💡 पीएम सूर्य घर मोफत वीज योजना : काय आहे? असा अर्ज करा ! PM Surya Ghar Yojana Maharashtra Details in Marathi

PM Surya Ghar Yojana Maharashtra Details in Marathi

PM Surya Ghar Yojana Maharashtra Details in Marathi – पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, यालाच “पीएम सूर्य घर मोफत वीज योजना” असेही संबोधले जात आहे. PM Surya Ghar Yojana Maharashtra 2024 ही एक भारत सरकारची नवीन योजना आहे. या सरकारी योजनेचा उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे. या योजनेचे घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर आज आपण पीएम सूर्या घर मोफत वीज योजना काय आहे?, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, नियम व अटी काय आहे, अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PM Surya Ghar Free Electricity Yojana Maharashtra Details in marathi. Pradhan mantri free solar panel yojana is also called pm surya ghar Mofat bijali yojana. All important and relevant information about this scheme in given below. Like eligibility criteria, required documents list, benefits, application form process all details in marathi.

PM Surya Ghar Yojana Maharashtra Details in Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “PM Surya Ghar Muft Bijali Yojana” याची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत आपल्या देशातील एक कोटी कुटुंबांना मोफत वीज पुरवली जाणार आहे. आणि या योजनेमुळे सरकारची 50 लाख रुपयाची बचत सुद्धा होणार आहे. यामुळे देशातील एक कोटी नागरिकांचा तर फायदा होणारच आहे. सरकारचा सुद्धा या योजनेमार्फत फायदा होणार आहे. तर या योजनेसाठी नागरिक कशा पद्धतीने अर्ज करू शकता. नेमकं ही योजना काय आहे पाहूया.

PM Sury Ghar Yojana काय आहे?

पी एम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही एक सरकारी योजना आहे. या योजनेमार्फत भारतातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी 40% पर्यंत सबसिडी देखील मिळणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना विज बिल भरण्याची आवश्यकता राहणार नाही.

PM Surya Ghar Yojana 2024 Overview
योजनेचे नाव प्रधानमंत्री सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana)
योजना सुरू होण्याची तारीख 15 फेब्रुवारी 2024
योजना कोणी जाहीर केली पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी
कुठून जाहीर केली अयोध्या (उत्तर प्रदेश)
योजनेचा उद्देश 01 कोटी नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसवणे आणि मोफत वीज देणे
लाभार्थी गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंब
सबसिडी लाभ 30,000 ते 78,000
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online)
अधिकृत वेबसाईट pmsuryaghar.gov.in

 

PM Surya Ghar Yojana Maharashtra Details in Marathi

PM Surya Ghar Yojana 2024 Maharashtra Benifits फायदे

या योजनेमुळे देशातील 1 कोटी नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर कसा करावा त्यावर भर दिली गेली आहे. या योजनेमुळे होणारे काही फायदे खाली देण्यात आले आहे.
1) 1 कोटी घरासाठी मोफत वीज मिळेल
2) सरकारच्या वीज खर्चात होणारी 50 लाख रुपये बचत होईल.
3) सौर ऊर्जेचा वाढीव वापर होईल आणि त्यामुळे इतर नैसर्गिक साधनांची बचत होईल.
4) कोळशामुळे तयार होणारी वीज कमी होईल आणि त्यामुळे प्रदूषण कमी होईल.
5) नागरिकांना वीजेत खंड न पडता वीजेचा चा वापर करता येईल.
6) 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळेल.

PM Surya Ghar Muft Bijali Yojana Solar Plant Capacity

सरासरी मासिक वीज वापर रूफटॉप सोलर प्लांटची योग्य क्षमता सबसिडी
0 ते 150 1 ते 2 किलोवॅट 30,000 ते 60,000
150 ते 300 2 ते 3 किलोवॅट 60,000 ते 78,000
> 300 3 किलोवॅट पेक्षा जास्त 78,000

PM Surya Ghar Yojana Eligibility पात्रता

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता खाली देण्यात आले आहे.
1) अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
2) अर्जदाराकडे सोलर पॅनल बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असावे.
3) अर्जदाराच्या कुटुंबाकडे वैद्य वीज कनेक्शन असावे.
4) अर्जदाराने यापूर्वी सौर पॅनल साठी कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

PM Surya Ghar Yojana Documents कागदपत्रे

पीएम सूर्य घर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते त्यांची यादी खाली देण्यात आली आहे.
1) आधार कार्ड (Aadhar Card)
2) मतदान कार्ड/ रहिवाशी दाखला (Voter ID Card)
3) चालू वीज बील (Letest Electricity Bill)
4) स्वतःचं घर असल्याचा पुरावा. (Property Card)
5) रेशन कार्ड (Ration Card)
6) बँक खाते पासबुक (Bank Passbook)

PM Surya Ghar Mofat Vij Yojana Website Link

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी. नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालयाने अधिकृत वेबसाईट तयार केले आहे. त्या वेबसाईटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. वेबसाईट ची लिंक खाली देण्यात आलेली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबाबतची माहिती सुद्धा खाली मिळेल.

