Gramsevak Bharti Information 2023 – ग्रामसेवक भरती तीन वर्षापासून झालेली नाही. ग्रामसेवक भरतीसाठी खूप विद्यार्थी तयारी करत आहेत. खूप सारे विद्यार्थी ग्रामसेवक भरतीची वाट पाहत आहेत. ग्रामसेवक भरतीसाठी जास्त वेळ राहिलेला नाही लवकरच भरती सुरू होणार आहे. ग्रामसेवक भरती 2023 कोणत्या तारखेपासून चालू होईल. ग्रामसेवक भरती साठी शिक्षण पात्रता. ग्रामसेवक भरती साठी वयाची अट. ग्रामसेवक भरती सिल्याबस अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. ग्रामसेवक भरती बद्दलच्या संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.
अनुक्रमणिका
पहा
Gramsevak Bharti 2023 Information in Marathi
गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य वागळल्यानंतर गावातील कारभार सांभाळणारा व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक होय. यांच्यानंतर सहकारी कामे ग्रामसेवक करत असतो. करोना महामारी नंतर ग्रामसेवक भरती झाली नाही. ग्रामसेवक भरती ही जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग अंतर्गत होत असते. ग्रामसेवक भरतीसाठी मिळालेल्या माहितीनुसार दहा हजार पदांची भरती होईल अशी माहिती मिळत आहे. जिल्हा परिषद भरती बद्दलचा शासनाचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्याच्यात जिल्हा परिषद भरतीचे संभाव्य वेळापत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे. म्हणजेच ग्रामसेवक भरती ही लवकरच होणार आहे.
ग्रामसेवक भरतीसाठी शिक्षण पात्रता | Gramsevak Bharti 2023 Qualification Eligibility
ग्रामसेवक भरती साठी शिक्षण पात्रता कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे व बारावी मध्ये कमीत कमी 60 टक्के गुण आवश्यक आहेत तरच तुम्ही अर्ज करू शकता.
जर तुम्हाला बारावी 60% टक्के गुण नसतील तर, कृषी क्षेत्रातील विषयांमध्ये पदविका किंवा पदवी झालेली असावी. पदवी कोणत्याही शाखेतील असो मी अर्ज करू शकता.
पदवी म्हणजेच बीए बीएस्सी बी कॉम तीन वर्षाची पदवी किंवा चार वर्षाची पण तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर वरील शिक्षण पात्रते तुम्ही बसत असाल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहात व अर्ज करू शकता.
ग्रामसेवक भरतीसाठी वयाची गट | Gramsevak Bharti 2023 Age Limit
ग्रामसेवक भरती फॉर्म भरण्याआधी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की ग्रामसेवक भरतीसाठी वयाची अट किती असते. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ग्रामसेवक भरतीसाठी कमीत कमी वय 18 वर्षे तर जास्तीत जास्त 38 वर्षे असणे आवश्यक असते. यापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास तुम्ही अर्ज करू शकत नाही.
सूचना : उमेदवार इतर प्रवर्गातील असेल तर 38 वर्षापेक्षा वय जास्त नसावे परंतु आरक्षित प्रवर्गातील असेल तर शासन नियमानुसार 3 किंवा 5 वर्ष सूट असू शकते.
ग्रामसेवक पदाला किती पगार असतो | Gramsevak Salary In Marathi
ग्रामसेवक झाल्यानंतर पगार किती असतो. हा प्रश्न प्रत्येकाला येत असतो. ग्रामसेवक पदासाठी जर तुमची निवड झाली तर तुम्हाला सुरुवातीला 5,200 ते 20200 दरम्यान असू शकते. त्याचबरोबर याच्यात इतर भत्ते दिले जात असतात. शासन नियमानुसार पगार कमी जास्त होऊ शकतो.
ग्रामसेवक भरती 2023 सिल्याबस | Gramsevak Bharti 2023 Syllabus In Marathi
ग्रामसेवक भरती सिल्याबस हा आतापर्यंत झालेल्या मागील ग्रामसेवक भरती नुसार खाली देण्यात आला आहे.
ग्रामसेवक भरती लेखी परीक्षा ही 200 गुणांची असते
मराठी विषयाचे एकूण 15 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 30 गुण
इंग्रजी विषयाचे एकूण 15 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण
अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे एकूण 15 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 30 गुण
सामान्य ज्ञान विषयाचे एकूण 15 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 30 गुण
कृषी आणि तांत्रिक विषयाचे 40 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 80 गुण
ग्रामसेवक परीक्षा 200 गुणांची होत असते. या दोनशे गुणांच्या परीक्षेसाठी दीड तास दिला जात असतो.
ग्रामसेवक भरती परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते.
ग्रामसेवक भरतीसाठी येणारे प्रश्न बहुपर्यायी असतात.
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
FAQ: Gramsevak Bharti 2023 Information in Marathi
Q : Gram Sevak Bharti Patrata in Marathi?
Ans: ग्रामसेवक भरती पात्रता? ही उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे तर कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
Q: Garm Sevak Bharti 2023 Form Date? In Marathi
Ans: ग्रामसेवक भरती फॉर्म 5 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023
Q: Gram Sevak Bharti 2023 Last Date? In Marathi
Ans: ग्रामसेवक भरती ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
Q: Gram Sevak Bharti 2023 Maharashtra Syllabus in Marathi?
Ans: ग्रामसेवक भरती 2023 सिल्याबस मराठी मध्ये computerworldcentre.com या वेबसाईट वरती मिळून जाईल.
Q: Gram Sevak Bharti 2023 Age Limit in Marathi?
Ans: ग्रामसेवक भरती 2023 वयाची अट 18 ते 38 वर्ष व कॅटेगिरी नुसार तीन ते पाच वर्षे सूट राहील.
Diploma asel tr form bharta yete ka