📈 शेअर मार्केट टेक्निकल ॲनालिसिस मराठीत शिका | Share Market Technical Analysis in Marathi

Share Market Technical Analysis in Marathi

Share Market Technical Analysis in Marathi – शेअर मार्केट मध्ये Trading करतांना तुमच्या कडे Share Market Technical Analysis चे ज्ञान असायला हवे. जर ते नसेल तर तुम्ही Stock Market मध्ये जास्तीचे Loss Book करू शकता. त्यामुळे आपण या Chapter Second मध्ये Technical Analysis in Stock Market शिकणार आहोत तर चला मग शिकूया. अजून अशा बरीच काही गोष्टी ट्रेड टाकण्याआधी चेक कराव्या लागतात ज्या आपण पुढे शिकणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अनुक्रमणिका पहा

Share Market Technical Analysis in Marathi

या आधी आपण Chapter 1 मध्ये Stock Market चे Basic शिकूया घेतलं आता आपण Chapter 2 मध्ये Technical Analysis शिकूया घेऊया. जर तुम्ही पहिले chapter 1 वाचले नसेल तर आधी ते वाचा त्यानंतर मग chapter 2 वाचा जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी काही अडचण येणार नाही.


Chapter 2


📢 Chapter – 1 : शेअर मार्केट बेसिक नॉलेज मराठी मध्ये

 

💁 सूचना – Chapter 2 वाचाण्याआधी Chapter 1 वाचा नाहीतर तुम्हाला Chapter 2 समजणार नाही.

Technical Analysis म्हणजे काय? | What is Technical Analysis in Stock Market

शेअर मार्केटचे Technical Analysis म्हणजे, ज्या वेळी तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड टाकत आहेत त्यावेळी शेअर मार्केट ची स्थिती जाणून घेणे. तसेच ज्या शेअर किंवा कंपनीचा शेअर मध्ये तुम्हाला ट्रेड टाकायचा आहे. त्याची स्थिती चेक करणे. जसे की स्टॉक मार्केट किंवा तो शेअर Bull आहे,की Bear आहे. मार्केट हे Up Trend मध्ये आहे की Down Trend मध्ये कि Sideways आहे.

ट्रेंड म्हणजे काय? | What is Stock Market Trend in Marathi?

Trend म्हणजे काय, तर Stock Market मध्ये Trend म्हणजे शेअर मार्केट ची दिशा आणि Trend चे साधारणता खालील प्रमाणे 3 प्रकार पडतात.

  • Uptrend
  • Downtrend
  • Sideways

अपट्रेंड म्हणजे काय? | What is Uptrend

Uptrend म्हणजे, शेअर मार्केट जेव्हा वरच्या बाजूला चढते. तेव्हा त्याला Uptrend असे म्हणतात. uptrend हा एका तासासाठी किंवा एका दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी तसाच चालू शकतो.

डाऊन ट्रेंड म्हणजे काय? | What is Downtrend?

Downtrend म्हणजे, शेअर मार्केट जेव्हा खालच्या बाजूला उतरते. तेव्हा त्याला Downtrend असे म्हणतात. Downtrend हा एका तासासाठी किंवा एका दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी तसाच चालू शकतो.

साईड वेज ट्रेंड म्हणजे काय? | What is Sideways Trend?

Sideways trend म्हणजे, जेव्हा स्टॉक मार्केट जास्त खाली ही उतरत नाही, आणि जास्त वरती ही चढत नाही, मध्येच एका बाजुला अडकते त्याला sideways trend किंवा sideways market असे म्हणतात. Sideways हा एका तासासाठी किंवा एका दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी तसाच चालू शकतो.

बुल आणि बियर मार्केट मध्ये काय फरक आहे? | What is Bull vs Bear Market

Bull Market Bear Market
बुल मार्केट हे, वरती चढणारे किंवा वरच्या दिशेने जाणारे मार्केट असते बियर मार्केट हे, खाली उतरणारे किंवा खाली पडणारे किंवा खालच्या दिशेने जाणारे मार्केट  असते.
बुल मार्केट यालाच Uptrend मार्केट असेही म्हटले जाते. बियर मार्केट याला Downtrend मार्केट असेही म्हटले जाते.
बुल मार्केट मध्ये Share’s ची किंमत वाढते. बियर मार्केट मध्ये Share’s ची किंमत कमी होते.

स्विंग म्हणजे काय? | What is Swing in marathi?