🌐 अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Online

Registration Process PM Surya Ghar Yojana रजिस्ट्रेशन कसे करावे

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे. याबाबतची माहिती स्टेप बाय स्टेप खाली देण्यात आलेले आहेत.
1) Registration करण्यासाठी वरती दिलेल्या अर्ज करण्याच्या वेबसाईट वरती क्लिक करा.
2) येथे आता “Apply For Rooftop Solar” या पर्यावर क्लिक करा.
3) आता “Register Here” या पर्यायावर क्लिक करा.
4) आता तुमचे राज्य व जिल्हा निवडा
5) त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक (Consumer Number) टाका.
6) या नंतर “Next” या बटनावर क्लिक करा.
7) तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवून परत आलेला OTP टाका.
8) आता समोर दिसत असलेला संकेतांक टाका आणि  “Submit” करा.
9) येथे तुमची नवीन नोंदणी झाली (Registration) झाले.

अर्ज कसा करावा | How to Apply Online PM Surya Ghar Muft Bijali Yojana

तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील फॉर्म कसा भरावा त्याबाबतची माहिती खाली देण्यात आली आहे.
1) रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत तुम्हाला या pmsuryaghar.gov.in अधिकृत वेबसाईट वरती यायचं आहे.
2) येथे “Login Here” या पर्याया वर क्लिक करा
3) तुमचा Registered Mobile नंबर व संकेतांक (Human Check) टाका आणि Next बटनावर क्लिक करा.
4) येथे आता Apply For Rooftop Solar Installation चा फॉर्म भरावा लागेल.
5) या फॉर्ममध्ये “Application Details” म्हणजे तुमची माहिती भरावी लागेल.
6) त्यानंतर काही “Documents Upload” करावे लागेल.
7) आता फार्म चेक करून Final Submit करावा लागेल.
8) यानंतर तुमचा फॉर्म Inspection साठी जाईल तो Approved होईल.
9) आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

How to Check Status PM Surya Ghar Yojana 2024

पी एम सूर्य घर फ्री वीज योजना अंतर्गत अर्ज केल्यानंतर त्याचे Status कसे चेक करायचे. त्याबाबतची माहिती खाली देण्यात आली आहे.
1) फॉर्म भरल्यानंतर त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी pmsuryaghar.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

2) आता “Login Here” या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर चा वापर करून लॉगिन करून घ्या.

3) आता तुम्ही भरलेला फॉर्म ची स्थिती चेक करण्यासाठी “Track Details” या पर्यायावर क्लिक करा.

4) आता तुम्ही तुमच्या फॉर्म ची स्थिती चेक करू शकता.

How to Use PM Surya Ghar Yojana Calculator

पी एम सूर्यघर योजनेसाठी अर्जदाराला स्वतः किती खर्च येईल. याबाबतची खासदार जमा करण्यासाठी “PM Surya Ghar Yojana Calculator” तयार करण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला अंदाजे किती खर्च येईल ती माहिती मिळते. हे कॅल्क्युलेटर कसे वापरायचे त्याबाबतची माहिती खाली दिली आहे.

1) पी एम सूर्य कर योजना कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी pmsuryaghar.gov.in वेबसाईटला भेट द्या.

2) येथे “Know More About Rooftop Solar” या पर्यायाच्या खाली Calculator असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

3) हे जे काही माहिती विचारली जाईल ती भरा आणि Calculate बटनावर क्लिक करा.

4) आता या कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही जेवढी अचूक माहिती भराल तेवढे अचूक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.

5) अशा पद्धतीने तुम्ही पीएम सूर्य घर योजनेचे कॅल्क्युलेटर वापरू शकतात.

FAQ : PM Surya Ghar Yojana Maharashtra Details in Marathi

Q. पी एम सूर्यघर योजनेमुळे सरकारची किती लाखाची बचत होईल?
Ans. पी एम सूर्यघर योजनेमुळे सरकारची 50 लाखापर्यंतची बचत होईल.

Q. पी एम सूर्य घरी योजनेची सुरुवात कधी झाली?
Ans. पी एम सूर्यघर योजनेची सुरुवात 15 फेब्रुवारी 2024 पासून झाली.

Q. पी एम सूर्य घरी योजनेचा लाभ किती कुटुंबांना मिळणार आहे?
Ans. या योजनेचा लाभ एक कोटी भारतीय कुटुंबांना मिळणार आहे.

Q. पी एम सूर्यघर योजनेसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे?
Ans. पीएम सूर्य घर योजनेसाठी 75 हजार कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Q. पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती सबसिडी मिळणार आहे?
Ans. या योजनेअंतर्गत 78 हजार रुपये जास्तीत जास्त सबसिडी मिळणार आहे.

Q. पी एम सूर्यघर मोफत वीज योजना व पीएम सूर्योदय योजना याच्यातील फरक?
Ans. पी एम सूर्यघर मोफत वीज योजना ही पीएम सूर्योदय योजनेचे नवीन स्वरूप आहे.

1 thought on “💡 पीएम सूर्य घर मोफत वीज योजना : काय आहे? असा अर्ज करा ! PM Surya Ghar Yojana Maharashtra Details in Marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top