💂 पोलीस भरती ग्राउंड कसे असते किती गुण असतात फिजिकल टेस्ट संपुर्ण माहिती 2024 | Police Bharti Ground 2024 Details in Marathi

Police Bharti Ground

📃 Police Bharti Ground Details in Marathi 2024 – पोलीस भरती ग्राउंड कसे असते? पोलीस भरती ग्राउंड ला किती मार्क्स असतात?, पोलीस भरती गोळा फेक गुण किती?, पोलीस भरती मध्ये सोळाशे मीटर धावण्यासाठी किती टाइमिंग असतो? पोलीस भरती फिजिकल टेस्ट मुलीसाठी कशी होते? पोलीस भरती फिजिकल टेस्ट मुलांसाठी कशी होते? पोलीस भरती ग्राउंड चाचणी मध्ये किती गुण असतात? महिला पोलीस भरती ग्राउंड? अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली मिळून जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अनुक्रमणिका पहा

 

[Police Bharti 2024 Ground Kase Asate – Police Bharti Physical test exam marks in marathi, Police Bharti Physical test girl, Police Bharti Physical test male, police bharti gola fek ground measurements, Maharashtra police bharti ground marks, police bharti physical height and weight, police bharti running time 1600 meter time, police bharti ground details]

 

Police Bharti Ground Test Details in Marathi

 

पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी असते? | Police Bharti Physical Test?

महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी होत असताना शारीरिक चाचणी कशी घेतली जाते. शारीरिक चाचणी मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. शारीरिक चाचणी कशासाठी किती गुण असतात. संपूर्ण माहिती तुम्हाला सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळेल. पोलीस शिपाई पदाकरिता व सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी घेतली जाते याबद्दल माहिती खाली पहा.

 

पोलीस भरती 2024 व 2025 मैदानी चाचणी गुण | Police Bharti 2024 Physical Test Marks

पोलीस भरती 2024 मध्ये होणाऱ्या ग्राउंड मैदानी चाचणी काही पदांसाठी 50 गुणांची शारीरिक चाचणी होते तर काही पदासाठी 100 गुणांची मैदानी शारीरिक चाचणी होते. ही चाचणी वेगवेगळ्या विभागात विभाग गेलेली असते जसे की गोळा फेक सोळाशे मीटर धावणे महिलांसाठी आठशे मीटर धावणे त्यानंतर इतर बाबींमध्ये हे गुण विभागले गेले असतात.

 

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी | Police Shipai Physical Test 2024

महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश अधिनियम अंतर्गत वेळोवेळी शासनाने सुधारलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीसाठी पात्र असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांची 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते. पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी शारीरिक चाचणी खालील प्रमाणे विभागली गेली असते.

 

पोलीस भरती मध्ये गोळा फेक साठी किती गुण असतात

Police bharti gola fek – पोलीस भरतीमध्ये गोळा फेक साठी पुरुष उमेदवार महिला उमेदवार त्याच पद्धतीने पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई अशा सर्व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे गुण विभागणी केलेली असते साधारणता गोडा फेक साठी 10 गुण पासून 30 गुणांपर्यंत पदा नुसार हे गुण विभागले गेले असतात.

 

पोलीस भरती 1600 मीटर धावणे किती गुण असतात | Police Bharti Running Marks

 

पुरुष उमेदवार शारीरिक चाचणी 2024

Police Bharti Physical Test Boys 2024

1600 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे 15 गुण
गोळा फेक 15 गुण
एकुण गुण 50 गुण

 

महिला उमेदवार शारीरिक चाचणी 2024

Police Bharti Physical Test Girl 2024

800 मीटर धावणे 30 गुण
गोळा फेक 20 गुण
एकुण गुण 50 गुण

 

पोलीस भरती साठी लागणारे कागदपत्रे

 

पोलीस शिपाई चालक पदासाठी मैदानी चाचणी

Police Shipai Driver Physical Test 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी. पोलीस शिपाई चालक पदाकरिता ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी शारीरिक पात्रता कशी असते. मैदानी चाचणी किती गुण असतात अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पोलीस शिपाई चालक पदात येणारी काही पदे जैसे की उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक अशा सर्व पोलीस शिपाई चालक पदासाठी 50 गुणांची मैदानी शारीरिक चाचणी घेतली जाते. मैदानी शारीरिक चाचणीत 50 गुण कशा पद्धतीने विभागले गेले आहेत त्याबद्दल माहिती खालील प्रमाणे.