Swing म्हणजे, Chart मधील एका ट्रेंड मधील Higest किंवा Lowest टोकाला Swing असे म्हणतात. उदाहरण म्हणून खाली फोटो पहा.

💁 सूचना – Swing आणि Swing Trade यादोघांमध्ये फरक आहे.

ट्रेंड चे प्रकार | Types of Trade in Marathi

Stock Market मध्ये ट्रेड करतांना वेगवेगळ्या प्रकारे Trading केली जाते. म्हणून Trading करण्याचे सुद्धा एकुण 4 प्रकार आहेत. ज्यांना आपण खाली सविस्तर पणे समजून घेऊया.

Types of Trade
  • Scalping Trade (for some minutes)
  • Intraday Trade (for some hours)
  • Swing Trade (for some weeks)
  • Delivery Trade (for some years)

स्कॅल्पिंग ट्रेड म्हणजे काय? | What is Scalping Trade in Marathi?

Scalping Trading म्हणजे, काही मिनिटांसाठी घेतलेला ट्रेड किंवा अशी ट्रेडिंग ज्याच्यात आपण फक्त काही मिनिटांसाठी शेअर घेतो आणि त्याला लगेच काही मिनिटात विकतो यालाच Scalping असे म्हणतात.

इंट्राडे ट्रेड म्हणजे काय? | What is Intraday Trade in Marathi?

Intraday Trading म्हणजे, फक्त काही तासांसाठी घेतलेला ट्रेड किंवा अशी ट्रेडिंग ज्याच्यात आपण काही तासांसाठी शेअर्स विकत घेतो आणि काही तासांनी त्यांना त्याच दिवशी विकतो यालाच Intraday Trading असे म्हणतात.

स्विंग ट्रेड म्हणजे काय? | What is Swing Trade in Marathi?

Swing Trading म्हणजे, काही आठवड्यांसाठी घेतलेले ट्रेड किंवा अशी ट्रेडिंग ज्याच्यात ट्रेड हा काही आठवड्यांसाठी  घेतला जातो आणि काही आठवड्यांनी लगेच विकला जातो त्यालाच Swing Trade किंवा Swing Trading असे म्हटले जाते.

डिलिव्हरी ट्रेड म्हणजे काय? | What is Delivery Trade in Marathi?

Delivery Trading म्हणजे, काही वर्षांसाठी घेतला जाणारा ट्रेड किंवा अशी ट्रेडिंग ज्याच्या शेअर हे काही वर्षणसाठी विकत घेतले जातात आणि काही वर्ष झाल्यावर विकले जातात.

चार्ट म्हणजे काय?| What is Chart in Marathi

Chart म्हणजे, Lines किंवा Candels यांच्या माध्यमाने स्टॉक मार्केटची दिशा दर्शवणारी फ्रेम म्हणजे चार्ट होय. चार्ट हे स्टॉक मार्केट मध्ये ट्रेड करतांना खूप महत्वाची भूमिका बजावतो चार्ट शिवाय तुम्ही Stock Market मध्ये योग्यरीत्या ट्रेड करूच शकत नाही. Chart आणि Chandels बद्दल पुढील Chapter मध्ये सविस्तर पणे अभ्यास करणार आहोत.

टाईम फ्रेम म्हणजे काय? | What is Time Frame?

Time Frame म्हणजे, वेगवेगळ्या टाईम नुसार मार्केटची दिशा दर्शवणारा चार्ट म्हणजेच टाईम फ्रेम होय. जे आपण आपल्या हव्या त्यावेळी बदलू शकतो. Time Frame Generally आपल्याला Chart मध्ये पाहायला मिळतात. Chart मध्ये Time Frame खूप साऱ्या प्रकाच्या आहेत. पण त्यामधून वेगवेगळ्या ट्रेड साठी सतत वापरल्या जाणाऱ्या टाईम फ्रेम खालील प्रमाणे.

💁 महत्वाचे – कोणत्या ट्रेड साठी कोणती टाईम फ्रेम वापरावी त्याची माहिती खाली दिली आहे.

Time Frame with Trade Types
Scalping Trade 1 min किंवा 5 min
Intraday Trade 5 min किंवा 15 min
Swing Trade Hourly किंवा Daily
Delivery Trade Daily किंवा Weekly

📢 Chapter – 1 : शेअर मार्केट बेसिक नॉलेज मराठी मध्ये

2 thoughts on “📈 शेअर मार्केट टेक्निकल ॲनालिसिस मराठीत शिका | Share Market Technical Analysis in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top