हटल म्हणजे शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट मध्ये फरक करणे खूप कठीण आहे. कारण जर पाहिले तर दोघी शब्द वेळेनुसार एकमेकांच्या जागी वापरले जातात. परंतु जर technically पाहिले तर, तर Stock Market आणि Share Market दोघी वेगवेगळे आहेत. पण तसा त्याच्यात जस्त फरक नाहीये. तर चला मग पाहूया यांच्यातील फरक.

शेअर मार्केट म्हणजे काय? | What is Share Market In Marathi?

शेअर हा शब्द फक्त एक कंपनी दर्शवतो, उदाहरण घेऊन समजून घेऊया, जसे की तुम्ही जर का फक्त एका कंपनी मध्ये Investment केली असेल किंवा त्या कंपनीचे शेअर घेतले असतील तर आपण त्याला बोलू शकतो की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली आहे. किंवा त्या कंपनीचे शेअर्स घेतले आहे.

शेअर्स म्हणजे काय? समजून घेऊया | What is share in marathi

शेअर्स म्हणजे, एखादी कंपनी आपला निधी वाढवण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनीचा काही मालकी हक्क तुकड्यांमध्ये विकते, त्या विभागणी केलेल्या तुकड्यानाच शेअर्स म्हणतात.
शेअर मार्केट म्हणजे, त्या कंपनीच्या तुकड्यांची म्हणजेच शेअर्स ची खरेदी किंवा विक्री करताना त्या बाजारपेठेला संबोधला जाणारा शब्द म्हणजे शेअर मार्केट होय.

स्टॉक मार्केट म्हणजे काय? | What is Stock Market in Marathi?

स्टॉक हा शब्द एक किंवा एकापेक्षा जास्त कंपनी दर्शवतो, उदाहरण घेऊन समजून घेऊया. जसे की, एका पेक्षा जात कंपनी मध्ये जर Investment केली असेल तर तेव्हा आपण स्टॉक मार्केट असा शब्द वापरतो.

स्टॉक म्हणजे, जेव्हा आपण एका पेक्षा जास्त कंपनीन मध्ये गुंतवणूक केलेली असते. किंवा एका पेक्षा जात कंपनीचे शेअर्स घेतलेले आसतात तेव्हा त्यांना स्टॉक असे म्हटले जाते.

स्टॉक मार्केट म्हणजे, एका पेक्षा जात कंपनीच्या शेअर ची खरेदी, विक्री करताना त्या बाजारपेठेला संबोधला जाणारा शब्द म्हणजे स्टॉक मार्केट होय.

सूचना – शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केट हे शब्द फक्त वेळेनुसार, व परिस्थिती नुसार वापरले जातात. हे शब्द एक वचनी आणि अनेक वचनी शब्द आहेत. यांच्या जास्त काही फरक नाही.

शेअर मार्केट चा वेळ | Market Timing

 • सोमवार ते शुक्रवार चालू असते (सरकारी सुट्या सोडून)
 • शनिवार आणि रविवार सुट्टी असते
 • सकाळी 9.15 AM मार्केट उघळते.
 • दुपारी 3.30 PM मार्केट बंद होते.

Basic Concepts Of Share Market

Bull Market (Bullish) Current Market Price
Bear Market (Bearish) Margin
Side Ways Market Market Order
Long Position Limit Order
Short Position 3 Months Payout

 

बुल मार्केट म्हणजे काय? | What is Bull Market (Bullish Market)

Bull Market म्हणजे वरती जाणारे मार्केट, किंवा वाढणारे मार्केट त्याला आपण म्हणू शकतो.

बियरिष मार्केट म्हणजे काय? | What is Bear Market (Bearish Market)

Bearshi Market किंवा Bear Market म्हणजे खाली जाणारे मार्केट, किंवा पडणारे मार्केट असे त्याला  म्हटले जाते.

साईड वेस मार्केट म्हणजे काय? | What is Side Ways Market?

Side Ways market म्हणजे असे मार्केट, जे खाली पण नाही आणि वरती पण नाही जात ते मध्येच अडकून एका बाजूला चालते. त्याला साईड वेस मार्केट म्हणतात.

साईड वेस मार्केट म्हणजे काय? | What is Side Ways Market?

लाँग पोझिशन म्हणजे काय? | What is Long Position in marathi?

Long Position म्हणजे, शेअर मध्ये वाढ होत असेल किंवा वाढत असेल तर शेअर Buy करणे. Intraday ट्रेडिंग करतांना ही Concept वापरली जाते.

शॉर्ट पोझिशन म्हणजे काय? | What is Short Position in marathi?

Short Position म्हणजे, शेअर ची किंमत घसरते तेव्हा त्याला Sell करणे नंतर त्याला Buy करणे या Short Position म्हटले जाते. Intraday ट्रेडिंग करतांना ही Concept वापरली जाते.

चालू मार्केटची किंमत म्हणजे काय? | What is Current Market Price

Current Market Price म्हणजे, शेअर मार्केट ची वर्तमान चालू किंमत त्यालाच Current Market Price म्हणतात.

मार्जिन म्हणजे काय? | What is Margin in Marathi?

Margin म्हणजे, शेअर मार्केट मध्ये Intraday ट्रेडिंग करतांना. Broker आपल्याला ट्रेड करण्यासाठी टक्केवारी पैसे देतो (5x, 2x किंवा 1x Margin) ज्यामुळे आपण आपल्याकडे आसलेल्या कामी पैशात जातीचा ट्रेड घेऊ शकतो. उर्वरित रक्कम ब्रोकर देतो आणि ती रक्कम ट्रेड संपल्यावर त्याची रक्कम परत घेतो त्याच रक्कमेचा Margin असे म्हणतात.

