कोतवाल भरती 2023 जळगाव मोबाईल मधून फॉर्म भरा | Kotwal Bharti 2023 Jalgaon Form Fillup Process Jalgaon Kotwal Bharti Apply Online

Kotwal Bharti 2023 Jalgaon : –Form Fillup Process Jalgaon Kotwal Bharti Apply Online – चौथी पास असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर जळगाव जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रिक्त असलेल्या कोतवाल या पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी शिक्षण पात्रता फक्त चौथी पास आहे. तर या भरतीसाठी मोबाईल मधून अर्ज कसा करायचा. भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Kotwal Bharti 2023 Jalgaon- Jalgaon Kotawal Bharti 2023 Apply Online. Sub Divisional Officer Jalgaon Taluka, Chalisgaon, Amalner, Bhusawal, Pachora, Erendol, Faizpur Police Patil Bharti 2023 Form Fillup Proces in Marathi as well as kotwal salary, age limit, last date to apply all important information is below

Kotwal Bharti 2023 Jalgaon Maharashtra

पदाचे नाव – कोतवाल
तालुका नुसार भरल्या जाणाऱ्या जागा -. कोतवाल भरतीसाठी भरल्या जाणाऱ्या जागा तालुका नुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.
टीप – गाव नुसार जागा पाहण्यासाठी जाहिरात PDF पहा

अ.
क्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उपविभाग

पद संख्या

1

अमळनेर

16

2

जळगाव

11

3

फैजपुर

12

4

चाळीसगाव

06

5

पाचोरा

11

6

एरंडोल

13

7

भुसावळ

11

एकुण

80

Education Qualification Details of Kotwal Recruitment

शैक्षणिक पात्रता – 4 थी पास (गावाचा स्थानिक रहिवासी असावा)
वयाची अट – कोतवाल भरतीसाठी अर्जदाराचे वय 18 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण – जळगाव जिल्हा (महाराष्ट्र)

Kotwal Bharti Jalgaon Application Form Fee

अर्ज फी – खुला प्रवर्ग: 600/- व मागासवर्गीय: 500/-

Jalgaon District Kotwal Bharti 2023 Last Date

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023 (11:59) पर्यंत अर्ज करू शकता.
🌐 अधिकृत वेबसाईट – http://jalgaon.gov.in
 
 
⬇️ जाहिरात (PDF) – Download PDF
 
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Online
 
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा – व्हिडिओ पहा
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

कोतवाल भरती पात्रता व परीक्षा नियम अटी (Kotwal Recruitment Eligibility and Exam Rules Conditions)

1) कोतवाल भरतीसाठी उमेदवाराचे वय दिनांक 18 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्ष दरम्यान असावे.
2) कोतवाल भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार गावातील मूळ रहिवासी असावा. त्यासाठी पुरावा अर्ज आवश्यक राहील.
3) कोतवाल भरतीसाठी उमेदवाराची शिक्षण पात्रता किमान 4थी पास असावी.
4) कोतवाल भरतीसाठी अर्ज करताना मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
5) कोतवाल भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
6) कोतवाल भरतीसाठी अर्जदार व्यक्तीवर कोणत्याही गुन्ह्याची नोंद किंवा न्यायालय शिक्षा नसावी.
7) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्र. के. ओटी- 6073/30004/ल, दिनांक 28/02/2974 नुसार कोतवाल म्हणून नेमणूक करताना इतर सर्व गोष्टी बरोबर असतील तर त्या सजेतील पूर्वीच्या कोतवालांच्या वारसांना इतर उमेदवारांपेक्षा प्राधान्य देण्यात येईल. तसेच इतर दोन उमेदवारांचे अंतिम गुण सारखे असल्यास उमेदवारांच्या गुणवत्ताक्रम सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णय दिनांक 13 जून 1018 मधील नमूद निकषावर लावला जाईल.
8) कोतवाल भरतीसाठी परीक्षेमध्ये किमान 40 गुण मिळवणे आवश्यक असेल.
9) अर्जुन उमेदवार वर नमूद केलेल्या पात्रेसह लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल.
10) उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणी कामी तात्पुरती निवड यादी व कागदपत्रे तपासणी अंतिम निवड यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
11) उमेदवारांना लेखी परीक्षेला व कागदपत्रे पडताळणी वेळेस उपस्थित राहण्यासाठी प्रवास खर्च व इतर खर्च दिला जाणार नाही.
12) उमेदवार अनुसूचित जाती/जमाती व खुल्या प्रवर्ग असल्यास त्यांना नॉन क्रिमिलेर सन 2023-24 पर्यंत वैद्य असलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
13) भरतीच्या नियमांमध्ये प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुधारित शासन निर्णय/परिपत्रकानुसार बदल होऊ शकतो.
14) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र) नियम 2005 मधील 4 मधील तरतुदीनुसार कुटुंबात दिनांक 28/03/2005 नंतर जन्मलेले दोन पेक्षा जास्त आपत्य नाहीत याबाबत नमुना- अ मधील कागदपत्रांची तपासणी वेळेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
15) भरती अर्ज पूर्ण माहितीसह व अचूक भरावा, त्यात नमूद करण्यात आलेली सर्व माहिती खरी असणे बंधनकारक आहे.