 

पुरुष उमेदवार पोलीस शिपाई चालक

Police Shipai Chalak Purush 2024

1600 मीटर धावणे 30 गुण
गोळा फेक 20 गुण
एकूण गुण 50 गुण

 

महिला उमेदवार पोलीस शिपाई चालक

Police Shipai Chalak Mahila 2024

800 मीटर धावणे 30 गुण
गोळा फेक 20 गुण
एकूण गुण 50 गुण

 

सशस्त्र पोलीस शिपाई स्पर्धा करिता मैदानी चाचणी | SRPF Police Bharti 2024 Maharashtra Physical Test Details

SRPF पोलीस म्हणजेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही 100 गुणांची घेतली जाते. सशस्त्र पोलीस शिपाई शारीरिक चाचणी वेगवेगळ्या भागात विभागले गेलेले असते. ज्याच्या धावणे गोळा फेक या गोष्टी येतात. SRPF पोलीस मैदानी चाचणी बद्दल गुण विभागणी खालील प्रमाणे.

 

SRPF पोलीस भरती पात्र उमेदवार गुण विभागणी

SRPF Police Bharti Physical Test Marks Details 2024

5 किलो मिटर धावणे 50 गुण
100 मिटर धावणे 25 गुण
गोळा फेक 25 गुण
एकुण गुण 100 गुण

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि रोज नवीन अपडेट मिळावा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ : Police Bharti Ground Details in Marathi 2024

Q. पोलीस भरती शारीरिक चाचणी किती गुणांची असते?

Ans. पोलीस भरती मैदानी चाचणी म्हणजेच शारीरिक चाचणी 50 गुणांची असते.

Q. पोलीस भरती लेखी परीक्षा किती गुणांची असते?

Ans. पोलीस भरतीत लेखी परीक्षा 100 गुणांची असते.

Q. पोलीस भरती मैदानी चाचणी पास होण्यासाठी किती टक्के गुण लागतात?

Ans. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत म्हणजेच शारीरिक चाचणीमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 40 टक्के गुणांची आवश्यकता असते.

Q. पोलीस भरती लेखी परीक्षेत पास होण्यासाठी किती टक्के गुण लागतात?

Ans. पोलीस भरती लेखी परीक्षेत पास होण्यासाठी कमीत कमी 40 टक्के गुणांची आवश्यकता असते तेव्हाच उमेदवार पास ग्राह्य धरला जातो.

Q. पोलीस भरती मैदानी चाचणी व लेखी चाचणी मध्ये पास होण्यासाठी किती टक्के गुणांची आवश्यकता असते?

Ans. पोलीस भरती मैदानी चाचणी व लेखी चाचणी मध्ये पास होण्यासाठी एकत्रितपणे दोघांचे गुण मिळून 40 टक्के गुणांची आवश्यकता असते. ज्या पात्र उमेदवारास 40 टक्के गुण या दोन्ही परीक्षांमध्ये मिळतात असा उमेदवार पात्र व पास असा घोषित केला जातो.

Q. पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी किती गुणाची व कशी असते

Ans. पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्या चाचणी 50 गुणांची असते. याच्यात हलके वाहन चालवण्यासाठी 25 गुण तर वाहतूक व अवजड वाहन तसेच जीप सारखी वाहन चालवण्यासाठी 25 गुण असतात.

4 thoughts on “💂 पोलीस भरती ग्राउंड कसे असते किती गुण असतात फिजिकल टेस्ट संपुर्ण माहिती 2024 | Police Bharti Ground 2024 Details in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top