💁 उदाहरण – जसे की, माझ्याकडे ट्रेड करण्यासाठी 100 रुपये आहेत. मला A नावाच्या कंपनीचा 100 रुपयाचा 1 शेअर आहे असे मला 5 शेअर घ्यायचे आहेत. त्यांची किंमत 500 रू होते. तर अशा वेळी Intraday ट्रेड करतांना माझ्याकडच्या 100 रुपयाने मी 500 रू किमतीचे शेअर margin चा वापर करून घेऊ शकतो. हे शेअर घेतांना 5 शेअर्स मध्ये प्रत्येकी शेअर घेतांना 20 रू माझे असतील आणि 80 रू margin हे ब्रोकर देईल आणि हा ट्रेड संपल्यावर ते margin brokar परत घेतो. या वरून तुम्हाला समजले असेल की margin काय असते.

मार्केट ऑर्डर म्हणजे काय? | What is Market Order?

Market Order म्हणजे, एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतांना तो चालू current market price ला विकत घेणे यालाच मार्केट ऑर्डर म्हणतात.

लिमिट ऑर्डर म्हणजे काय? | What is Limit Order?

Limit Order म्हणजे, एखादा शेअर विकत घेतांना तो चालू किमतीच्या एखाद्या जवळपासच्या आपल्याला हव्या असलेल्या किमतीत विकत घेणे होय.

Limit Order मध्ये आपण दिलेल्या किमतीत जो पर्यंत शेअर ची किंमत येत नाही को पर्यंत शेअर Buy किंवा Sell होत नाही.

3 महिन्यात परतावा म्हणजे काय? | What is 3 Months Payout

3 Months Payout म्हणजे, सध्या ट्रेड करण्यासाठी आपल्या डिजिटल Demat Account मध्ये पैसे Add करावे लागतात. हे पैसे जर आपण 3 महिने किंवा 15 दिवसाच्या आत ट्रेड करण्यासाठी वापरले नाहीत. तर आपल्या Demat Account ला लिंक असलेल्या आपल्या बँक खात्यात ते पैसे परत पाठवले जातात. त्यालाच 3 Months Payout असे म्हटले जाते.

स्टॉप लॉस म्हणजे काय? | What is Stoploss

 1. Stoploss म्हणजे, Treding करतांना एका single Tred मध्ये जास्तीत जस्त स्वतःच्या ईच्छेने गमावले जाणारे Amount म्हणजे Stoploss होय.
 2. Stoploss म्हणजे, ट्रेड करतांना Limit लाऊन घेतलेला लॉस म्हणजे Stoploss होय.
 3. Stoploss म्हणजे, ट्रेड करतांना जास्तीचा लॉस होऊ नये म्हणून आपण एक लिमिट सेट करतो. त्याच्या पलीकडे जर का शेअर ची किंमत जाणार असेल. तर ट्रेड तिथेच कापला जातो आणि आपल्याला तेवढाच कमीत कमी लॉस होतो त्यालाच stoploss म्हणतात.

Position Sizing म्हणजे काय? | What is Position Sizing?

Position Sizing म्हणजे, कोणताही ट्रेड टाकतांना आपण विचार करावा की आपल्या कडे Capital किती आहे. त्याच्यातून आपण Treding साठी किती Capital चे रिस्क घेऊ शकतो. मग त्या ट्रेड साठी जास्तीत जास्त किती लॉस घेऊ शकतो ते चार्ट पाहून calculate करावे. त्यानंतर किती शेअर मागे ते लॉस आपण घेणार आहोत तेही calculate करावे म्हणजे किती शेअर आपल्याला घ्यायचे आहेत ते calculate करणे म्हणजेच पोझिशन साईजिंग होय.

 • तुमच्या कडे किती रक्कम (Capital) आहे ते चेक करणे.
 • ट्रेड टाकण्याआधी त्या एकत्रित कॅपिटल मधून किती कॅपिटल वरती आपण रिस्क घेऊ शकतो त्याचा विचार करावा.
 • त्यानंतर चार्ट पाहून Calculate करा की तुम्ही एक ट्रेड मागे जास्तीत जस्त किती लॉस घेऊ शकता.
 • आता  त्या लॉस वरू calculate करा की किती शेअर घ्यायचे

📢 उदाहरण – जसे की, आज मला ट्रेड टाकायचा आहे. तर मी आधी चेक करेल की माझ्या Demat Account मध्ये किती पैसे आहेत. या पैशांमधून किती पैसे हे ट्रेड साठी वापरायचे आहेत.
जसे की माझ्याकडे 1 लाख रु आहेत हे मी चेक केलं.
आता ज्यामधून मी आज ट्रेड करण्यासाठी 50 हजार वापरणार आहे.

आत calculate करा की या 50 हजार मधून तुम्ही एका दिवसात किती लॉस घेऊ शकत जसे की मी आज, या 50 हजार मधून 1000 रू एवढा लॉस घेण्यास तयार आहे.

आता परत calculate करा की त्या 1 हजार मधून प्रत्येक शेअर मागे किती लॉस घेऊ शकता. जसे की, या एक हजार मधून मी एका शेअर मागे 20 रू लॉस घेऊ शकतो.

यावरून आता ठरवायचे की, किती शेअर विकत घ्यायचे, जसे की, 1000 रू याला 20 रू भाग द्या 1000%20=50 म्हणजेच आपण 50 शेअर विकत घेऊ शकतो. आणि यालाच position sizing म्हटले जाते, यामुळे आपले मार्केट मध्ये कधीच जास्तीचे नुकसान होणार नाही.

Chapter 2 – 📈 शेअर मार्केट टेक्निकल ॲनालिसिस

1 thought on “💹 शेअर मार्केट बेसिक नॉलेज मराठी मध्ये | Share Market Basic Knowledge In Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top