परीक्षेचे स्वरूप ( Exam Pattern)

पदाचे नाव – कोतवाल (तात्पुरत्या स्वरूपात)
लेखी परीक्षेचे गुण – 100 गुण

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व कार्यक्रम

1) लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल (प्रश्न संख्या 50)
2) कोतवाल (तात्पुरत्या स्वरुपात) पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल.
3) उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
4) उमेदवाराला लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळवणे आवश्यक असेल.
5) लेखी परीक्षेत गुणवंत्तेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती कागदपत्रे तपासणी निवड यादी व कागदपत्रे तपासणी अंतिम निवड यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
6) लेखी परीक्षा कागदपत्रे चालणे इत्यादी करिता प्रवेशपत्र, कार्यक्रम, विविध सूचना या केवळ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील. पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार नाहीत. सबब सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती/कार्यक्रमाबाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
7) तसेच परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. प्रवेशपत्रावरच उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश दिला जाईल.

निवडसाठी कार्यपद्धती, अटी व शर्ती

1) लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडसाठी विचार केला जाणार नाही.
2) लेखी परीक्षा शेवटी पात्र उमेदवारांचे जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्र पडताळणी करण्याकरिता अंतरिम स्वरूपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती, परीक्षा शुल्क, बोलू कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिद्ध होईल अशाच उमेदवारांच्या विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अहर्ता, ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल अथवा अशा उमेदवारांचे मागितलेले सामाजिक किंवा समांतर आरक्षण अथवा प्रक्रिया शुल्क इ. सारख्या सवलती नामंजूर करण्यात येतील.
3) उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक राहील. त्यावेळेस उमेदवाराची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतिम निश्चित करण्यात येईल.
4) उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक राहील.
5) कोणत्याही राजकीय पक्षाशी सबंध न ठेवण्याबाबतचे रुपये 100च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणी वेळेस सादर करणे आवश्यक राहील.
6) उमेदवार कोणताही एकाच स्थानिक कायमचा रहिवासी असू शकतो. बाबतचा अर्ज करणे आवश्यक आहे.
7) प्रत्येक सजेत केवळ एक पद उपलब्ध आहे. ते शासकीय निकषानुसार आरक्षित करण्यात आलेले आहे. अर्ज करताना उमेदवाराने आरक्षण तपासूनच अर्ज करावा.
8) संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सर्व उपविभागातील पदांसाठी एकाच ठिकाणी एकाच वेळेस परीक्षा घेण्यात येईल.
9) संपूर्ण भरती प्रक्रिया सजेनिहाय होणार असून कोणत्याही दोन सजेच्या प्रक्रियेच्या एकमेकांशी संबंध नसेल.
10) कोतवाल हे पद वर्गीकृत नाही.
11) कोतवाल हे पद एका सजेत एकच असते. त्यामुळे हे पद एकाकी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक खेळाडू यासारखे समांतर आरक्षणे लागू नाही आहेत.
12) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांना महिला आरक्षणाच्या लाभ हवा असेल तर त्यांनी तशी मागणी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. शासन निर्णय महिला व बालकल्याण क्र. 82/2001/म.से.आ. 2000/प्र. क्र. 415/का 2 दिनांक 25/05/2001 मधील तरतुदीनुसार महिलांसाठी आरक्षण राहील.

Kotwal Bharti 2023 Jalgaon Form Fillup Process Jalgaon Kotwal Bharti Apply Online

Q. कोतवाल भरतीसाठी शिक्षण पात्रता?
Ans. अर्जदाराचे शिक्षण किमान 4थी पास असावे.
Q. जळगाव जिल्ह्यात किती तालुक्यांमध्ये कोतवाल भरती निघाली आहे. 
Ans. जळगाव जिल्हा कोतवाल भरती 2023 एकूण 07 तालुक्यांसाठी भरती निघाली आहे.
Q. कोतवाल भरती वयोमर्यादा?
Ans. कोतवाल भरतीसाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे (18 जुलै 2023 रोजी)
Q. कोतवाल भरती जळगाव जिल्हा अधिकृत वेबसाईट?
Ans. http://jalgaon.gov.in
Q. जळगाव कोतवाल भरती 2023 अर्ज करायची शेवटची तारीख
Ans. जळगाव कोतवाल भरतीसाठी अर्ज 31 जुलै 2023 (11:59) पर्यंत अर्ज करू शकता.
 
Q. कोतवाल भरती अर्ज कसा करायचा?
Ans. कोतवाल भरतीसाठी अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top