मिलिटरी भरती फ्री ट्रेनिंग मिळणार 10,000 रु लवकर अर्ज करा मोबाईल मध्ये | Military Bharti Free Training Mahajyoti

Military Bharti Free Training Mahajyoti – मिलिटरी भरतीसाठी परीक्षा पूर्व प्रशिक्षणा करिता 2023-2024 या वर्षांमध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महा ज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर या मिलिटरी ट्रेनिंग 2023 साठी कोणते मुलं-मुली अर्ज करू शकता वयाची अट शिक्षण पात्रता अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

थोडक्यात माहिती | Military Bharti Training 2023

  • प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर उमेदवारांची संख्या-1500
  • प्रशिक्षणाच्या कालावधी-6 महिने
  • विद्यावेतन-10,000/-प्रत्येक महिन्याला ( 75% उपस्थिती असल्यास )
  • आकस्मिक निधी-12,000/-( एकवेळ )

योजनेच्या लाभासाठी पात्रता | Eligibility Criteria

1) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी.
2) अर्जदार इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास व प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी.
3) अर्जदार नॉन-क्रिमिलेयर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी.
4) अर्जदार 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
5) महाज्योतीच्या कोणत्याही योजनांच्या कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या अर्जदाराने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
6) अर्जदाराची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
7) अर्जदाराचे कमीत कमी वय 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 21 वर्षापेक्षा जास्त असू नये.

शारीरिक पात्रता | Phyaical Eligibility

पुरुष उंची– कमीत कमी 157 से.मी.
महिलांची उंची- 152 से.मी.
छाती– कमीत कमी 77 से.मी. ( दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 से.मी.) केवळ पुरुषांकरिता.

प्रशिक्षणाकरिता द्यावयाचे वैद्यकीय मानके-

1) अर्जदाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे.
2) छातीच्या विकास कमीत कमी 4 से.मी. विस्तारित असावा.
3) प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांनी 6/6 अंतरांच्या दृष्टिकोन वाजता आला पाहिजे. ( सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी ( CP-3 असावी )
4) नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. ( म्हणजे किमान 14 दंतबिंदू )
5) हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हेरीकोकण किंवा मुळव्याध यांसारखे रोग नसावेत.
6) लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे. ( उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करूनच अर्जदारांनी नोंद घ्यावी )

लाभार्थी निवड प्रक्रिया | Military Bharti Training 2023 Selection Process

1) महाज्योति मार्फत लाभार्थ्याची निवड करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
2) प्राप्त अर्जाची निकषानुसार छाननी करण्यात येईल.
3) छाननी मध्ये पात्र अर्जदाराची मिलिटरी भरतीपूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
4) चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकना नुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र अर्जदाराची यादी व प्रतिक्षायादी महा ज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

प्रशिक्षणाचे स्वरूप

1) मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.
2) सदर प्रशिक्षणाच्या कालावधी हा 6 महिन्यांच्या असेल.
3) प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.
4) प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल.

आरक्षण 

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे-
 

कॅटेगरी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टक्केवारी

एकुण जागा

OBC 59%

59%

885

VJ-A

10%

150

NT-B

8%

120

NT-C

11%

165

NT-D

6%

90

SBC

6%

90

एकुण जागा (Total)

1,500

पुढील प्रमाणे पुढील प्रमाणे-

1) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
2) प्रवर्गनिहार महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents List For Military Bharti Training 2023

1) आधार कार्ड
2) जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
3) रहिवाशी दाखला (Domicile Certificate)
4) वैद्य नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Leyer)
5) विद्यार्थी 12वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा
6) पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधार कार्ड लिंक असावा)
7) अनाथ असल्यास दाखला

अर्ज कसा करावा | How to Apply Military Training 2023 Mahajyoti

1) महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for Military- 2023-24 Training” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
2) माझ्यासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षाकित करून स्पष्ट दिसते असे स्कॅन करून जोडावे.

अर्ज करण्याची वेबसाईट लिंक | Official Website Link

तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करून Military Bharti Training 2023 साठी अर्ज करू शकता
🌐 वेबसाईट लिंक – Apply Online

मोबाईल मधून फॉर्म भरा | Military Bharti Training 2023 Form Fillup Process

 

अटी व शर्ती

1) अर्ज करण्याची अंतिम तारीख 02/06/2023 राहील.
2) पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3) जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्जुन नाकारणी किंवा स्वीकारणे याबाबतचे सर्वाधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
4) प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांक संस्थेत प्रशिक्षणाकरिता रुजू होतील त्या दिनांकापासून त्यांना महाज्योतीच्या धोरणानुसार विद्या वेतन लागू होईल. तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहील.
5) कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेले माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करारी असल्यास किंवा या पूर्वी सदर योजनेच्या लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘सारथी’ या कडून योजनेच्या लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
6) महाज्योतीच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास विद्यार्थी या प्रशिक्षणास अपात्र ठरेल.
7) नमूद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे न सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्ज बाद करण्यात येईल.
8) विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी सलग्न असणे आवश्यक आहे.
9) अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre Number वर संपर्क करावा.
 
संपर्क क्रमांक-0712-2870120/21
E-mail ID: mahajyotimpsc21@gmail.com

FAQ – Military Bharti Free Training Mahajyoti

Q. Military प्रशिक्षणासाठी एकूण जागा किती आहेत?
Ans. प्रशिक्षणासाठी एकूण जागा 1500 आहेत.
Q. Military प्रशिक्षणाच्या कालावधी किती?
Ans. Military प्रशिक्षणाच्या कालावधी 6 महिने आहे.
Q. Military प्रशिक्षणासाठी विद्यावेतन किती मिळणार?
Ans. 75% टक्के हजार असल्यास 10,000 हजार महिना मिळेल.
Q. Military प्रशिक्षण 2023 शिक्षण पात्रता किती पाहिजे? 
Ans. Military प्रशिक्षणासाठी विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंव्हा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
Q. Military प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा किती?
Ans. विद्यार्थ्याचे कमीत कमी वय 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 21 वर्ष असावे.
Q. Military Training Center कोणते आहे?
Ans. Military Training Center पुणे आहे.
Q Military प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती?
Ans. अर्ज करण्याची अंतिम तारीख- 02/06/2023 आहे.
Q. Military प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची wabsite कोणती?
Ans. www.mahajyoti.org.in ही वेबसाईट आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top